"सोबतीचा करार" - प्रकाशन समारंभ

Submitted by समीर on 25 August, 2008 - 03:22
ठिकाण/पत्ता: 
एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.

सस्नेह निमंत्रण

सीडी प्रकाशन समारंभ

मायबोलीकर आणि स्टार कवी वैभव जोशी यांच्या दर्जेदार मराठी गजलांची सुरेख मैफल.

संगीत दिग्दर्शन : आशिष मुजुमदार
प्रमुख अतिथी : सचिन खेडेकर व कवी सौमित्र
गजल गायन : दत्तप्रसाद, अनुराधा, अमोल आणि वैशाली सामंत.

Nimantran_Patrika.jpg

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Monday, September 1, 2008 - 18:00 to 21:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं समीर ते बहुतेक स्टार माझा कवी असं आहे. चु. भु. दे. घे.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

वैभवा, मनापासून शुभेच्छा!

वैभव ... खूप खूप शुभेच्छा !

आपल्या स्वाती ने म्हटली आहेत ना काही गाणी त्यातली? ती नाहीये का प्रकाशन समारंभात ?

शोनू, मी म्हटलेली गाणी अल्बमच्या final version मधे घेता आली नाहीत.
पण अल्बम फार सुंदर झाला आहे, आणि दर्जेदार गझल ऐकण्याची आवड असणार्‍या सगळ्यांनी अगदी आवर्जून संग्रही ठेवावा.

अभिनंदन वैभव. खूप खूप शुभेच्छा!

वैभवा....... तुला खूप खूप शुभेच्छा रे.......!!
आता असाच खूप खूप पुढे जा....आम्हा सगळ्या मायबोलीकरांच्या लाडक्या कवीराजाला मानाचा मुजरा Happy

वैभवा, मनापासून अनेकानेक शुभेच्छा! हा आणि पुढला प्रवास आनंदाचा आणि समाधानाचा होवो, रे.

वैभव, शुभेच्छा! अन अभिनंदन!

वैभव, अभिनंदन. काल तु गडबडीत असल्याने बोलता आले नाही. उत्तम झाला कार्यक्रम. सही मजा आला. Happy

कालचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला. बरीच गर्दी होती. वैभवची लोकप्रियता निश्चितच कळत होती. प्रचंड ट्रॅफिकमुळे माझी सुरुवात चुकली. मी गेले तेव्हा वैभव 'वगैरे' रदिफ असलेली गझल ऐकवत होता. ती मस्तच होती. वैशाली सामंतांनी 'ऋतू येत होते ऋतू जात होते' अल्बममधे म्हणली आहे ती कार्यक्रमात सादर केली. याचं संगीत सुंदर!

दत्तप्रसाद रानडे आणि अमोल निसळ दोघांनी मिळून म्हणलेली सुफि ढंगाचं संगीत दिलेली 'धीरे धीरे पछतायेंगे .. ऐसी भी क्या जल्दी है' अप्रतिम! अर्थात वैभवनीच लिहीलेली ..

सौमित्रचं भाषण हा कार्यक्रमाचा कळस म्हणावा लागेल इतकं सुंदर झालं. वैभवमधे तो गालिबला पहात होता यावरुन वैभवकडून काय प्रतिच्या अपेक्षा आहेत ते लक्षात येईल. वैभवला त्यानी 'गालिब, तू कुठे आहेस? ' ही त्याची उत्कृष्ट कविता अर्पण केली. त्याचं त्याने केलेलं सादरीकरण अतिशय उत्कट असंच होतं.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

अरे रे, एवढं सगळं झालं? मी खुपच चुकवलं म्हणजे.
मला फक्त भाषणं आणि त्याआधीच्या गझलचा शेवट मिळाला.

वैभव तुझं आणि तुझ्या सहकार्‍यांच हार्दिक अभिनंदन Happy

मोरया!!!

कार्यक्रम खरेच बहारदार झाला... शब्दात वर्णन करणे कठीणच

'सोबतीचा करार' ची सीडी परवापासून सर्व Leading Stores मध्ये उपलब्ध होईल
किंवा वैभव कडूनही घेता येईल... त्यासंदर्भात वैभवला ९८९०९६६६७३ ह्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

  ================
  गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!

   अभिनंदन मित्रा, तोडलस बघ.....
   पुढच्या रिलिजची लवकरात लवकर वाट पहातो आहे

   अताशा असे हे मला काय होते, कुणा काळचे पाणी डोळ्यात येते......