मा. बो. प्रतिसाद

Submitted by pradyumnasantu on 16 December, 2011 - 12:01

मा. बो. प्रतिसाद

मायबोलीवरचा प्रतिसाद
जणू शेर्लोक होम्सचे भिंग
क्षणार्धात फोडते
प्रतिसादकाचे बिंग

हास्य कोणाचे निरागस,
अन कुत्सित स्मित कोणाचे
स्मायलीवरून ओळखू येते
अश्रू कुणाचे मेणाचे

कुणी जटील तर कुणी कुटील
दे कुणी बोचरे टोमणे
प्रतिसादांची फुले व काटे
उधळुनी विसरून जाणे

कोणी बसते कचेरीत अन
करते आचरटपणा बडा
वेळ काढण्यासाठी काढी
नवीन कवींना ओरखडा

माझी तुम्हा नम्र विनंती
रसिकत्वाला तुमच्या साद
नव्या कलाकारानाही तुमच्या
कौतुकाचा द्या आस्वाद

पाजा त्यांना बाळकडू
शिकवा शिक्षक होउन
खुषी मिळेलच जेव्हा बछडा
तुम्हावरच ये धावून

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कोणी बसते कचेरीत अन
करते आचरटपणा बडा
वेळ काढण्यासाठी काढी
नवीन कवींना ओरखडा>>>>>चालायच,हव तर रॅगिंग म्हणा ना!
आतापर्यंतच्या आपल्या मी वाचलेल्या कवितेतिल सर्वात चांगली.

किरण Biggrin

प्रद्युम्नसंतू, कविता भारीच! भा.पो.
सर्वांनाच इथे कौतुकाच्या थापेची अपेक्षा असते. पण ती नेहमीच पूर्ण नाही होत, मग अशा कविता, लेख लिहायचे येतेच हो मनात. पण जास्त अपेक्षा न करता लिहा बसं... इतकंच म्हणेन! Happy

सानी: मनःपूर्वक आभार. आपल्याच प्रोफाईलवरील वाक्य उर्धृत करू इच्छितो:
"शब्दासारखे शस्त्र नाही, त्याचा वापर जपूनच करावा!!!"