प्रसंगावधान : काय करावं अशा वेळी ?

Submitted by असो on 23 December, 2011 - 13:45

मंडळी

इथं जी सिच्युएशन देण्यात येत आहे ती काल्पनिक आहे हे आधीच स्पष्ट करतो. समजा, जर तुमच्या ऑफीसमधल्या एखाद्या स्त्री सहका-याने (सहकारणीने) ब्युटीक मधून शिवून आणलेला महागामोलाचा ड्रेस तुमच्याकडे दिला ;
थांबा. पूर्ण झालेलं नाही. अर्धविराम आहे.

तर हा ड्रेस तुमच्याकडे तिच्या मैत्रिणीकडे देण्यासाठी दिला कारण तुम्ही त्याच बाजूला राहता आणि तुम्ही विश्वास टाकण्याजोगे आहात अशी तिची समजूत आहे. तुम्ही मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्विकारता आणि ड्रेस तुमच्या ब्रीफकेसमधे व्यवस्थित ठेवून देता.

संध्याकाळी घरी जाताना घरी कुणीतरी तुम्हाला लिफ्ट मागतं. मग गप्पाटप्पा, कुचाळक्यांच्या नादात तुम्ही अर्धा प्रवास पार पाडता. इतक्यात लक्षात येतं कि मुलाचं पुस्तक आणायचं होतं. ते काम पूर्ण करता. एलआयसीचा हप्ता भरता, शेअरब्रोकर कडे जाऊन येता.

रस्त्यावर रहदारी प्रचंडच असते. सगळ्यांना शिव्या घालत घालत कसे बसे घरी पोहोचता आणि आंबलेल्या चेह-याने चहा ऑर्डर करता. पत्नीच्या कामांची यादी सुरू होते इतक्यात तुमच्या लक्षात येतं कि ड्रेस द्यायला जायचं होतं.

बायकोला सांगावं कि नाही याचा विचार करतच तुम्ही तो ड्रेस तुमच्या वॉर्डरोब मधे ठेवून देता. उद्या कामाला जाताना ब्रीफकेस मधे घालावा किंवा जेव्हां केव्हां ड्रेससकट बाहेर सटकता येईल तेव्हा नेऊन द्यावा हा विचार करता..

नंतर काही बाहेर जाणं होत नाही. सकाळी आवरायची घाई, लांबचा प्रवास, आवराआवर यात ड्रेस घ्यायचं राहून जातं आणि.. तेच होतं ज्याची कल्पना तुम्ही ऑफिसात बसून करता.

संध्याकाळी बायको स्वागताला ड्रेस घेऊनच तयार असते... चेह-यावर बदमाष हसू आणून ती म्हणत असते "काय ही सरप्राईझ द्यायची पद्धत ? मला सांगितलं असतं तर मी नाही म्हटलं असतं का ....."

पुढचे शब्द तुम्हाला ऐकू येत नसतात. ड्रेस बरोबर तिच्या मापाचा असतो..

या सिच्युएशन मधे काय करावं ?
आपली उत्तर मोलाची आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>या सिच्युएशन मधे काय करावं?<<

यात कसली आलीय सिचुएशन, ड्रेस बायकोच्या मापाचा निघाला नसता तर सिचुएशन क्रिएट झाली असती... Wink

काल्पनिक सिच्युएशन वर काय पण प्रश्न ? सिच्युएशन खरंच काल्पनिक आहे ना ? ( दिवे घ्या )
नाही म्हणजे "कोणाशी तरी बोलायचंय या ग्रुप मध्ये लिहिलंय म्हणून आपली एक शंका Wink

Pages