असा मी तसा मी भाग-५

Submitted by अविनाश खेडकर on 22 January, 2012 - 12:18

आपण पठारावर फिरताना
तो पाऊस अचानक आला होता
तुझा गोरा देह तेंव्हा माझ्या
कवेमध्ये विसावला होता
......................................................................

माझा कानांवर विश्वास
डोळ्यांच्या नंतर आहे
कारण कान व डोळे यात
चार बोटांचे अंतर आहे
.....................................................................

प्रत्येक माणूस हा सुर्यापेक्षा
चंद्रावरच भाळलेला आहे
कारण चंद्राप्रमाणेच इथे
प्रत्येकजण डागाळलेला आहे
...................................................................

मी तुला दिलेल वचन
अजुन सुध्दा पाळलं आहे
येऊन पहा माझं मन
तुझ्यावरच भाळलं आहे
...................................................................

कालच पाहिला तो धबधबा
जिथे आपण भेटायचो
एकमेकांच्या डोळ्यांतून
ह्रदयाला गाठायचो
..................................................................

तुझ्या लग्नाची पत्रिका
कालच पाहिली
गोदावरी बिचारी
डोळ्यातून वाहिली.
.................................................................

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

गोदावरी बिचारी?>>>>>>>>>>>
बिचारीच आहे ते पण टायपो घोळ होता दुरूस्त केला तो.

विभाग्रजजी धन्यवाद

माझा कानांवर विश्वास
डोळ्यांच्या नंतर आहे
कारण कान व डोळे यात
चार बोटांचे अंतर आहे.

प्रत्येक माणूस हा सुर्यापेक्षा
चंद्रावरच भाळलेला आहे
कारण चंद्राप्रमाणेच इथे
प्रत्येकजण डागाळलेला आहे.>>>>>>>>>>>>>

या दोन विशेष आवडल्या.
बाकिच्या पण सुंदर आहेत.

असंबद्ध नियमीत आवर्तने>>>>>>>>>
प्रतिक्रियेचा अर्थ कळाला नाही. तसे आवर्तने हा शब्द विज्ञानाच्या पुस्तकात वाचला होता शाळेत.
कृपया कुणी मदत करेल का?.

आम्हीच करू. २७ जानेवारीला. तोवर कवी मिल्या यांच्या तरही गझलेवरचा आमचा प्रतिसाद वाचून घ्या.

छान आहेत.

प्रत्येक माणूस हा सुर्यापेक्षा
चंद्रावरच भाळलेला आहे
कारण चंद्राप्रमाणेच इथे
प्रत्येकजण डागाळलेला आहे>>>>>>>>हि विशेष आवडली.

आम्हीच करू. २७ जानेवारीला. तोवर कवी मिल्या यांच्या तरही गझलेवरचा आमचा प्रतिसाद वाचून घ्या.
गंभीर समिक्षक्>>>>>>>>आम्हीच करू. म्हणजे नेमके कितीजण आहात्? आजपर्यत अमुक अमुक कविता वाचा हे ऐकलं होत, पण अमुक अमुक प्रतिसाद वाचा हे प्रथमच पाहातोय.
ते तर असच झालं म्हनाव लागेल चित्रपटापेक्षा समिक्षक फेमस(चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला असच ना?)

असो आपल्या मदतीच्या प्रतिक्षेत मिल्याच्याच काय सबंध कविंच्या काव्यावरील आपले प्रतिसाद वाचत आहे. कारण बाकिच्या साहित्य प्रकारात गंभीर समिक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत कि नाही याची कल्पना अजून नाही. (म्हणजे बाकिच्या सा.प्र. वरील समिक्षक गंभीर आहेत कि नाही महित नाही.)

प्रत्येक माणूस हा सुर्यापेक्षा
चंद्रावरच भाळलेला आहे
कारण चंद्राप्रमाणेच इथे
प्रत्येकजण डागाळलेला आहे..................

कारण आगळे आहे. छान आहे.
प्रखरतेपेक्षा कोमलता सर्वांना आवडते