झलक शीर्षकगीताची (उल्हास भिडे)

Submitted by UlhasBhide on 17 January, 2012 - 01:22

जगभरात विखुरलेल्या अनेक मायबोलीकरांच्या सहभागाने ’मायबोली शीर्षकगीत’ संगीतबद्ध करणं हा उपक्रम
म्हणजे एक फार मोठं आव्हान. पण आपले ज्येष्ठ मायबोलीकर श्री. योगेश जोशी यांनी (योग) घेतलेली अपार मेहनत, त्यांना गायक मायबोलीकरांनी तितक्याच तळमळीने दिलेलं सहकार्य, आणि मायबोलीच्या संस्थापकांनी यात जातीने लक्ष घालून संबंधितांशी संपर्क साधून दिलेला सल्ला, सूचना, मार्गदर्शन तसंच ऍडमिन, व्यवस्थापन समिती आणि या विषयातील तज्ञ मायबोलीकर यांचा सक्रीय सहभाग या सार्‍यामुळे हे काम सुकर झालं आणि अतीशय योजनाबद्ध रीतीने पार पडलं.

योगेश जोशी(योग) :
सिनिअर माबोकर म्हणून कुठेही आढ्यतेचा लवलेश नाही. संगीत क्षेत्रातलं आणि तत्संबंधी तंत्रज्ञानातलं उत्तम ज्ञान आणि अनुभव असूनही बढाया मारण्याची वृत्ती नाही. अगदी down to earth माणूस. गायक माबोकरांच्या चुका/त्रुटी स्पष्टपणे पण मार्दवपूर्ण शब्दात सांगण्याची, समजवण्याची धाटणी. प्रत्येकाकडून जास्तीत जास्त चांगलं करवून घेण्याचं कसब. वेळ आणि वेग यांचं संतुलन राखत अतिशय शांत चित्ताने, हसतमुख राहून स्वत:च्या घरातलं कार्य असल्यासारखा हा माणूस झटला. “योग यांना बघून तर झपाटलेपण काय असतं याची प्रचिती आली” असं अनिताताईंनी म्हटलंय ते तंतोतंत खरं आहे.
स्वत: झटून, सर्वांचं सहकार्य मिळवून हे सर्व घडवून आणलं याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. अशा टीम-लीडरबरोबर काम करणं हा खूप आनंददायक अनुभव असतो. हा आनंद सर्व संबंधित माबोकारांनी अनुभवला असेलच.

माबोकर गायक, गायिका :
यांचं योगदान तर खूपच महत्वाचं. दिलेल्या सूचनांनुसार त्यांनी गीताची नियमित तालीम केल्यामुळे प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी त्यामानाने कमी रिटेक्स घ्यावे लागले. काही प्रसंगी गीतातील काही विशिष्ट जागा घेताना जरी ३-३/४-४ रिटेक्स झाले तरी सांगितलेले बदल अंमलात आणून, न कंटाळता सर्वांनी योगेशना संपूर्ण सहकार्य दिलं. खरं तर यातल्या प्रत्येक गायकाला ही गोष्ट माहित आहे की, जरी संपूर्ण गीत त्याच्या / तिच्याकडून गाउन घेतलेलं असलं तरी प्रत्येकाने गायलेल्या एखाद-दुसर्‍या निवडक ओळीचा अंतर्भाव गीतात केला जाणार आहे. “एकाच काय, अर्ध्या ओळीचा अंतर्भाव जरी झाला/न झाला तरी आपण सर्व मिळून काहीतरी चांगलं घडवतोय, हेच मोठं समाधान आहे” अशा स्वरूपाचे उद्गार त्यांच्याकडून ऐकल्यावर मन भरून आलं, फार पूर्वी ऐकलेल्या एका गीताच्या ओळी आठवल्या -----
"असू आम्ही सुखाने पत्थर पायातील
मंदिर उभविणे हेच आमुचे शील"

एक सुंदर कलाकृती निर्माण करायची हे सर्वांचं ध्येय. ध्येय ही एक प्रकारची नशा (अर्थातच उदात्त अर्थाने) असते. आणि ध्येयपथावर स्वत:ला झोकून देऊन निरंतर मार्गक्रमण करणं हीदेखील तितकीच नशा, ’मधुशाला’ मधे हरिवंशरायजी बच्चन यांनी म्हटल्याप्रमाणे :
“मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला
अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला”
गेले काही महिने सगळेच या उदात्त नशेने, ध्येयाने झपाटलेले होते.

पण या सगळ्यात माझा प्रत्यक्ष सहभाग अगदीच नगण्य. कारण ना मी गाऊ शकत, ना गीताबरोबर प्रकाशित होणार्‍या व्हिज्युअल इफेक्ट्स बाबत स्वत: काही ठोस करू शकत. त्यामुळे moral support इतकीच काय ती माझी मदत.
असो .....

कला, तंत्रज्ञान आणि मायबोलीकरांनी ’आपल्या मायबोलीचा उपक्रम’ यशस्वी करण्यासाठी आत्मीयतेने घेतलेली मेहनत; अशा त्रिवेणी संगमातून एक सृजनसोहळा सांघिकरीत्या घडतोय, शीर्षक गीतातल्या या ओळी :
मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते विश्वात 'मायबोली'

प्रत्यक्ष साकार होताना दिसतायत आणि मीही या सृजनसोहळ्यातला एक छोटासा अंश आहे हे माझं परमभाग्य.

.... उल्हास भिडे

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुंग्या........ सही रे............. !!
मायबोली......... मायबोली.......... जियो Happy

क्या बात है
नेत्रदीपक आणि कर्णदीपकही
केव्हढी मेहनत घेतलीये सर्वांनी... आणि भुंग्ज Happy
उकाका - सा. दंडवत तुम्हाला
प्रमोद काका - छटाकभर च्यवनप्राश आम्हाला पाठवून द्या प्लीज

जियो मेरे दोस्त ! अभिमान वाटतोय सर्वांचा !!

( उकाका, तेव्हढा केसाला काळा रंग लावलात तर मराठी सिनेसृष्टीतली देखण्या नायकाची उणीव दूर होईल Wink )

तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडियो बघायला आवडतोय आणि तुम्ही त्यातले बारकावे आवडल्याचं आवर्जून सांगत आहात त्याबद्दल माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून तुम्हा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.

या दृकश्राव्य निर्मितीची जबाबदारी माझ्यावर आली आणि मी ती पार पाडू शकले ती माझ्यावर विश्वास दाखवणा-या आणि अतिशय मनापासून , झटून काम करणा-या माझ्या टीम मेंबर्स मुळेच.
२ मिनिटाची क्लीप असली तर त्यामागे खूप कष्ट आहेत.. पण ह्या टीमबरोबर काम करताना ते कष्ट जाणवलेच नाहीत. एक छान अनुभव होता हे काम करणं हा. (संधी मिळाली तर मनोगत लिहीनच)

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

गीतकार, संगीतकार. गायक. वाद्यवृंद आणि मायबोलीची संकल्पना ह्या सगळ्या बाजुंना आमच्या परिनी न्याय द्यायचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे... हा प्रयत्न सफल झाला की नाही ते ठरवणारे तुम्हीच Happy

परत एकदा सर्वांना प्रतिक्रीयांबद्दल मनापासून धन्यवाद Happy

रार

हा व्हिडिओ अगदी प्रोफेशनल्सने बनवला असावा अशी शंका मला आली होती. पण हे सगळे आपल्यासारखेच मायबोलीकर आहेत हे कळल्यावर चाटच पडलो...

जबरी ! मस्त झालंय गाणं.

सरस्वतीमध्येच 'मायबोली' अक्षरे गुंफण्याचा कल्पनेला सलाम >> + १

सह्हीच्चे!
खूपच आवडलं.व्हिजुअल, चाल, जितकं ऐकलं तितकं सगळंच सुरेख झालय. क्या बात है! सगळ्या सहभागी माबो लोक्सांचे अभिनंदन!

एक नंबर! लाआआआआआआआअय भारीईईईईईईईईईईईईई! Happy

>>सरस्वतीमध्येच 'मायबोली' अक्षरे गुंफण्याचा कल्पनेला सलाम!
अनुमोदन +++++++++++++++++++१ Happy

अभिनंदन संपूर्ण टिम चं, सुरेख झालीये सुरवात.
टिझर च्या व्हिज्युअल मधे माझ्या कॅन्डल्स ना बघून धन्य झाले :).

अ प्र ति म !!!!

सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन Happy

सरस्वतीमध्येच 'मायबोली' अक्षरे गुंफण्याचा कल्पनेला सलाम!>>>>>+१

सुंदर!

(म्हणजे लिहितानाही ही फारच औपचारीक प्रतिक्रिया वाटतेय, हे आतून स्पष्ट जाणवतंय. पण ऐकताना आणि बघताना काय वाटतंय हे कसं लिहायचं हे कळत नाही खरंच...)

खूप आवडलं . संपूर्ण टीम च खूप खूप अभिनंदन . गाण्यातून जबरदस्त आत्मियता जाणवतेय!
सरस्वतीमध्येच 'मायबोली' अक्षरे गुंफण्याचा कल्पनेला सलाम!>>>>>+१

शीर्षकगीत आणि त्यावरच्या प्रतिक्रिया हे दोन्ही बघून मस्त वाटलं. संपूर्ण गाणंही लवकरात लवकर ऐकायला मिळो. व्हिजुअल्स अतिशय सुरेख झाली आहेत. सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन Happy

अतिशयच सुरेख!
म्हणजे शब्द कमी पडतील असं काहीतरी वाटतंय! संपूर्ण टीमचं खूप खूप मनापासून अभिनंदन!
गीत, संगीत, गायन, अ‍ॅनिमेशन...सगळंच सरस आहे!

Pages