एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूरदर्शनच्या काळात खानदान म्हणून मालिका होती. त्यात एका उद्योगपती घराण्याची कथा घेतली होती. विवाहबाह्य संबंध, घरातही भारी कपडे आणि दागिने घालून वावरणार्‍या बयका, गृहकलह अधोरेखीत करण्यासाठी दाखवलेली कटकारस्थाने हे सगळे त्यात पहिल्यांदाच दाखवले गेले असावे. एकतर मालिका हा प्रकारच तेव्हा नविन होता आणि कथेचा हा प्लॉट नविनच असल्याने खूप आवडली ती मालिका लोकांना. पण मग निर्मात्यांना असे वाटू लागले की हाच प्लॉट मालिकेत चालू शकतो. मग बहुतेक मालिका त्याच मुशीतून घडू लागल्या - अगदी मराठीतही.

राजवाडे मालिकेच्या शेवटी अगदी हमखास भरीत करत असले तरी असंभव, अग्निहोत्र, गुंतता अशा मालिकांतून त्यांनी चाकोरी मोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांचे कौतुक नक्कीच आहे. त्यांच्या मालिकांचे आवडलेले आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्या बर्‍यापैकी वेळेत संपतात. त्यामुळे बघायचा धीर होतो Happy मालिकेच्या प्रोमोत जे दाखवतात तेच कथाबीज फुलवायचा ते प्रयत्न करतात. गाडी शेवटी सास्वासुनांतील कारस्थाने, एकाच व्यक्तीची २-३ लग्ने अशा मालिकेच्या 'राजमार्गा'वर त्यांची गाडी कधीच येत नाही.

सगेफु आणि एल्दुगो अशा मालिकांनी हलक्या फुलक्या मालिकांचा पायंडा पाडला तर तो बदल काही काळ तरी स्वागतार्हच असेल. मग पुन्हा त्याचा रतिब सुरु होइलच. Happy

मी एक गोष्ट मार्क केली आहे. स्वप्नील कायम स्कूटरच का चालवतो? मुंपुमुं मध्ये पण जुनी कायनेटिक आणि आता एलदुगो मध्ये अ‍ॅक्टिवा (बहुदा!) ! जनरली या वयातल्या मुलांना बाईकची क्रेझ असते आणि एका मुलीला फिरवायची वेळ आली की मुले साधारणपणे बाईकच प्रीफर करतात. स्वप्नीलला हिर्‍याप्रमाणे बाईकही वर्ज्य आहे का? Uhoh

मागील आठवड्यात "आनंद लुटण्या" च्या प्रसंगातले विनय आपटे एक वाक्य "ही राधा अगदी एव्हढीशी असताना हिची आई माझ्या पदरात (???) हिला टाकून निघून गेली!".... विनय आपटे नी आनंद जरा जास्तच लुटला नाही का?? Proud

विनय जोशी कोण? >>> आपटे म्हणायचं होतं हो मला. Uhoh चुकून आपटेचा जोशी झाला. Uhoh

मागील चार एपिसोड्स बुडालेत!
तेवढ्यात साखरपुडा उरकून तर नै ना घेतला? Wink Proud

बागेश्री: कालपर्यंत झालेला नाही साखरपुडा. 'लीडिंग टू साखरपुडा' या प्रवासातच ३-४ एपिसोड्स काढतो का काय असं वाटलं कालचा एपिसोड पाहून. भाटेकाकूंना फॉर अ चेंज मटार सोलण्याऐवजी इस्त्री करताना पाहून हसायला आलं! घाई-गडबड, लगबग दाखवण्याचा त्यांनी त्यांच्या परीनं प्रयत्न केला आहे पण तो एकूण अजिबात सहज अभिनय वाटात नाही.

त्यातल्या त्यात आजीचा एकही सीन नसल्याने कालचा एपिसोड सुखावह होता! (का होता सीन? आठवत नाहीये आता!)

रोज रविवारी सकाळी १० पासून एलदुगो चे ब्याक टू ब्याक एपिसोड्स दाखवतायत. त्यामुळे जर का ८:३० चा भाग चुकलाच तर रविवारी सकाळी पहा.

त्यामुळे जर का ८:३० चा भाग चुकलाच तर रविवारी सकाळी पहा.
>>अरे व्वा, नक्की नक्की Happy
आजचा बघायला मिळेल बहुधा

त्यामुळे जर का ८:३० चा भाग चुकलाच तर रविवारी सकाळी पहा. >>>
मी ते भाग ऐवजी भोग असं वाचलं Lol

आज काय झालं? माझा मिसला एपिसोड. Sad साखरपुड्याचा झब्बा भाटे काकूंनी पेटवला का?? इस्त्री तशीच ठेवून गेल्या म्हणून विचारलं. Happy
@निंबुडा
>>>स्वप्नील कायम स्कूटरच का चालवतो?
मला पण हा प्रश्ण होता पण त्याला बाईक चालवता येत नसेल बहुतेक. :फिदीफिदी:
किक स्टार्ट, पायात ब्रेक. जरा जास्त हुशारी लागते ना. Wink

अजुन काही भाग पाहिले, मला तर एकदम 'ससुराल गेन्दा फुल' च मराठी व्हर्जन वाटतय .
म्हणजे सध्या किती तरी पॉईंट्स अगदीच सेम आहेत...
आई विना वाढलेली वडिलांची लाडकी 'बडे घर कि बेटी'... नाइलाजाने लग्न.. सासर म्हणजे गर्दीने भरलेली मिड्ल क्लास जॉइंट फॅमिली.... सासरच्या सगळ्या व्यक्ती म्हणजे एक एक नमुना.... मुलीली आधी फॅमिली आवडायला लागणे मग नकळत नवराही आवडणे इ...बरीचशी 'ससुराल गेन्दा फुल' मार्गानेच चाललीये कथा... इतकच काय 'ससुरल गेन्दा फुल' मधे सुहानाला इशान ची स्कुटर अजिबात आवडत नसते.. कायमचा राग त्या स्कुटर वर.. तशी सुरवातही झालीये एका एपिसोड झाला इथे :).

आज साखरपुडा आहे. काल कुहूने राधाला ढकलून घनश्यामवर जवळ जवळ फेकलेच! घनश्याम मस्त पोक काढून बसला होता.(मैद्याचं पोतं हा किताब दुसर्‍या कुणाला तरी मिळालेला आहे नाहीतर याला पण फिट आहे).
ज्ञाना दिसला नाही . त्याला कोंडून ठेवलं का घरात?
या मालिकेतली दोन लहान मुलं सोडली तर बाकी प्रत्येकात काही ना काही विक्षिप्तपणा आहे.

काल कुहूने राधाला ढकलून घनश्यामवर जवळ जवळ फेकलेच>>> हो ना किती जोरात बदकन बसवले Happy राधा नंतर विचारते ना हिचे नाव काय रे? मला वाटलं आता कुहुचं काही खरं नाही Proud

आता पुढच्या भागात बघू आज्जीबाईंनी ओरडल्यामुळे अंगठी उडालीये बहुतेक घनाच्या हातून...
रच्याकने सगळे छान दिसत होते सापुला..

अरे हो ज्ञाना दिसला नाही

मला वाटलं आता कुहुचं काही खरं नाही >> मग ती शिघ्रकाव्य करेल...

दादा माझा आहे अगदी मैद्याची थैली
राधावहिनी आज माझ्यावर का बरे चिडली

मग आपले पण काही खरं नाही Happy

ज्ञाना दिसला नाही>>> बोअर करेल सगळ्यन्ना तिथे म्हणून कोंडून ठेवलं असेल त्याला घरातच! Happy
मुक्ता छान दिसत होती. स्वप्नील अगदी मुरमुर्‍याचं पोतं! (की ते हलकं वाटतं उपमा द्यायला ...???)

अरे किती 'उपमा' मिळतात स्वप्नीलला Proud
मुक्ताची पहिली साडी पण मस्त होती. विनय आपटेने बेसनाचे हात लावले :-t

ज्ञाना आहे कालच्या सीनमध्ये बॅकग्राऊंडला. उल्काशी बोलताना दाखवलाय. तो बॅकग्राऊंडला असला तरी तो उल्काला काहीतरी समजावताना दाखवलाय. चांगलं थॉटफुल वाटलं मला हे.

>>>या मालिकेतली दोन लहान मुलं सोडली तर बाकी प्रत्येकात काही ना काही विक्षिप्तपणा आह
त्या मुलांची नावे गंगा आणि यमुना आहेत हे काय कमी आहे का?? Biggrin
सगळे छान दिसत होते काल. साखरपुड्याचा विडिओ अजून युटयुब वर आला नाहीये. Sad

मुक्ताची पहिली साडी जास्त छान होती. आज खुप गोड दिसली.

तिच्यावर मरणारा तो बिचारा... माउली त्याला 'त्यात तुमचं भावा-बहिणीचं नातं' म्हणतो तेव्हा हसुन हसुन मेले. Happy

आणि आत्या पहिले दोन एपिसोड्स छान मराठी बोलत होती नं??? २ दिवसांनी आठवण झाली की काय, इन्दोरचं सासर असल्याची???

देवचार, अनुमोदन! संवाद नव्हतेच आज. सगळे एवढी का सांकेतिक भाषा वापरत होते, काय माहिती? मान्य आहे, मी मुलीच्या घरी पहिल्यांदाच गेलेत, पण इतका अवघडलेपणा??? Uhoh आणि घनाची आईपण त्याला काय सांगत होती? टिळा वाकडा झालाय, सरळ कर म्हणून का? तिच्या खाणाखुणा तशाच होत्या.... आता इतक्यावेळा सांगण्यासारखं तेही खुणेने- असं काय होतं त्यात? आईच ना ती? जाऊन सरळ करुन यायचं ना?

साखरपुड्याचा झब्बा भाटे काकूंनी पेटवला >> तो तर व्यवस्थित कापल्यासारखा वाटत होता!

हि र्‍याची अंगठी घालताना दाखवली मग ताम्हन तरी चांदीचं नको?

Pages