गुजराथी हांडवा

Submitted by राजुल on 4 January, 2012 - 01:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ वाटी तांदूळ,१ वाटी उडीद डाळ,१/२ वाटी चणा डाळ,२चमचे मेथी दाणे, १/४वाटी दही
१ वाटी किसलीली दुधी,१/४वाटी चिरलेली कोथिंबीर, २ चमचे आले-लसूण्-मिरची पेस्ट,कडीपत्ता,मीठ,३ चमचे साखर,१/४ चमचा हळद,१/२ चमचा मीरपूड,१/२ चमचा तीखट,३ चमचे तीळ, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, १/४ चमच हिंग,१ चिमूट सोडा.

क्रमवार पाककृती: 

तांदूळ-डाळी-मेथी दाणे ५ते६ तास भिजवून, धुवून वाटून घेणे.त्यात दही टाकून किमान ८ते१० तास मिश्रण फरमेंट करणे.त्यानंतर त्यात दुधि, कोथिंबीर, मीठ, साखर, मीरपूड, आले-लसूण- मिरची पेस्ट घालून व्यवस्थित हलवून घेणे.१चमचा तेल गरम करून मोहरी,जीरे, कडिपत्ता, हळद, हिंग,दीड चमचा तीळ,ति़खट टाकुन फोडणी करणे व ती तयार मिश्रणात घालणे.चिमूटभर सोडा टाकून हलवणे. हे मिश्रण आता हांडवा करण्यास तयार.
नॉनस्टिक कढई मधे १ चमचा तेल गरम करून त्यात थोडे तीळ घालावेत व त्यावर लगेच ३ डाव मिश्रण ओतुन कढईवर झाकण ठेवावे.कढई छोट्या गॅसवर एकदम सिम वर ठेवावी व ८ते १० मिनीटाने हांडव्याची खालची बाजू गोल्डन ब्राऊन रंगावर क्रिस्पी भाजून घ्यावी. नंतर हळूवारपणे चमच्याने हांडवा उलटवून दुसरी बाजू परत ७/८ मिनीटे भाजून घ्यावी. थोडेसे गार झाल्यावर त्याचे स्क्वेअर तुकडे करणे.
ह्याच पद्धतीने अजून हांडवे करून घेणे.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
अधिक टिपा: 

हांडवा गरम गरम जास्त छान लागतो. त्यात गाजर, मटार ई. पण घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
सासर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार. आता या मिश्रणाचे तयार पाकिट मिळते, ते भिजवून असे भाजले की झाले. हमखास जमतो, असे मिश्रण वापरल्यास.

अश्विनी के: फार मस्त यूनिक टेस्ट आहे याची,नक्की आवडेल.
दिनेशदा: हो बरोबर, पण तयार पाकिट मिळत नसल्यास, अशा पद्धतीने केले तरी जमतो,याला पूर्वतयारी लागते,पण तसा ईझी आहे करायला.
सूलेखा: मलापण Happy

छान.

yaachaa vegalaa cooker milato maazyaakaDe aahe tyaat evaDhe tel vaaparaave laagat naahee mee photo taken tyaachaa Happy maazaa pan khuup aavadata padartha aahe haa

सरस छे | Happy

मी आज ह्या पद्धतिने हांड्वो करुन पाहिला - खूपच छान चव आली. मी उडदाची डाळ कधीही एवढ्या प्रमाणात घेतली नव्हती - नेहमी पाव वाटी घेत होते. आता ह्याच मापाने हांडवो नेहमी करणार हे नक्की. राजुल, खूप छान कृति दिल्याबददल धन्यवाद! अमी

वरील मिश्रण हांडव्यासाठी मिळणार्‍या स्पेशल कुकरमध्येही बेक करता येते.सोबत फोतो देत आहे त्यावरून कळेल./>DSC03983.JPGDSC03984.JPGDSC03991.JPGDSC03992.JPGDSC03993.JPGDSC03994.JPGDSC03995.JPGDSC03996.JPG

स्वप्ना तुषार

आपण दिलेले फोटोतल हे केक पात्र आहे, पुर्वी म्हणजे २० वर्षा पुर्वी माझी आई अश्याच पात्रात केक

बनवत असे. खाली वाळू भरून वर केक ठेवयचा. छान केक होत असे त्यात.

रच्चाक, हे भांड हांडवा बनवण्या साठी सुद्धा चांगल असेलच.

छान आहे पाककृती.
मी मायक्रोवेव्हमध्ये करून पाहिला. आयताकृती लोफ डिश वापरली.
सोडा नुसता न घालता, तेल आणि लिंबाच्या रसाच्या मिश्रणातून घातला. कडेला मस्त कुरकुरीत आणि मध्ये सॉफ्ट असा मस्त झाला हांडवा.

पाककृती मस्त आहे, करून बघेन (वाटीच्या size वर अवलंबून आहे) पण ३ वाट्या तांदळाचा हांडवा ४ लोकांसाठी ? हेच प्रमाण आहे का?