गैरसमज नसावा, निव्वळ विनोदासाठी २, (प्रेमवीराचा कबुलीजबाब)

Submitted by pradyumnasantu on 4 January, 2012 - 14:41

एका प्रेमवीराचा थोडक्यात कबुलीजबाब

पैलवान पाटीलच्या मुलीशी माझी झाली दोस्ती
मुलगी गोड फार
तिला आवडायचं थोडक्यात बोललेलं
अजिबात आवडायचं नाही पाल्हाळ
*
मी सविस्तर सांगायला गेलो ती दिसते किती सुंदर
तर ती म्हणाली ’बाबारे थोडक्यात आवर’
(न) आवरुन मी सरळ घेतलं तिचं चुंबन
ती झाली लाल तसं म्हणालो, ’आता का?’
कसा वाटला हा थोडक्यातला ’मुका?’
तिनं सरळ काढली चप्पल
उठवली माझ्या गालावर
आणि म्हणाली,
तुझ्या मुक्क्यावर हा घे माझा शिक्का
*
(तसा तो मोठाच होता धक्का)
तरी मी (नाइलाजानं) गेलो विसरून बरं का
पुढच्याच आठवड्यात
तिच्या गालावर हात फिरवून
मी (थोडक्यात) सांगितलं की मी केलंय तिला माफ
उत्तरादाखल तिनं पाटीलसाहेबांना मारली हाक
त्यांनी दोन तीन पैल्वान आणले बरोबर
आणि (थोडक्यातच) केलं मला साफ

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तरी मी (नाइलाजानं) गेलो विसरून बरं का
विसरून जान्याव्यतिरिक्त दुसरा काहि पर्याय आहे का?
मज्या आली.

,<<<<गाडी चुकली की वो. सध्या कुठल्या हास्पीटलामंदी हायेत?>>>>
डॉक्टर, म्या पाटील पैलवान बोल्तुय. जरा स्पंजिंगवाल्या नर्सांची काळजी घ्या बरं का! प्रेमवीर आनून टाक्ल्यात म्हनून म्हट्लं!!