फ्लोरिडा वॉल्ट डिस्ने पार्क

Submitted by स्वराली on 25 December, 2011 - 21:50

मागच्या वर्षी मार्च मध्ये फ्लोरिडा ला जायचा योग आला होता ...म्हणजे आणावा लागला...त्याचे असे झाले कि मार्च मध्ये अमेरिकेमध्ये मुलांना स्प्रिंग ब्रेक असतो.
तसे बरेच ब्रेक असतात.तेव्हडेच मुलांना हुंदडायला बरे!
म्हटले यावेळी आपण का मागे राहावे! नवर्यानेही हो, नाही म्हणता म्हणता होकार दिला.मग आम्ही मी,आणि माझ्या मुलाने त्याला विचार करायला वेळच नाही दिला.
जास्त विचार करून ताण येतो ना!
ते जावू द्या...सर्वप्रथम आम्ही डिस्ने पार्क बघायचे ठरवले.तसे बरेच आहेत पण आम्ही ५ दिवस फ्लोरिडा मध्ये असल्याने मुख्य पार्क करायचे ठरवले.सगळ्यात आधी एपीकोट पार्क ला गेलो.एखाद्या स्वप्ननगरी मध्ये गेल्याचा भास झाला.तसे खूप काही लिहिण्यापेक्षा म्हटले फोटो ने जास्त मजा येईल म्हणून माबोकरांसाठी खास.

नंतर विकीपेडिया मध्ये वॉल्ट डिस्ने बद्दल माहिती वाचली त्यात होते कि लोकांना आनंदी करण्यासाठी जी स्वप्न- नागरी त्याने उभारली ती तो पाहू शकला नाही .
खरेच आबाल वृद्ध सगळ्यांचा विचार करून त्याने ही पार्क्स उभारली आहेत.नंतर त्याचा भावू रॉय डिस्ने याने हे स्वप्न पूर्ण केले आणि त्याला "वॉल्ट डिस्ने वर्ल्ड" नाव दिले.

अशा सुंदर फुलांच्या ताटव्याने येणार्याचे स्वागत होते.

हे छोटे गाव पाहून पुण्याच्या संभाजी उद्यानातील देखाव्याची आठवण झाली.


धावणारी छोटी रेल्वे पाहायला मज्जा येते खरी.

हिरवीगार हिमगौरी आणि सात बुटके!

देशांची वैशिष्ठे लक्षात घेवून हॉटेल्स साकारली आहेत.

एपिकोत पार्क बघायला आम्ही ११ वाजता सकाळी सुरुवात केली .खूप चालण्याची तयारी असावी लागते.नाहीतर रात्री ११ वाजेपर्यंत सर्व पाहून होत नाही.

खरेखुरे नाही पण मंगळावर जायचा अनुभव घेता आला.

यात बसुन..! एक तास रांगेत उभे राहावे लागले तेव्हा नंबर लागला.

एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना खूप छान बागेतून फिरायला मजा येते.

इथे गेल्यावर आपण छोटे होवून जातो!" Honey I shrunk the kids " मुलांसारखे.

जपान मधील pagoda

रात्री निमो वर्ल्ड पाहिल्यावर मात्र पाय खूप दुखत आहेत असे जाणवायला लागले.
मग परत निघालो.मुलगा मात्र उत्साहात म्हणत होता उद्या मॅजिक किंग्डम ला जायचे आहे ना!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! ऑरलॅंडोला १९९६ व नंतर १९९८ मध्ये दुसर्‍यांदा जायचा योग आला होता. तिथल्या सर्व पार्क्स अप्रतिम आहेत.

वॉव्..फुलांची बहार आलीये!!!
राईड्स पण घेतल्या असतील ना??? त्यांचेही फोटो टाक..