शोले मराठीत येतोsssय.

Submitted by विजय आंग्रे on 6 January, 2012 - 00:21

शोले मराठीत येतोsssय, 'अरे ए सांबा, कित्ती माणसं होती?'

061105-Sholay-Amitabh.jpg

अमिताभ आणि धर्मेंद्नने अजरामर केलेली जय-वीरूची जोडी, बसंती टांगेवाली झालेली हेमा मालिनी, संजीव कुमारने साकारलेला हात नसलेला ठाकूर आणि राधा झालेली जया बच्चन या सा-या ' चिरंजीव ' भूमिका जशाच्या तशा मराठीत येणार आहेत. फक्त गंमत म्हणजे हा मराठी सिनेमा पूर्णपणे विनोदी असेल.

मधुर भांडारकच्या ' चांदनी बार ' चे सहायक दिग्दर्शक विकी खरात हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. अमिताभ-धर्मेंद्नचा जय-वीरू भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाने पडद्यावर धुमशान घालणार आहेत. तर ' हे हाथ मुझे दे दे ठाकूर ' म्हणणारा गब्बरसिंग मकरंद अनासपुरे पडद्यावर आणणार आहे. सर्वात धमाल म्हणजे हात नसलेला हा ठाकूर साक्षात अशोक सराफ साकारणार आहेत.

आता या अजरामर कलाकृतीची हिंदीत आलेली नक्कल (रा.गो.व. की आग) हा सिनेमा आपण(?) पाहीलाच आहे. आता पुन्हा मराठीत याची नक्कल बनतेय.

सविस्तर वृत्त येथे वाचा-

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजीवकुमार बहुधा सचिन (महागुरू) असावा.

सचिन ने जुन्या शोलेत रोल केला होता. त्याच बरोबर तो शोलेच्या शुटींगच्या वेळेला डायरेक्टर चा असिस्टंट म्हणुन पण काम हरत होता. त्यावेळेचे काही किस्से त्याने एकापेक्षा एक मधे सांगितले आहेत.

>>> आणि हो इक्बालच्या (सचिन) वडीलांचीही भूमिका तेच एवरग्रीन ए.के. हंगलच करतील. <<<

ते गेले की २०१२ मधेच. मग प्लँचेट करून बोलावणार की काय त्यांना ? Uhoh
त्यापेक्षा ही भुमिका नविन एके यांना दिली तर ? Wink

तसेच सुरमा भोपालीला विसरलात सारे.

अहिराणी शोले:

विरु: बसन्तीSSS हाई कुतल्ड्यासना समोर नाचन नइSSSS!

***********

गब्बरः अय साम्बा, हाई रामगढवाला लोके व्हवा/पोरीस्ले कोण्त्या चक्कीन पीठ खावाडतस रे!

************

ठाकुरः जा आन सान्गी द्या तुमन्या गब्बरले. रामगडवाला लोकेस्नी आते कावरेल कुतल्ड्यासले रोटी टाकन बन्द कर देयेल शे!!!

(इब्लिसदा, प्लीज करेक्ट मी)

चित्रपट ब्लॉकबस्टर बनवायचा असल्यास ...

अमिताभ - अंकुश चौधरी
धर्मेंद्र - स्वप्निल जोशी

हेमा मालिनी - ऑफकोर्स सई Wink
जया भादुरी - उर्मिला कानिटकर

गब्बर - जितेंद्र जोशी (खुरट्या दाढीत)
ठाकूर - संदीप कुलकर्णी

ईतर कट्टा गँगला असरानी, सुरमा भोपाली, केष्टो यांच्या भुमिका वाटता येतील.

हेलनच्या डान्ससाठी गेस्ट अ‍ॅपीरन्स उर्मिला मातोंडकरला विनंती करता येईल.

आता फक्त उरला रामलाल - तो बनायची कुर्बानी कोण देणार ?

धर्मेंद्र - स्वप्निल जोशी
<<
अरेरे. स्वप्निल जोशी = विरु???

मला वाटते 'गब्बर' ची भुमिका अशोक सराफ छान करतील.

वेताळ पंचवीशी,
अहो ते दुनियादारीशी सांगड घालत बनवलेय.
हवे तर फार तर जितेंद्र जोशीला वीरू करू शकतो.
पण मग बघा हं, स्वप्निल जोशीला गब्बर बनवावे लागेल Proud

गब्बर - जितेंद्र जोशी (खुरट्या दाढीत)

मग तो हेमामलिनीला नाचवायच्या ऐवजी धर्मेंद्राकडे बघुन ओठावर जिभ फिरवुन मराठी शोलेला मराठी दोस्ताना मधे बदलेल.

य आधी नो एंट्री (पुढे धोका आहे ) येवून गेला, एखादा चित्रपट अगदी जस्सा च्या तसा मराठीत तयार करुन काय मोठे तीर मारले ह्यांनी असा प्रश्न उपस्थित होतो. शोले कडून काहीतरी बदल असेल हीच अपेक्षा.

य आधी नो एंट्री (पुढे धोका आहे ) येवून गेला,
>>>>>>>

मला तो चित्रपट कधी आला कधी गेला जल्ला मेलं कळलच नाही.
फक्त पोस्टरवरची लाल बिकिनीतली सई तेवढी लक्षात राहिलीय. Wink

रॉबीनहूड, डर्टी नाही, पारदर्शक Happy
जे आत तेच बाहेर..

तसेही बरेच जणांना न आवडणारी आणि ज्यांना आवडते ते देखील कबूल न करणारे अशी हि "सई" माझी अत्यंत आवडती अभिनेत्री आहे, आणि याचे कारण ती बोल्ड आहे हे नाही.

तुम्ही नीलाम्बरी अपार्टमेन्टात होतात काय?
>>>
>>>
कुठे आले हे?

गूगाळून हे मिळाले,

As all of them are related to the forthcoming Marathi film "Rada Rocks," it seems to be just a publicity stunt to gain negative publicity. I think these tricks are old now and we should not pay much heed to such things.

खरे खोटे देव जाणे, कारण मी तिथे नव्हतो Happy

बरं झालं हा पिक्चर मराठीत आला नाही ते.
कुठे इंद्राचा ऐरावत असं म्हणायला लागल असतं. शोले मधले विनोदी प्रसंग इतके भारी आहेत, तितके मराठी विनोदी पिक्चर मधे कधीच जमले नसते.

Pages