’भुक्कंड'

Submitted by दामोदरसुत on 18 December, 2011 - 12:21

आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पाटप्पांमध्ये श्री फाटक यांना शाळेत असतांना पाठ केलेले एक काव्य व त्यामागची कथा पण आठवली (वय होईल तसे कोणतीही गोष्ट वेळीच आठवणे ही देखील कौतुकाचीच बाब ठरते) . ती वाचकांनाही आवडेल म्हणून सांगतो. त्या काव्याचा रचनाकार कवी होता ’भुक्कंड’! राजा काही कारणाने त्याच्यावर रागावला आणि त्याने भुक्कंडला भर दरबारात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यावर कवीने तेथल्या तेथे खालील काव्य रचून राजाला सुनावले; आणि राजाने तात्काळ त्याला दोषमुक्त केले.
ट्टिर्नष्टो भारवीयोsपि नष्टः !
भिक्षुर्नष्टो भीमसेनोsपि नष्टः !!
भुक्कंडोsहं भूपतिस्त्वंहि राजन !
भ भाः पंक्त्यां अंतकोयं प्रविष्टः !!
असे काय आहे या काव्यात कि ज्यामुळे राजा विरघळला?
या श्लोकाच्या अर्थात याचे रहस्य आहे. या श्लोकात कवी राजाला सांगतॊ,
" हे राजन, भट्टी (कवीचे नाव) गेला. भारवी (कवीचे नाव) गेला. भिक्षु (कवीचे नाव) गेला. भीमसेन गेला आणि आता मी भुक्कंडही जाणार. यावरून हे भूपति, ’भ’च्या बाराखडीत (भ भा भि भी भु ) यम (अंतक) घुसलेला दिसतो आहे ( हे आपण ध्यानी घ्यावे.)
हे भूपति आता तुमचा नंबर लागणार हे कवीने किती कौशल्याने सांगितले आहे पहा. या कौशल्यानेच त्याला जीवदान मिळाले.

गुलमोहर: 

मलाही हा श्लोक आठवतोय...ह्याबद्दल एक संस्कृत धडा होता अभ्यासक्रमात.
पुन्हा वाचतांना खूप छान वाटलं.

इब्लिस यांच्या "अ‍ॅबसोल्यूट भुक्कड ष्टोरी आहे " या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! कारण त्यामुळे मला खालील सुप्रसिद्ध सुभाषिताची आठवण झाली.
इतर कर्मफलानी यदृच्छया! विलिख तानी सहे चतुरानन!!
अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख!!
कवी म्हणतोय, " हे ब्रम्हदेवा, मी केलेल्या कृत्यांबद्दल माझ्या नशिबात काय काय वाढून ठेवायचे असेल तसे ठेव. फक्त अरसिकाला काव्य शास्त्र विनोद सांगण्याची वेळ मात्र माझ्यावर आणू नकोस."

छान माहिती.. हा वरचा श्लोक पण मस्त.. Happy

रच्याकने.. शीर्षक पाहून आधी वाटले की बेफिकीर यांच्या 'भुक्कड' वर काही लिहिले नाहीये ना... Happy

ही गोष्ट आम्हाला दहावीला संस्कृत (संपूर्ण)ला होती.
पण त्यात त्या कवीचे नाव "भुक्त" आणि राजाचे नाव "भूरिवित्त" असे होते.

भट्टिर्नष्टो भारवीयोsपि नष्टः
भिक्षुर्नष्टो भीमसेनोsपि नष्टः |
भुक्तोSहं भूरिवित्तस्तथा त्वं
भादौ पंक्तौ अन्तक: सन्निविष्टः ||

अन्तक - यम
भादौ पंक्तौ - "भ" ने सुरू होणारी ओळ, बाराखडी.

भट्टिर्नष्टो भारवीयोsपि नष्टः
भिक्षुर्नष्टो भीमसेनोsपि नष्टः |
भुक्तोSहं भूरिवित्तस्तथा त्वं
भादौ पंक्तौ अन्तक: सन्निविष्टः || >> मी वाचलेला श्लोक पण हाच होता बहुदा कारण कवीचे नाव "भुक्त" आणि राजाचे नाव "भूरिवित्त हे मला पण आठवतयं.

दामोदरसुत, बर्याच दिवसांनी हा श्लोक आठवला. धन्यवाद.

सर्व रसिकांचे हार्दिक आभार! मजसारख्या संस्कृतवर प्रेम करणार्‍या [पण संस्कृत फारसे न शिकलेल्या] माणसाला आता नव्याने आलेले, संस्कृताची चांगली जाण असलेल्यांचे, प्रतिसाद वाचून अतिशय आनंद वाटला. 'मी-चिऊ' आणि 'आनंदयात्री' यांनी त्यांना माहीत असलेला श्लोक येथे दिल्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद! त्यांनी दिलेला हा श्लोकही मला आवडला. असे फरक असलेले श्लोक बरेच आढळतात. आता हा फरक असलेला श्लोकही मी आमच्या येथील मित्रांना सांगेन. त्यांनाही तो नक्कीच आवडेल.
असा फरक असलेला, मला माहीत असलेला एक श्लोक आपल्या सारख्या रसिकांसमोर उद्धृत करायला मला आवडेल.
प्रियवाक्य प्रदानेन अवघे तुष्यंति जन्तव:! तस्मात तदेव वक्तव्यं वचने किं दरिद्रता!!
म्हणजे स्तुतीने सर्वच जण संतुष्ट होतात. असे जर आहे तर मग स्तुती करावीच. बोलण्यात दारिद्र्य कशाला दाखवायचे?
आणि दुसरा
हस्तादपि न दातव्यं गृहादपि न दीयते! परोपकारणार्थाय वचने किं दरिद्रता!!
म्हणजे 'हातातले किंवा घरातले कांही द्यावे लागत नसतांना निव्वळ बोलण्याने जर दुसर्‍यावर उपकार होत असतील तर बोलण्यात दारिद्र्य कशाला दाखवायचे?'

संस्कृत सुभाषिते अप्रतिम आहेत. यातल्या काहींची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

इथल्या काही अरसिकांच्या बरळण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून अजून संस्कृत सुभाषिते लिहावी, ही विनंती!

अ‍ॅबसोल्यूट भुक्कड ष्टोरी आहे -> सत्य.

पण "अ‍ॅबसोल्यूट एक नम्बर चारोळि, श्लोक, कविता, सुभाषित, प्रहेलिका यापैकी कहितरी आहे".

माझ्या १०वी ला शिकल्याचे आठ्वत नाही.

ओम भग भुगे भगिनी भागोदरे भगमासे ओम फट स्वाहा.. हा मंत्रही त्याच पंडीताने रचला का?

असेच एक अजुन

कारो कुंकर्णश्च कारश्च बिभीषणः
तयोर्जेष्ठः कुलःश्रेष्ठः कारो किं न विद्यते ?? Uhoh म्हणजेच रावणाचे नाव रावण असे नसुन राण असेच असायला हवे Rofl

(अवांतर : जामोप्या >>> :हहगलो:)

जामोप्या.... ओम भग भुगे भगिनी भागोदरे भगमासे ओम फट स्वाहा..

यातला ओम भग भुगे भगिनी भागोदरे भगमासे म्हणजे भ चा भाग रचला असेल बहुदा.. Wink

पण ओम फट स्वाहा हे नाथपंथीय शाबरी मंत्र संबंधित आहे...

दामोदरसुत-- फारच छान. संस्कृत सुभाषिते विसरायलाच झाली आहेत आता. पण विसरायची नाही आहेत. इथे किंवा इतरत्र आणखी माहीती द्यावी.

एक अगदीच विरोधी सुभाषित आठवतं आहे-

उष्ट्राणां च ग्रुहे लग्नं, गर्दभा: मंत्रपाठका: |
परस्परं प्रशंसंति, अहो रुपं अहो ध्वनीं||
अर्थः उंटा घरी लग्न आहे, गाढव मंत्र म्हणणार
(दोघांनाही काम काढुन घ्यायचे आहे)
म्हणुन एक मेकांची तारीफ करत आहेत.
काय रुप आहे, काय आवाज आहे!

इथे किंवा इतरत्र संस्कृत सुभाषित चर्चा व्हावी! बरे वाटेल!

परस्परं प्रशंसंति, अहो रुपं अहो ध्वनीं||

यात विरोधी काय आहे? मायबोलीवर सगळे हेच तर करत असतात.. Proud

ईंद्रधनु, तो श्लोक असा आहे.

उष्ट्राणांतु विवाहेषु गीतान गायंती गर्दभा:
परस्परं प्रशंसंती अहो रूपम अहो ध्वनी:

=============================

मूळ धाग्याबद्दल :

हा 'लेख' कसा काय समजले नाही.

यात फारसे विशेष नाही वाटले. पण छोटीशी कथा तशी छान आहेच. Happy

मात्र 'अरसिकाला काव्यशास्त्रविनोद सांगू नये' हे वाचल्यावर विचारावेसे वाटते की वरील श्लोकात (म्हणजे मूळ धाग्यात दिलेल्या श्लोकात) काव्य काय आहे बुवा?

शास्त्र तर नाहीच आहे. विनोद मात्र असला तर असेलही.

-'बेफिकीर'!

श्री. मास्तुरे आणि इंद्रधनु यांच्या सुचनेबद्दल धन्यवाद! 'परस्परं प्रशंसंती अहो रूपम अहो ध्वनी:' या सुंदर सुभाषिताचा पूर्वार्ध वेगवेगळा आढळतो पण त्यामुळे आशयात कांही फरक पडत नाही .
मूळ धाग्याला कुठे बसवायचे ते ज्याने त्याने किंवा त्याची जागा फारच चुकली असेल तर प्रशासकांनी ठरवावे. सुसुकु यांनीही अनेक चांगले पर्याय सुचविले आहेत. तो अनेकांना वाचावासा वाटला आणि हे सुभाषित्-धन जपायला हवे असे अनेकांना वाटले ही आनंदाची बाब नाही काय?