माझे मातीचे प्रयोग - ५ (Crystalline glazes continued)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

समर सेमिस्टर मध्ये जे क्रिस्टलाइन ग्लेझेस बद्दल काम करायला आम्हाला शिकवले तेच या फॉल सेम मध्ये स्वतःहून पुढे चालू ठेवायचे असे मी ठरवले होते. खर तर हे इतके जास्त वेळखाऊ काम होते की क्लास करतांना मी परत हे कधी करायला घेईन असे वाटले नव्हते. खर तर I never realized that I was actually addicted to crystalline glazes.
फॉल सेम मध्ये मी खर तर पाण्याचे जग/ चहाची किटली इ. (pouring vessels) क्लासमध्ये नाव घातले होते. ह्या क्लासच्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात क्रिस्टलाइन ग्लेझ करायचे असतील तर परवानगी मिळेल असे सरांनी सांगितले.
हे म्हणजे चार ऐवजी आठ क्रेडीटचा कोर्स घेतल्यासारखे झाले. तेव्हा चहाच्या किटल्या वगैरे सगळ्या पाट्या टाकून मग ही काही भांडी केली.
फारच थोडी भांडी भट्टीत तडकली- फुटली नाहीत, रंग चांगले आले ती ही काही जमलेली भांडी.
खाद्य पदार्थ ठेवता यावेत म्हणून या भांड्याना आतून क्रिस्टलाइन ग्लेझेस न वापरता Lead Free, Food safe ग्लेझेस वापरले आहेत. क्रिस्टलाइन ग्लेझचा वापर फक्त बाहेरूनच केला आहे.
Turquoise Crystalline Lidded Jar : (७" बाय ५")
१.

२. Glossy Green Crystalline Lidded Jar (८" बाय ६")

३. Purple Crystalline Lidded Jar (६" बाय ६")

४. Off white Crystalline Lidded Jar (६" बाय ५")

५. Turquoise Crystalline Vases (५")

क्रिस्टलाइन ग्लेझेस म्हणजे नक्की काय, भांड्यांवर ते फुलांसारखे दिसणारे क्रिस्टल्स कसे येतात याबद्दल मागच्या भागात लिहीले होते. त्याचा दुवा माझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze.

खुपच सुंदर आहेत..सरावाने अधिक चांगली जमतील...या भांड्यांवर मी मागे तुला सांगितल्याप्रमाणे रंगवताना आधी "स्मोक" ने बेस करुन वर पानेफुले करता येतील का?कदाचित शक्य होईल असे मला वाटते..

फारच इंटरेस्टिंग आहे ही कला.
तुमचे कौशल्य तर अगदी वाखाणण्याजोगे.......... खूप छान.
अनेक शुभेच्छा.

सह्हीच केलयस की रूनी!

मला ती पर्पलची शेड खूपच आवडली. पण सगळीच भांडी सुरेखच दिसतायत. एकदम गोडुली. Happy

रच्याकने, मानुषीला भांड्यांबद्दल अनुमोदन. या कलाकृतींकरता छानसा मराठी शब्द नाही का? भांडी म्हटली की ती वाजणारीच आठवतात. फारच आवाज करणारा शब्द आहे तो. मडकी पण नको वाटतो. बरं वास मराठीत लिहिला की नाक बंद करावंसं वाटतं. पॉट म्हटलं की प्वाटाकडे लक्ष जातं. कोणी शब्दप्रभुंनी चांगला शब्द शोधा बरं .......

मस्तच. मागच्या भागात हा प्रकार किती किचकट आहे ते समजले होते. प्रचंड संयम लागत असणार. त्या भागातल्या कलाकृतीच खूप आवडल्या होत्या. ह्या वेळची भांडी त्याच्याहून सरस आहेत. आवडण्याच्या पलिकडची.

रंगसंगती पण सुंदर आहे.

अप्रतिम!! मस्त जमली आहेत ही मृत्तिकापात्रं! शेड्सही सह्ही आहेत. मला पात्रांचा पोत फार आवडलाय, असं वाटतंय की फोटोत जाणवणारा पोत प्रत्यक्षातही तसाच लागेल स्पर्शाला. Happy कीप इट अप रुनी!

Pages