शोले मराठीत येतोsssय.

Submitted by विजय आंग्रे on 6 January, 2012 - 00:21

शोले मराठीत येतोsssय, 'अरे ए सांबा, कित्ती माणसं होती?'

061105-Sholay-Amitabh.jpg

अमिताभ आणि धर्मेंद्नने अजरामर केलेली जय-वीरूची जोडी, बसंती टांगेवाली झालेली हेमा मालिनी, संजीव कुमारने साकारलेला हात नसलेला ठाकूर आणि राधा झालेली जया बच्चन या सा-या ' चिरंजीव ' भूमिका जशाच्या तशा मराठीत येणार आहेत. फक्त गंमत म्हणजे हा मराठी सिनेमा पूर्णपणे विनोदी असेल.

मधुर भांडारकच्या ' चांदनी बार ' चे सहायक दिग्दर्शक विकी खरात हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. अमिताभ-धर्मेंद्नचा जय-वीरू भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाने पडद्यावर धुमशान घालणार आहेत. तर ' हे हाथ मुझे दे दे ठाकूर ' म्हणणारा गब्बरसिंग मकरंद अनासपुरे पडद्यावर आणणार आहे. सर्वात धमाल म्हणजे हात नसलेला हा ठाकूर साक्षात अशोक सराफ साकारणार आहेत.

आता या अजरामर कलाकृतीची हिंदीत आलेली नक्कल (रा.गो.व. की आग) हा सिनेमा आपण(?) पाहीलाच आहे. आता पुन्हा मराठीत याची नक्कल बनतेय.

सविस्तर वृत्त येथे वाचा-

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>फक्त गंमत म्हणजे हा मराठी सिनेमा पूर्णपणे विनोदी असेल.<<

मकरंद अनासपुरे गब्बरसिंगचा रोल करणार आहे. हे वाचूनच हा सिनेमा विनोदि आहे यात वादच नाही ::हाहा:

जय ( अमिताभ)- भरत जाधव. Biggrin

वीरू (धर्मेंद्नचा) - सिद्धार्थ जाधव Biggrin Lol

>>संजीवकुमार बहुधा सचिन (महागुरू) असावा.<<
हात नसलेला हा ठाकूर साक्षात अशोक सराफ साकारणार आहेत. Proud

संजीवकुमार बहुधा सचिन (महागुरू) असावा.>>>>>

बेफ़ि हा अन्याय आहे हो. सचिन फ़क्त इकबालच्याच रोलमध्ये सुट होतो (असे तोही छातीठोकपणे सांगेल) Proud

सचिन स्वतःचीच भुमिका करणार असेल बहुतेक.. फॉर द ओल्ड टाईम सेक...>>>>>>

तसे असेल तर अनासपुरे त्याला मराठीतील शोलेमध्ये मारणार नाही दिनेशराव, सत्कार करेल Happy

कारण सचिन ही मराठीतील आदरणीय व्यक्ती आहे असे समजायचेच असते

सचिनला मारण्याआधी एका सुतळीच्या खाटेवर आडवा पडलेला गब्बर एका मुंगळ्याला चिरडतो. तो मुंगळा कोण असावा?

>>मटा मधील हा लेख तुम्हीच लिहिला आहे का ?<<

@श्री
त्या लेखाची लिंक वर सर्वात खाली दिलेली आहे. काळजी नसावी Proud

वीरु: बसंती ...ह्या कुत्र्यांच्या समोर नाचु नकोस .
गब्बर (मकरंद स्ठाईट्ल मधे): कुत्रांचा प्राब्लेम हाय व्हय ...ए सांब्या कुत्री हकल ले जरा ..हॅहॅहॅहॅ

कालिया : सरकार, म्या मीठ खाल्लोय तुमचं?
गब्बर : ए तुज्या मायला तुज्या, मंग पैसं कोण देणार? गोळ्या आणायच्याती बंदुकीच्या, लो बजेट पिच्चर हाये येड्या हे हे हे हे.....(पेशल मक्याब्बर सिंग टाइप हास्य) Proud

गब्बर (मकरंद ) : अरे ये साम्ब्या, किती लोकं व्हती म्हन्तो मी?
सांबा : (हा रोल कोण करणार आहे?) : दोन मायबाप.
गब्बर (मकरंद ) : हातीच्य्यामारी. त्ये दोन आन तुम्ही हीतके तरीबी ढुं**ला पाय लावुन पळुन आले. थुत तुम्च्या मारि. ये हेम्ल्या, आन ती बन्दुक हीतं. आज मी हीशेबच करीतो. बराबर करीतो. हॅहॅहॅहॅ

Rofl Rofl Rofl

>>> आणि हो इक्बालच्या (सचिन) वडीलांचीही भूमिका तेच एवरग्रीन ए.के. हंगलच करतील. <<<
कोण जाईल बोलवायला? Wink Proud

आगरी शोले.

गब्बर : कती मानसा व्हती?
सांबा : दोनुच व्हती
गब्बर : ती दोन तुमी तीन. तरीबी हलवित आलात ! कुटं हाय माजी एके फोर्टी शेवन. कुट्टं? त्याज्याआयला करगोट्यान आराकली वाट्टं. आयशीनी ल्हानपनी करगोटा बांदला व्हता तो जवानीन कवरा टाईट झाला बग.

Pages