बाजार

Submitted by मोहना on 19 January, 2012 - 18:43

तुझ्या मुग्धतेवरच मी भाळले
शब्दांचे गजरे गुंफित गेले
माझे बोल तुला स्मरत राहिले

मला काहीच आठवेना झाले....
तेव्हा त्या गजर्‍यालाच साक्षी केलंस!
प्रत्येक फुल पायदळी तुडवलंस

खर्‍या खोट्याचा बाजार मांडून
माझ्या प्रेमालाच ’वेश्या’ केलंस!

गुलमोहर: 

खर्‍या खोट्याचा बाजार >>>>प्रेमात संशय निर्मान झाला,मग त्याची वाट लागायला कितिसा वेळ.

संशयाच भुत
जेव्हा मानेवर बसत
घरदार नातीगोती
होतात जमिनदोस्त.

प्रेमालाच ’वेश्या’ केलंस!>>>..प्रेमाची पुरती वाट लावली.