सागरगड उर्फ खेडदुर्ग...

Submitted by सेनापती... on 3 January, 2012 - 00:19

पेण - वडखळ - अलिबाग रस्त्यावर अलिबागपासून ७ किमी. अलीकडे खंडाळे गावातून गडावर जायला सोपी वाट आहे... फारसा इतिहास ज्ञात नसला तरी पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांच्या यादीत सागरगड होता. गडाच्या माथ्यावरून समुद्रातील हालचाली स्पष्ट दिसत असल्याने गडाला नक्कीच बरेच महत्व असावे.

धागा काढायचा राहून गेला होता. ह्या काही प्रचि खूपच उशिराने टाकतोय... Happy

१. गावातून निघालो तेंव्हा... लक्ष्य होते सिद्धेश्वर आश्रम...

२. जरा वरच्या अंगाला गेलो की धबधबा असा जवळून दिसतो... Happy

३. सिद्धेश्वर आश्रम...

४.

५. सागरगड माची गाव...

६.

७. एके ठिकाणी बुरुज समोर उभा ठाकला तेंव्हा लक्ष्यात आले की आपण किल्ल्याच्या आत आलेलो आहोत. कारण असे बुरुज सागरगडाच्या बालेकिल्ल्याला आहेत...

८. जेवून घेतले तो पर्यंत धुके गायब झाले. मग फोटोगिरी सुरू झाली. हा मगासचाच बुरुज. आता अधिक स्पष्ट झाला होता.

९. बालेकिल्ल्याच्या तटबंदीची बरीच पडझड झालेली आहे. सर्वत्र झाडे आणि त्यांची मुळे यांचेच राज्य..

१०.

११. बालेकिल्ल्याच्या आतील शिवमंदिर...

१२. धुके हटले आणि अखेर जरा पुढून वानरटोक सुळका दिसू लागला.

१३. पठारावर वस्तीच्या खुणा आहेत. काहींची जोते देखील फारशी उरलेली नाहीत... एक सदर सदृश्य बांधकाम शिल्लक आहे. त्या बांधकामाची पश्चिमेकडील भिंत इतिहासाच्या खुणा जागवत अजूनही तग धरून उभी आहे.

१४. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी एक टेकडी आहे... तिथे आत्ता कुठे हिरवळीचे साम्राज्य सुरू होत होते.

१५. वानरटोक सुळका - सुळक्याच्या पायथ्यापासून उंची फक्त १२० फुट असून चढाई सोप्या श्रेणीत मोडते. सागरगडाच्या ह्या टोकाच्या डाव्या बाजूने खाली उतरून सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोचता येते. कोणाला चढाई करायची असल्यास १०० फुटी २ दोर, २ मेख आणि पाचारी घेऊन जाणे. चढाईला ३-४ तास पुरे होतात.

१६. परतीच्या मार्गावर धुके नसल्याने खूप खालून आणि दुरून पुन्हा एकदा सुळक्याने दर्शन दिले... Happy

१७. गडावर जाताना धुक्यामुळे बघायचे हुकलेले गडाचे मुख्यद्वार. द्वार पडले असले तरी बुरुज अजून उभे आहेत... पण कधीपर्यंत!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे रोहन...एकदम फ्रेश करणारे प्रची...

पावसाळ्यात सागरगड हा एक दिवसाच्या भटकंती साठी एकदम मस्त ठीकाण आहे...फक्त हा किल्ला इतर डोंगररांगांपासून खिंडीने विभागला गेल्या कारणाने जवळ जाईतोपर्यंत दिसत नाही त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता असते.....खिंडी पलीकडील पळी गावातूनही किल्ल्यावर येता येते.....आम्ही गेलो होतो तेव्हा आश्रमाच्या रंगरंगोटीचे काम चालू होते...

ऊत्तर शिवकालात प्रामुख्याने हा किल्ला आंग्र्यांच्या अधिपत्याखाली होता आणी किल्याच्या दक्षीणेकडचे (वानरटोक) हे कडेलोट टोक म्हणून ओळखले जायचे..

खंडाळे गावाकडून जाताना आश्रमाच्या जवळ असण्यार्‍या धोंदाणे धबधब्याच्या (वरच्या प्रची १, २ मधील) पाठीमागील जराश्या कठीण वाटेने पुढे गेल्यावर एक लेणे आहे...त्याला सप्तर्षीचे लेणे किंवा सिद्धेश्वराचे लेणे म्हणतात. लेण्यात अर्धवट खोदकाम करून सोडून दिलेले दिसते... माझ्या मते हे लेणे शेजारच्या रामधरणे लेण्यांच्या समकालीन असावे.

मस्तच Happy