माझ्या पहिल्या प्रेमाची शेवटची गोष्ट!!!

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 16 January, 2012 - 10:29

आज मला तुझा फक्त थोडा वेळ हवाय, माझ हृदय मोकळ करण्यासाठी...
आज आयुष्यात पहिल्यांदाच कुणाशी तरी अगदी खर बोलतोय, समोरची व्यक्ती नक्की कोण आहे याची खात्री नसतानाही आज एकदाच मन मोकळ कराव वाटलं.....
माझ नाव समीर , आणि माझी गोष्ट सुरु झाली चार वर्षांपूर्वी....अगदी अनपेक्षितपने, १२ विला होतो मी, अगदी हुशार आणि मनमिळावू....नुकतीच कुठेतरी माझ्या आयुष्याला सुरुवात झाली होती...कित्येक स्वप्न होती माझी....सगळ काही व्यवस्थित सुरु होतं.....दररोज बसने जायचो कॉलेजला....सराव परीक्षा सुरु होती ...लवकर बस मिळावी म्हणून अस्वस्थ झालो होतो , इतक्यात बस आली, घरी जायची फार घाई झाली होती, डोक्यात physics , chemistry आणि mathematics ने उच्छाद मांडला होतां...गाडी प्रत्येक ठिकाणी थांबत निघाली आणि मी स्वतःला त्या गाडीत बसल्याबद्दल अक्षरशः शिव्याच घालू लागलो, आणि अचानक गाडी थांबली...बाहेर बघितलं तर कुठलही गाव नव्हत म्हणून जरा रागातच बाहेर बघितलं...........!!! पण बाहेर जे बघितलं ते आयुष्यात कधीही विसरण्याजोग नव्हत....एक अतिशय निरागस, सुंदर परी त्या बस मधनं खाली उतरली....तिच्या बोलक्या डोळ्यात एक वेगळीच जादू होती...माझ्या आयुष्यात मी इतका सुंदर आणि निरागस चेहरा कधीच बघितला नव्हता...आणि अचानक तिची आणि माझी नजर-नजर झाली!!! हृदयाची चाक जोरजोराने फिरू लागली...ती धड-धड त्या वेळी अगदीच जीवघेणी वाटली....बस सुरु झाली आणि ती आकृती माझ्यापासून दूर जाऊ लागली....नकळतच डोळ्यात अश्रू जमा झाले...हे काय आहे आणि का होतंय हे कळण्याइतक डोक कदाचित मोठ झाल नसाव मात्र प्रेम करण्याइतक माझ हृदय मात्र मोठ झाल होत.....आयुष्यात प्रथमच प्रेमाची जाणीव झाली....
दुसऱ्या दिवशी मुद्दामच थोडा उशीर केला आणि त्याच गाडीत बसलो....नजरा तिलाच शोधात होत्या मात्र ती गर्दीत कुठेतरी अदृश्य झाली होती......आणि अचानक गाडी पुन्हा त्याच ठिकाणी थांबली जिथे कालच मी तिला पहिल्यांदा बघितलं होत.....आणि पुन्हा तेच सर्व घडल, जे काळ घडल होतं....तिच्या डोळ्यात मी माझ सर्वस्व हरवून बसलो होतो....
पण हे कळायला वेळही लागला नाही कि आपण आयुष्याच्या अगदीच चुकीच्या वळणावर प्रेमात पडलोय.... १२ वी ची परीक्षा अगदी तोंडावर आलेली असताना आपण प्रेमात पडलोय....तेव्हा ठरवलं कि नाही...उद्यापासन तिला बघायचं नाही....सगळ काही विसरायचं...पण ते शक्य नाही होवू शकलं.....दोनच दिवसात डोक्याने हृदयासमोर शरणागती पत्करली......रात्री दोनला उठून रोडवर येवून बसलो.......मी काय करतोय याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती......माझा कधीही देव नावाच्या गोष्टीवर विश्वास नव्हता...पण त्या दिवशी अचानक मी देवाशीच बोलायला लागलो, अगदी माझ्याही नकळत....!!! तो देवही कदाचित आश्चर्यचकित झाला असावा!!!! त्यानंतर तो ही मला साथ देवू लागला....५.३० ला सुटणार मझा कॉलेज ४.३० लाच सुटू लागल.....माझी सुटलेली बस मला अचानक रस्त्यात भेटू लागली...आणि त्या परीचा चेहरा माझ्या हृदयावर कोरला गेला......
बघता-बघता १२ वी ची परीक्षा आली, माझे वडील एक नामवंत वकील, त्यांचं स्वप्न होतं की मी अस काही कराव की जगाने फक्त बघत रहाव.....त्यांचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठीच मी आयुष्यभर धडपड करत आलो....पण आता त्यांचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मला तिथून फार दूर निघून जाव लागणार होतं.....माझ्या परीपासुनही दूर....पण हे मी कधीच मान्य करू शकत नव्हतो......तिच्यापासून दूर जाण्याचा विचारही मला घाबरवून सोडायचा.....आणि मग मी तो निर्णय घेतला ज्याने कदाचित माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली!!!
मी १२ वी च्या परीक्षेला गेलोच नाही....घरी हे समजल्यावर काय होईल याची भीती मला कधीही नव्हती....पण त्या वेळी मी सगळ काही खर-खर आपल्या वडिलांना सांगून टाकल.....माहित नाही का? पण कदाचित मन मोकळ कराव वाटल.....आणि त्या दिवशी माझ्या वडिलांचा एक वेगळाच चेहरा बघितला....मला रागवण्याच्या ऐवजी मला अगदी जवळ घेवून ते म्हणाले, " तू वाघाचा मुलगा आहेस, असे निर्णय घ्यायला वाघाचच काळीज लागत....ज्याच मन खर असत ते पोरंच फक्त आपल्या बापाला असं काही सांगू शकत, आणि माझ स्वप्नं पूर्ण करण्यासाठीतर तुझ्याकडे संपूर्ण आयुष्य आहे!!!
.
.
त्यानंतर घरात कधीही हा विषय निघाला नाही.....मी वाट बघत होतो तिच्या सुट्ट्या संपण्याची.....दीड महिन्यांच्या मोठ्या सुट्ट्या होत्या त्या....एक-एक दिवस शंभर वर्षांसारखा वाटत होतां...रोज तिची आठवण यायची, रोज डोळे भरून यायचे...स्वतःला समजावत, कसेबसे मी दिवस काढत होतो....आणि एक दिवस आला जेव्हा ती पुन्हा माझ्या समोर उभी होती, तिला बघताच असं वाटलं की जाव आणि तिला सगळ काही खर-खर सांगाव.....पण हिम्मत नाही झाली!!!
.
.
पण एक दिवस उजाडला ज्या दिवशी मी ठरवलं की आज काहीही झाल तरीही तिला सांगायचच.....
पहिल्यांदाच तिच्याशी बोलायचं होतं, तिच्या नकाराची प्रचंड भीती वाटत होती तरीही हिम्मत केली....आणि ते ही बसमध्येच....!!!!
.
.
संध्याकाळी घरी आल्यानंतर डोक सुन्न झालेलं होतं....मी काय करतोय मलाच माहिती नव्ह्तं...तिच्याशी बोलतानी किती नर्वस झालो होतो मी, मूर्खासारख तिचं नाव विचारलं मी तिला....मला तीच नाव माहिती होत........असणारच......जे नाव माझ्यासाठी सर्वस्व झाल होत, ते नाव विचारलं मी तिला....मी खरच वेडा होतो, कदाचित आजही असेल....
.
.
त्या नंतर तिच्याशी बोलण्याच्या कित्येक संधी मिळाल्या, पण मला कधीही नीट बोलता आल नाही...ती समोर येताच तोंड आणि डोक आपल काम बंद करून तिच्या डोळ्यांवरच आपल लक्ष केंद्रित करायचे!!!
.
.
दिवस जात होते, माझ मन दररोज तुटत होतं, पण तरीही फक्त माझ्या प्रेमावर असलेल्या विश्वासामुळे मी दररोज तिच्याकडे किंचित आशेने बघायचो...
.
.तिच्यासाठी बस मध्ये दररोज जागा पकडायचो, पण ती कधीही माझ्याशेजारी बसली नाही......पण एक दिवस अचानकच आणि अगदी अनपेक्षितपणे ती आली आणि अक्षरशः माझ्या शेजारी बसली....हृदय बंद पडल....हातपाय हलेनासे झाले....काही बोलाव असं वाटलं तर ओठ शिवले गेले!!!! काही नाही बोलू शकलो.....आयुष्यात पूर्वी असं कधीही झाल नव्हत......पण एका परिशी बोलण्याची हिम्मत माणसात इतक्या सहज-सहजी येत नाही....
.
.
दुसरा दिवस, ८/८/२००८, कदाचित माझ्या आयुष्यातला सर्वात चानला दिवस....ती पुन्हा माझ्या जवळच बसली....आणि मी पुन्हा गप्प!!! उतरताने माझ्या नजरेशी बोलणारे तिचे डोळे मला खूप काही सांगून गेले....ती खाली गेली...आणि तिने मला पहिल्यांदाच बाय-बाय केला!!! माझा माझ्या डोळ्यांवर विशास नव्ह्ता, अगदी सगळा जग जिंकल्यासारखा वाटत होतं....पण अचानक मनात विचार आला......हा शेवटचा बाय-बाय तर नव्हता ना???? का कुणास ठावूक...देवाने मला पुढे होणाऱ्या गोष्टींची हलकीशी जन करून दिली!!! आणि जाळी तसंच...३०/०८/२००८ माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस......मी माझ्या प्रेमाला गमावून बसलो......काही कळण्याच्या आताच माझी सगळी स्वप्नं बेचिराख झाली.... हृदय नावाच्या गोष्टीचे अनंत तुकडे झाले, डोळे कायमचेच सुकून गेले!!!! माझ जिच्यावर जीवापाड प्रेम होत त्या परीच मात्र तिच्या आयुष्यावर अजिबात प्रेम नव्हतं.....
ती मला कायमच सोडून गेली......
.
.
एकेकाळी माझी मदत करणारा देवही कदाचित आता माझा राहिला नव्हता....आता नाही होत कसलाही योगायोग.....त्या बस मध्ये बसूनही नाही येत माझी परी माझ्या डोळ्यांसमोर...पण आजही नजरा फक्त आणि फक्त तिलाच शोधत असतात!!!
(काल्पनिक)

गुलमोहर: 

तो निर्णय घेतला ज्याने कदाचित माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली!!!
मी १२ वी च्या परीक्षेला गेलोच नाही........मला रागवण्याच्या ऐवजी मला अगदी जवळ घेवून ते म्हणाले, " तू वाघाचा मुलगा आहेस, असे निर्णय घ्यायला वाघाचच काळीज लागत....

>>>>
Uhoh

हृदयाची चाक जोरजोराने फिरू लागली.>>>> या कल्पनेची थोडीशी थट्टा कराविशी वाटली. धडधडणार्‍या ( vibrating ) ह्रदयाला जेव्हा फिरणार्‍या ( Rotating ) चाकाची उपमा जरा विसंगत वाटत होती. शेवटी लेखक काय आणि कवी काय " जो न देखे रवी....". त्यातुन प्रेमात पडलेला.

नितीनचंद्र,

अहो, अशी उपमा साक्षात टोनी ब्लेअरने दिलेली होती. ब्रिटनचा पंतप्रधान असतांना (साल आठवत नाही) त्याच्या हृदयाची तपासणी करण्यात आली होती. त्यावर त्याला पत्रकारांनी प्रश्न केले. तर तो My heart is racing like a train असं म्हणाला.

नेमक्या त्याच वेळेस ब्रिटीश रेल्वेगाड्यांच्या वार्षिक अहवालात रखडपट्टी वाढलीये असं म्हंटलं होतं. यावरून अनेक खिल्लीखोरांनी (political comedians) टोण्याची चांगलीच टोपी उडवली! Lol

आ.न.,
गा.पै.

गामा पैलवान | 19 January, 2012 - 03:46 नवीन
नितीनचंद्र,

अहो, अशी उपमा साक्षात टोनी ब्लेअरने दिलेली होती. ब्रिटनचा पंतप्रधान असतांना (साल आठवत नाही)

या अर्थाच्या कवीता पण मायाजालावर सापडल्या म्हणुन प्रतिसाद बदलुन " जो न देखे " असा लिहला.

'परी' तू जागा चुकलासि.
काल्पनिक असल्यामुळे ठीक आहे. नाहीतर कठीण होते...>> Lol Lol

पण सांगा ना त्या परी ला काय झालेल??