सवाई २०११ : कॅमेराच्या डोळ्यातून

Submitted by अवल on 17 December, 2011 - 09:51

001.jpg

या वेळेस सवाईमध्ये काही फोटो काढायला मिळाले. फार वेळ जाउ नये म्हणून काहीही संस्कार न करता ते फोटो इथे टाकतेय.
पहिल्या दोन दिवशी फोटो काढलेले चालतील असे वाटले नव्हते, त्या मुळे कॅमेराच नेला नव्हता. अन शेवटच्या दिवशी घाईत कॅमेराची बॅटरी चार्ज करायलाच विसरले. त्यामुळे काही कलाकारांचे फोटो नाही घेता आले.
या वेळेस स्टुडन्ट पास मिळाल्याने खुप पुढुन अनुभवायला मिळाला कार्यक्रम. अन त्याच मुळे फोटोही काढता आले. शिवाय सकाळच्या सेशन्सलाही फोटो काढायची परवानगी मिळाल्याने तिथलेही फोटो काढता आले.
मला फ्लॅश वापरायला अजिबात आवडत नाही, शिवाय फार पळापळ करून फोटो काढायलाही आवडत नाही. कलाकाराला अजिबात डिस्टर्ब न करता, आपल्या जागेवर बसूनच फोटो काढायचे हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे अनेक बंधने येतात, फोटो अगदी खुप मनासारखे नाही मिळत . पण मी अल्पसंतुष्ट आहे Happy
आशा आहे तुम्हालाही आवडतील हे फोटो. ( सगळ्यांच्या उपाध्या नक्की माहिती नाही म्हणून फक्त नावं लिहितेय, क्षमा करावी )
यात कद्री गोपालन अन व्यंकटेशकुमार यांचे फोटो नाहीत याचे फार फार वाईट वाटतय. कोणाकडे असतील तर प्लिज इथे शेअर कराल ?

उस्ताद अब्दूल करीम खां साहेब
3_8.jpg

सवाई गंधर्व
2_8.jpg

भीमसेन जोशी
1_7.jpg

अजय पोहनकर
IMG_1705.jpgIMG_1712.jpg

विकास कशाळकर
IMG_1734.jpg

अजय पोहनकर
IMG_1758.jpg

रोणू मुझुमदार
IMG_1777.jpgIMG_1777.jpgIMG_1788.jpg

प्रभा अत्रे
IMG_1795.jpgIMG_1803.jpg

योजना शिवानंद
IMG_1860.jpg

सुयोग कुंडलकर
IMG_1863.jpg

श्रीनिवास जोशी
IMG_1904.jpg

माऊली टाकळकर
IMG_1921.jpg

मालिनी राजुरकर
IMG_1931.jpg

उडिपी या छोट्या गावातील 'नृत्य निकेतन'या गृपमधील कलाकार
IMG_1975.jpgIMG_1977.jpgIMG_2015.jpgIMG_2037.jpg

शमा भाटेंच्या विद्यार्थीनी
IMG_2043.jpgIMG_2044.jpg

विजय घाटे
IMG_2057.jpg

अमजद अलि खाँ
IMG_2065.jpgIMG_2078.jpg

तंबोरे तयार करणारे मिरजकर
IMG_2103.jpg

दादरकर
IMG_2112.jpg

पद्मा देशपांडे
IMG_2150.jpg

नागराज हवालदार आणि त्यांची दोन मुले
IMG_2197.jpgIMG_2234.jpgIMG_2183.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

पराग यांनी केलेल्या सूचनेला अनुमोदन.

व्वा! सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास!
आणि योजना शिवानंद बर्‍याच वर्षांनी पाहिली पटकन ओळखलीच नाही. काळामुळे एकदम फरक पडतो माणसात.
हो आणि योजना च्या नंतरचा सुयोग कुंडलकर आहे ना...पेटीवर?

सुरेख Happy धन्स अवल, इथे शेअर केल्याबद्दल Happy

सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास!>>>>+१

धन्स मानुषी, तिचं नावच आठवत नव्हतं , अन सुयोगचं लिहायलाच विसरले Happy
>>>सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास! <<< Happy
धन्यवाद सगळ्यांना.

धन्स अवल Happy
सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास!<<<<<<<+१

अवल, धन्यवाद. दरवर्षी जायच ठरवते. पण............
सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास!<<<<<<<++++१

भावमुद्रा छान टिपल्या आहेत Happy
पण 'उल्हास कशाळकर' हे नाव नजरचुकीने दिलं गेलंय का ? फोटोत असलेली व्यक्ती उल्हासजी नाही Happy

छान.

अवल,
सुंदरच टिपल्यात भावमुद्रा.
पण अगदी वैयक्तीक भावना सांगायची, तर या कलाकारांच्या चेहऱ्यावरच्या
वार्धक्याच्या खुणा बघताना त्रास झाला. मी यापैकी अनेकांना प्रत्यक्ष बघितले
आहे. सुखाची बाब एवढीच, कि त्यांची गायकी मात्र अजून तशीच आहे.
पंडितजींच्या फोटोला हार बघायची सवय नाही होत, अजून.

मस्त आलेत सगळे फोटो!

>पंडितजींच्या फोटोला हार बघायची सवय नाही होत, अजून.

दिनेशदा, अनुमोमस्त

अवल धन्स....

खुप छान आठवणी आहेत ह्या महोत्सवाच्या. मी मध्यम वयात ( ७ वी ८वीत) असताना बाबांबरोबर जायचे. ४-५ वर्ष गेले. नंतर बाबा एकटे जायचे.

मालिनी राजुरकरांन्ना पाहुन कळ आली. बाई फारच खराब झाल्यात. ठाण्याला पं. राम मराठे महोत्सव सुरु झाला तेंव्हा पहिल्या कार्येक्रमात मी बाईंचं गाणं ऐकलं होतं. त्यान्नी त्यांचा हातखण्डा मालकंस म्हण्ट्ला. मला चीज सुध्धा आठवते आहे. "नभ निकल गयो चंद्रमा". अंगावर काटा आला होता. बाई काय तेजस्वि दिसत होत्या. त्यांचं शालीन रुप खुप दिवस डोक्यातुन जात न्हवतं. नंतर मी त्यांच्या कॅसेट, सी.डी. वेड्या सारख्या ऐकल्या. त्यांचा मालकंस, आणि जसराजांचा "ललत" "मेरो अल्ला मेहेरबान".......

मी शास्त्रिय संगीतातली जाणकार नाही. तरीही ह्या लोकांन्नी खिळवुन ठेवलं.
छान आठवणी. रोजच्या धबडग्यात हे मागे पडलं होतं. आता परत सुरु होइल....... धन्स......

सर्वांना धन्यवाद !
मीरा, अगं अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, कारण त्यांनी टप्पा असा काही गायला ना, आम्ही सगळे त्यांचं वय विसरलोच Happy काय ताकदीनं गायल्या त्या ! सगळ्यांची अगदी छुट्टी करून टाकली Happy
अगो, अगं ते उल्हास कशाळकरच ना ? की विकास ? नाही गं उल्हासच Uhoh नक्की सांगा कोणीतरी, म्हणजे योग्य बदल करते.
>पंडितजींच्या फोटोला हार बघायची सवय नाही होत, अजून< मला तर त्या फोटोकडे बघितलं की गळा भरून येत होता प्रत्येक दिवशी... मी अगदी टाळलंच त्या फोटोकडे पाहणं... अगदी परवा सवाई महाविद्यालयात गेल्यावर पुन्हा तिथे फोटो पाहिला तेव्हाही भरून आलं...

मस्त

प्रभा अत्रे अजुनही जुना आब टीकवुन आहेत. अमजद अली खाँ साहेब काय देखणे दिसतात अजुन. त्यांचा तो समाधी लागल्या सारखा फोटो खुप मस्त आला आहे.

अगं एम राजन आणि त्यांच्या नातींचा फोटो नाही टाकलास का....
त्यांचं वादन श्रवणीय तर होतंच पण प्रेक्षणीयही होतं...काय रंगात येऊन वाजवत होत्या दोघी आणि नंदीनीला तर इतकी सुंदर खळी पडत होती...

आशु, अरे, अन शेवटच्या दिवशी घाईत कॅमेराची बॅटरी चार्ज करायलाच विसरले. त्यामुळे काही कलाकारांचे फोटो नाही घेता आले. त्यात राजम आणि व्यंकटेशकुमार यांचे फोटो गेले Sad

Pages