ह्या वर्षीचा पहिला बर्फ- माझ्या बाल्कनीतून... (जर्मनी)

Submitted by सानी on 20 December, 2011 - 04:54

दरवर्षी हिमवृष्टी होईल की नाही, हा प्रश्नच असतो. ती नक्की व्हावी, किमान ख्रिसमसच्यावेळी तरी आसमंत शुभ्र असावा, अशी बहुतेकांची इच्छा असतेच. पण ती नेहमीच पूर्ण होते, असं नाही. ह्या बर्फाची एक गंमत म्हणजे, काल पर्यंत मागमूसही नाही आणि सकाळी उठून पहावे, तर निसर्गाने बर्फाचा पांढरा शुभ्र गालिचा अंथरलेला, असाच अनुभव नेहमी येतो. फारच मनोहर दृश्य असते ते!

पहिल्या दिवशीचा बर्फ धूळ, माती,चिखल असे काहीच मिसळलेला नसल्याने फारच स्वच्छ आणि सुंदर दिसतो. हा अनुभव कॅमेर्‍यातही साठवावा आणि तुम्हा सर्वांसोबत शेअर करावा, ह्या इच्छेमुळे परवापासून म्हणजेच बर्फाच्या "नव्हत्याचे होते" होईपर्यंतचे फोटो टप्प्या-टप्प्याने काढले आहेत. तुम्हाला आवडतील, ही आशा. Happy

गेल्या ८-१० दिवसांपासून थंडी थोडी थोडी सुरु झाली होतीच. अधून मधून पाऊसही पडायचा, पण परवा दुपारी पडलेला पाऊस जरा वेगळा होता! त्या पावसाच्या थेंबांबरोबरच काही बर्फाचे पुंजकेही दिसले. मी येणार आहे लवकरच, हा संदेश घेऊन. Happy

कॅमेर्‍याने हे पुंजके व्यवस्थित टिपले नसले, तरीही, झाडाच्या गडद हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काही पांढरे ठिपके उठून दिसतायत, तेच ते बर्फाचे पुंजके.

त्यानंतर काल सकाळी बाल्कनीत पाहते, तर हे दृश्य-

काही पाऊलखुणा...

आणि आज सकाळी तर बर्फ चक्क बाल्कनीतच आला, मला भेटायला!!! Happy

गुलमोहर: 

धन्स विशाल Happy तेवढा एकच दिवस एवढा बर्फ पडला. त्यानंतर गायबच... जसा काही मी फोटो काढण्यापुरताच आला होता की काय? असं वाटायला लागलंय आता! Uhoh

आहाहा..सानी... मस्त मस्त!!! फ्रेश वाटलं.. आमच्याकडे नुस्तीच थंडी...बर्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍र्‍

Hi सानी.... cool फोटो आहेत सगळे..
जर्मनी मधे कुठे राहाता... ?
मी Cologne city मध्ये आहे...

सुपर्ब फोटोज सानी.. कसला भराभरा पडला सुद्धा.. काय लक्कीयेस्..बालकनीतून असं दृष्य पाहायला मिळतंय म्हंजे... वॉव!!!!!

खूप खूप फोटो काढ आणी दाखव आम्हाला..

Pages