चिकन लहसूण (बिहारी पद्धतीने)

Submitted by आबा. on 25 December, 2011 - 04:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ कि. चिकन, १/२ कि. कांदा, मोहरीचे तेल, ५-६लसणाच्या कुड्या, १ इंच आले, हळद, मीठ,

हिरव्या मिर्च्या २-३, चिकन मसाला, गरम मसाला, २ लसूण सोलून

क्रमवार पाककृती: 

प्रथन चिकन स्वच्छ धुवून घ्या व त्याला १ चमचा हळद आणि थोडे मोहरीचे तेल चोळून घ्या. सर्व कांदा उभा चिरून घ्या. मिरचीचे लहान-लहान तुकडे करून घ्या आणि आले-लसूणाची पेस्ट करून घ्या.

DSCN6274.JPG

आता कढईत तेल गरम करून घ्या व त्या तेलात आख्खे लसूण तळून घ्या. (हे काम फार काळजीने करावे. लसूण टाकल्यानंतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. अस्मादिकांचा एकदा हात भाजल्यापासून मोठया ताटाचा उपयोग ढालीसारखा करतो. Happy )

DSCN6280.JPG

लसूण काढल्यानंतर तेलात मिरचीचे तुकडे आणि कांदा टाका. ८-१० मिनिटे कांदा परता व त्यातच
चिकन व तळलेले आख्खे लसूण टाका. कढईला खाली न लागेल अशा बेताने हे मिश्रण परतत राहा.

DSCN6282.JPG

१० मिनिटांनंतर चवीनुसार मीठ घाला. त्यामध्ये आता आले-लसुणाची पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला व अर्धा ग्लास पाणी टाका.
नंतर जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणात पाणी टाकून १५-२० मिनिटांपर्यंत शिजवत राहा.

DSCN6292.JPGDSCN6293.JPG

ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते. हा आख्खा लसूण चोखून खायचा.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

१.चिकनचे पीस मध्यम आकाराचेच घ्यावेत अगदी लहान असू नयेत.
२. फार ग्रेव्ही ठेऊ नये. (अंगापुरता रस्सा ठेवा. Proud )

माहितीचा स्रोत: 
कंपनीमधील बिहारी मित्र
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकन सोबत लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच खायच्या? की, साली काढुन?>>>>>>>>>>>>> हो अक्खेच खायचे लसुण...शिजल्यनन्तर त्याचा गर अगदी नरम होतो....मी ग्रेव्ही मधे असाच कच्चाच टाकुन देते लसुण....तळल्यावर कसा लागतो ते माहित नाही....हे माझासाठी नवीन आहे....:)

शनिवारी या रेसिपीने केलं चिकन. इथल्या लसूण पाकळ्या एकदमच जाडजूड असतात म्हणून मी त्या जराशा ठेचून घेतल्या. लसूण तळायला घेतल्यापासून मुलगी सारखी स्वैपाक घरात घोटाळत होती Happy

जेवताना पण माझ्या अन नवर्‍याच्या पानातून लसूण कुड्या वेचून खाल्ल्या तिने.

सुटसुटीत रेसिपी पण तरिहि चवीला एकदम मस्त . फोटो काढायच्या आधीच फस्त झालं ना राव !

एक नंबर अन ऑथेंटिक!! आम्ही बिहारात असताना सरासरी दर 2 दिवसाआड एकदा हे फससक्लास प्रकरण एकदा होतच असे, असेच मटण सुद्धा उत्तम होते त्यात खास मजा वेगळी अजून पहिले तेल गरम करून कांदे अन खडे मसाले घालून परतायचे मग त्यात मटण घालून परतायचे वरतून पूड मसाले अन मीठ पसरायचे म्हणजे निव्वळ पसरायचे त्याच्या मधोमध एक लसणीचा कांदा ठेवायचा अन थोडे पाणी घालून बेलाशक झाकून सोडून द्यायचे 40 मिनिटे ते 50 मिनिटे जबऱ्या प्रकार होतो अन हा प्रकार मोकळ्या फडफडीत भाताबरोबरच उत्तम लागतो (बिहारी आरवा तांदूळ असला तर आनंदच आनंद)

आमचा एक हवालदार त्यात सगळे झाले की 'मांस शुद्ध करायला' म्हणून त्यात पावशेर साजूक तूप सोडी वरतून आधी मला कसेसेच होत असे ते पाहून पण चव खरंच अप्रतिम येते

मस्तच आहे रेसिपी. करुन बघेन नक्की.
लसणाची सालं तोंडात येत नाहीत का पण खाताना ? किंवा ग्रेव्हीत सुटी होत नाहीत का परतताना ?

लसणाची सालं तोंडात येत नाहीत का पण खाताना ? किंवा ग्रेव्हीत सुटी होत नाहीत का परतताना ? >> ग्रेव्हीत सुटून आली नाहीत, एकेक पाकळी सुटी करुन ठेचून घातली होती मी. मस्त मउ शिजल्या होत्या ग्रेव्हीमधे. जरासं बोटाने स्क्वीझ करुन सालं सुटून येत होती पानात घेतल्यावर.

सोन्याबापू, आता एकदा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मटण करुन पहाणार. वाटण - घाटण, धीमी आंच पे भुनो , तेल सुटे पर्यंत परता वगैरे भानगडी नसलेल्या रेस्प्या एकदम आवडत्या Happy

Pages