'घाशीराम कोतवाल'चा पहिला प्रयोग... सूत्रधाराच्या नजरेतून !

Submitted by rar on 16 December, 2011 - 01:45

१६ डिसेंबर १९७२. पुण्याच्या 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन' या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.

img001.JPG

विजय तेंडुलकर यांनी लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं.

आज १६ डिसेंबर २०११ रोजी घाशीराम चाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या निमित्ताने घाशीरामच्या पहिल्या प्रयोगापासून ते थिएटर अ‍ॅकॅडमी, पुणे या संस्थेने १९९२ पर्यंत केलेल्या, देशापरदेशातील प्रत्येक प्रयोगात सूत्रधाराची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्रीराम रानडे यांनी सांगितलेला ’घाशीराम’च्या तालमीपासून ते पहिल्या प्रयोगापर्यंतचा साक्षात जिवंत अनुभव.
img008.jpg

---------------------------------------------------------------------------

पुण्यनगरीत जायचं | राष्ट्र सेवादल कलापथकात आणि पी.डी.ए.मध्ये शिरायचं | पडेल ते काम करायचं | आणि जमेल तसं शिकायचं | पण सांगली मिरज सोडायचं | असा निर्धार करूनच मी १९५९ मध्ये पुण्यात आलो. कलापथकाची दारं शामराव पटवर्धन, शाहीर लिलाधर हेगडे आणि निळू फ़ुले यांच्यामुळे पटकन उघडली. पण पी.डी.ए.चं 'तिळा तिळा दार' उघडायला तब्बल बारा वर्षांची तपश्चर्या करावी लागली. तोपर्यंत पुण्यातला पी.डी.ए.चा प्रत्येक प्रयोग, पुरूषोत्तमच्या एकांकिका, राज्यनाट्यस्पर्धा या साऱ्या गोष्टींनी मी पार झपाटून गेलो होतो.

मी बी.एड. करीत असताना पी.डी.ए.चे श्रीधर राजगुरू यांच्याशी माझा परिचय झाला आणि त्यांचं बोट धरून मी पी.डी.ए.मध्ये शिरलो. 'जब्बार पटेल एक नवीन नाटक करताहेत. तू संध्याकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास गरवारे प्रशालेत ये'. अण्णा राजगुरूंनी मला सांगीतलं.

तोवर जब्बार काय ताकदीचा कलावंत आहे हे मी त्याच्या 'जनावर', ’लोभ असावा’, ’तू वेडा कुंभार’,’जादूगार’, ’खून पहावा करून’,’अशी पाखरे येती’ या विविध एकांकिका आणि नाटकामधून जोखून होतो. त्याच्या एकतर्फी प्रेमातच पडलो होतो म्हणाना !

संध्याकाळी गरवारे शाळेच्या हॉलमध्ये गेलो, तर माझ्याआधीच तिथे विशी-बाविशीची गोरी, घारी वीस-पंचवीस पोरं जमली होती. कुणी काय, कुणी काय गाउन दाखवलं. कुणी कुठला उतारा म्हणून दाखवला. मलाही काहीतरी म्हणून,करून दाखवायला सांगितलं.
मी डाव्या कानावर हात ठेवून वसंत बापटांच्या महाराष्ट्राच्या पोवाड्यातला काही भाग म्हणून दाखवला.

ही मराठी भूमी धन्य । अशी नाही अन्य। देउनी धनधान्य। वाढवी आम्हा काळी आई।
आधी वंदन तिच्या पायी। शाहीर हो तिची कीर्त गाई ॥ -जी-जी-जी ॥

आणि आलो परत घरी.

पुढे काही दिवसांनी पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या निमित्ताने फर्गसनमध्ये सतीश आळेकर आणि सुरेश बसाळे भेटले. त्यांनी सांगितलं, आपण ’घाशीराम कोतवाल’ हे विजय तेंडूलकरांचं नाटक या वर्षीच्या राज्य नाट्यस्पर्धेसाठी पी.डी.ए. तर्फे करतो आहे. तुझी निवड केली आहे. लवकरच तालमी सुरू होतील.

घाशीरामच्या तालमीचा पहिला दिवस आठवला की आजही माझ्या अंगावर काटा येतो. दरदरून घाम फुटतो. सूत्रधाराची - " चुकलो बामणोजी, पाया पडतो बामणोजी, माफी असावी बामणोजी" अशी छोटी छोटी संवादवजा वाक्यं म्हणताना तोंडाला फेस आला. आठ दहा दिवस असा सिलसिला सुरू होता. सहकाऱ्यांची नाराजी त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे जाणवू लागली.
आज अखेरचा दिवस, जमलं तर ठीक नाहीतर ’घाशीराम’ला अखेरचा रामराम अशी खूणगाठ मनाशी बांधूनच तालमीला गेलो. आणि जब्बारला काय वाटलं कुणास ठाऊक? त्यानं आज आपण स्टॅंडींग रिहर्सल घेऊ असं ठरवलं.

चंद्रकांत काळे आणि मी, असा भटजी-सूत्रधाराचा प्रयोग सुरू झाला आणि काय कळ फिरली देव जाणे !गेले आठ दहा दिवस मला जे काम जमत नव्हतं ते मी सहजपणे करायला सुरुवात केली. आम्ही दोघे मुक्तपणे वावरू लागलो.

’तिसरा तुझा बाप, चावला तुला साप’ असे म्हणून चंद्रकांत निघाला आणि मी ’अगंगंगं ! विंचू चावला’ असं म्हणत एक पाय हाताने धरून नाचू लागलो. चंदूही माझ्याही भोवती गरा गरा फ़िरू लागला.

"अहो तुम्ही सरदार, माडीवाले, गाडीवाले, घोडीवाले, कुठेजी चालले? " असे संवाद म्हणताना एका पायाची मांडी घालत जमिनीवर बसकण मारली. ’गाढवाचं लग्न’मधील दिवाणजीच्या भुमिकेतील जातीवंत सोंगाड्या वसंत अवसरीकरची ही सही सही नक्कल होती.
त्या दिवशीच्या तालमीत अंगात काहितरी संचारल्याचा भास होत होता. तेव्हाच घाशीराम मधली माझी भूमिका पक्की झाली.

दुसऱ्या दिवसापासून कृष्णदेव मुळगुंद घामटं निघेपर्यंत आम्हाला नाचवायचे, स्वत:ही नाचायचे.
मग यायचे संगीतकार भास्कर चंदावरकर. त्यांनी नवीन चाली बांधून आणलेल्या असायच्या. मला सर्व प्रकारच्या गाण्याची आवड. पण सूर कशाशी खातात ? याचा पत्ताच नाही. आता आली का पंचाईत? सूत्रधाराच्या तोंडी शास्त्रीय ठुमरीपासून ते लावणी, कव्वाली, कीर्तनापर्यंत सर्व प्रकारची गाणी !
माझ्यावर पुन्हा आउट होण्याची वेळ. पण दिग्दर्शक जब्बार पटेलने हा नोबॉल डिक्लेअर केला. मी आउट होता होता वाचलो.

जब्बारने एका सूत्रधाराचे तीन भाग केले. रवीन्द्र साठे, चंद्रकांत काळे यांना शास्त्रीय संगीताची भक्कम बैठक. त्यांच्या तोंडी त्या चालींची गीते. ते निळ्या पगडीतले परिपार्श्वक !
आणि लोकगीतं, पोवाडा, अशी मी बेसूर-भेसूर झालो तरी मला सांभाळून घेणारी कोरसपद्धतीची, लोकसंगीतावर आधारित असलेली गाणी माझ्या तोंडी अशी योजना झाली.

img011.jpg

तालमी आता रंगू लागल्या. सुरूवातीला 'वाचिक तालमीची' भीती बसल्यानं तालमीला जायला टाळाटाळ करणारा मी, कधी एकदा संध्याकाळ होते आणि नाच, गाणे आणि नाटकाची प्रत्यक्ष तालीम सुरू होते याची वाट पाहू लागलो.
अस्सल दारूड्याचे हात, सूर्य डुबला की जसे थरथरू लागतात आणि पावलं आपोआप दारूच्या गुत्त्याकडे वळतात तशी आम्हा सर्वांची अवस्था झाली. संध्याकाळी साडे-सहा ते रात्री दोन-अडीच अशी अखंड तालीम जवळ जवळ तीन-साडेतीन महिने सुरू होती. जब्बार दौंडहून यायचा.
या काळात मी फ़क्त एकच दिवस गैरहजर होतो. ते सुद्धा वासुदेव पाळंदे यांच्या वडिलांच्या अंत्य-संस्कारांसाठी गेलो होतो म्हणून.

एका रात्री तालीम संपवून आम्ही परतत होतो. संभाजी पुलाच्या चौकात जब्बार थांबला आणि ’गौरी गेली, नाना राहिले. घाशीराम कोतवालाने गौरीवियोगाचे दु:ख काळजात ठासले" हा भाग त्यानं साभिनय म्हणून दाखविला.

एकदा लकी रेस्टॉरंटपाशी ’राम्या, आता तू योग्य ट्रॅकवर आहेस. चालू ठेव. नंतर मी तुला अधिक बारकावे सांगतो’ असं म्हणून दिलासा दिला.

’नित्य नूतन हे गीतातत्व’ प्रमाणे रोज नवीन नवीन काही सुरू होतं. पहिला अंक बसायलाच विलंब लागला. दुसरा अंक त्यामानाने लवकर बसला. मोहन आगाशे, रमेश टिळेकर, स्वरुपा नारके, मोहन गोखले, सुरेश बसाळे, रमेश मेढेकर, नंदू पोळ, आनंद मोडक, उदय लागू, चंद्रकांत काळे, रवीन्द्र साठे, सुषमा जगताप, अशोक गायकवाड, श्रीकांत राजपाठक, भोंडे .. ..किती किती जणांची नावे लिहू? असा मस्त संच जमला.

img018.jpg

नानाच्या लग्नाचा रंगमंचावरचा सीन तर मला वाटतं तासाभरात आकारला. ब्राम्हणांच्या लग्नात कोणकोणते धार्मिक विधी असतात याची माहिती जब्बारने लिहून आणायला सांगितली होती. चंदावरकरांनी लोकगीताच्या परंपरेतील मस्त चाल करून आणली होती. तालीम सुरू झाली आणि चंदावरकरांनी मला सांगितलं - तालासुरांचा फारसा विचार न करता तुझ्या पद्धतीने बिनधास्त म्हण. चुकलास तर रवी, चंदू आनंद आणि आख्खा कोरस आहेच.
मग काय हो ?

होऽऽऽ माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन |

असं म्हणत मी माझ्याही नकळत जी गिरकी मारली, ती बघून जब्बारनं जी दाद दिली ती मी कधीही विसरू शकणार नाही. पुढे मी अनेक प्रयोग केले. अगदी ’हाउसफ़ुल्ल’ प्रयोगातही ती तशी दाद नाही मिळवू शकलो. ती तशी गिरकी कदाचित पुढे कधीच नाही जमली !

अश्या एकीकडे मोठ्या धामधुमीत घाशीरामच्या तालमी सुरु झाल्या होत्या. मी ही आता सूत्रधाराच्या भूमिकेत खोलवर शिरू पाहात होतो. घाशीराम’ची संहिता मी वाचली त्यावेळी नाना फ़डणीसांच्या आणि त्या काळच्या पेशवाईच्या कारकीर्दीविषयी मी बराच अज्ञानी होतो. काही जुजबी गोष्टी माहित होत्या. या नाटकाच्या निमित्तानं अधिक खोलात शिरून त्याचा जरा बारकाईने अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला.

लहानपणापासून मला वाचनाचे वेड. फर्गसन कॉलेजमधील ग्रंथपाल प्रभाकर साने आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध. त्यांच्या ओळखीने फर्गसन ग्रंथालयातील 'नाना फडणवीसांचे चरित्र' [लेख़क वासुदेवशास्त्री खरे], 'घाशीराम कोतवाल' [लेखक मोरोबा कान्होबा], नाना फडणवीसांचे आत्मचरित्र, पेशवाईतील शिक्षा, पेशवाईतील पत्रव्यवहार, बेळगावच्या रानडे नावाच्या लेखकाने नाना फडणवीसाविषयी आणि पेशवाईसंबंधी लिहीलेले पुस्तक, नाट्याचार्य कृ.प्र. खाडिलकरांनी लिहीलेले सवाई माधवरावांचा मृत्यू असं जेवढे मिळेल तेवढे साहित्य वाचून काढले. तेंडूलकरांनी नाटकात रंगविलेले ’गुलाबी’ हे पात्रही एका जमाखर्चाच्या नोंदीत मिळाले. चोरी केल्याच्या आरोपावरून ब्राम्हणाला करायला लागणा-या 'दिव्याच्या प्रसंगाचा' तपशील 'पेशवाईतील शिक्षा' या पुस्तकात मिळाला. ’घाशीराम’ आणि त्याचा मुलगा ’काशीराम’ याविषयी वेगवेगळे संदर्भ मिळाले. ३१ ऑगस्ट १७९१ रोजी गुलटेकडी भागात घाशीरामाला ब्राम्हणांनी ठेचून मारले ही माहिती मिळाली. सवाई माधवराव, नाना फडणवीस, महादजी शिंदे [पाटीलबाबा] यांच्या राजकीय संबंधांविषयी माहिती मिळाली.

ह्या सगळ्या वाचनातून माझी खात्री झाली की नाटक लिहीण्यापूर्वी तेंडूलकरांनी या सा-या गोष्टींचा कसून अभ्यास केला आहे. नाटक कोणत्या पद्धतीने मांडायचे याचा आराखडाही त्यांच्या डोक्यात पक्का आहे. या तुमच्या तेंडूलकराला नेमकं वाईटच कसं दिसतं? असं अनेकजण आजही विचारतात. 'घाशीरामचा' अभ्यास करताना मला एक जाणवलं की माणूस, त्याच्या प्रकृती, विकृती, स्वभाव 'काल-आज-आणि-उद्या सारखाच'! तेंडूलकरांनी घाशीराममधून या प्रवृत्तीवर बोट ठेवलं. माणसाच्या, समाजाच्या मनाचा, त्याच्या चढ्त्या-उतरत्या वर्तनाचा ठाव घेतला.

या घाशीराम कोतवालच्या निमित्ताने माझे बखरी, ताम्रपट, सनदा, पत्र व्यवहार यासंबंधीचे नकळत बरेच वाचन झाले.

घाशीरामच्या यशाचे श्रेय कोणाला? यासंबंधी पुढे अनेक वर्षे उलटसुलट चर्चा झाल्या.
याचे जब्बार पटेलांना श्रेय किती? असा खवचट प्रश्नही अनेकांनी मला विचारला. आजवर मी त्याचे उत्तर दिले नाही. पण आज प्रथमच सांगतो. नाटक ही एक सामुहिक कलाकृती असल्याने लेखकापासून, दिग्दर्शकापासून, कलाकारापासून ते पडदा उघडणाऱ्या आणि पाडणाऱ्या रंगमंचावरच्या आणि रंगपटातल्या प्रत्येकाचेच त्यात योगदान असते. त्यामुळे घाशीरामच्या बाबतीत श्रेयाचा धनी कोण? हा प्रश्ण निरर्थक आहे.

जब्बारची माझ्या डोळ्यांनी बघितलेली आणि अनुभवलेली कमाल म्हणजे तेंडुलकरांनी लिहिलेल्या एका सूत्रधाराचे 'तीन' करून, कलाकारांच्या गुणांप्रमाणे त्यांचा उपयोग करून घेणे आणि नाटकाचे 'तीन तेरा, नऊ अठरा' न करता चाळीस-पन्नास नवख्या, हौशी कलाकारांना हाताशी घेऊन उत्तम, गोळीबंद प्रयोग सादर करणे.

घाशीरामच्या तालमी सुरु असताना हळू-हळू एक गोष्ट माझ्या ध्यानी येऊ लागली की पी.डी.ए. मधली सिनीयर मंडळी फारशी तालमीकडे फिरकत नाहीत. भालभा केळकर आणि एक दोघे दोन-तीन वेळाच येऊन गेले, पण वागण्या-बोलण्यात तटस्थपणा जाणवायला लागला होता. तरी एके दिवशी भीत भीतच मी सुरेश बसाळेला 'असं का रे?' असं विचारलं. त्यावर त्यानं उत्तर दिलं - आमच्या संस्थेत ही पद्धत आहे. एकदा एखाद्याकडे काम सोपवलं की मधे त्यात कुणी लुडबुड करायची नाही. तू तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा.

आम्ही जीव ओतून तालमी करत राहिलो आणि बघता बघता १४ डिसेंबर उजाडला. घाशीरामची रंगीत तालीम केशवराव घुल्यांच्या सहाय्यानं पिंपरीच्या हिंदुस्थान अ‍ॅन्टीबायोटीक्सच्या सभागृहात ठरली.
रात्रीची वेळ. रंगभूषाकार निवृत्ती दळवी, प्रभाकर भावे चकोट केलेल्या ब्राह्मणांच्या रूपात आम्हाला सजवू लागले. कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदराचा टिळा. पात्रे सजली. वाद्ये लागली. ध्वनी-प्रकाश योजना झाली. रंगीत तालमीला स्वतः तेंडूलकर आवर्जून उपस्थित होते. रंगीत तालीम छानच झाली. तालमी नंतर काही कागद तेंडूलकरांनी नाना फडणवीसांचे काम करणा-या मोहन आगाशे यांच्या हाती दिले.

दुस-या दिवशीच्या तालमीत जब्बार रंगीत तालमीतल्या त्रुटी आमच्याकडून घोटून घोटून दुरुस्त करून घेत होता, तस तसा माझा शिणवटा वाढत चालला. शेवटी शेवटी तर मी बधिरच झालो. तालीम संपवून घरी आलो आणि तापानं फणफणलो. अंग जबरदस्त ठणकू लागलं. रात्रभर झोप नाही.
सकाळी सकाळी माझी पत्नी संजीवनीनं अण्णा राजगुरुंना फोन केला ' अहो, यांच्या अंगात बराच ताप आहे'. पलिकडून उत्तर आलं - रामला म्हणावं शांत पडून रहा. सगळं ठीक होईल.

सकाळी दहा वाजता डॉ. विद्याधर वाटवे घरी हजर. आल्या आल्या त्यांनी आधी दोन इंजक्शनं दिली. गोळ्या औषधं दिली. काहीतरी खा आणि मगच गोळ्या घे हे ही त्यानं निक्षून सांगीतलं.
सक्त विश्रांती घ्यायची आज्ञा केली आणि संध्याकाळी सात वाजता 'भरत' वर ये असं सांगून निघून गेला.

संध्याकाळपर्यंत मी अर्धवट गुंगीत होतो. शेवटी उठलो, दाढी आंघोळ केली. देवाला हात जोडून विनवणी केली - आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा खेळ उभा केला आहे. तो निर्विघ्नपणे पार पडू दे...

... आणि 'भरत' वर पोचलो.

पाहता पाहता सोंग रंगली....आणि तिसरी घंटा घणघणली. प्रेक्षागृहातील दिवे विझले. रंगमंचाचा दर्शनी पडदा बाजूला झाला.

धूसर प्रकाशात मागील काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर एक चौकोनी कमान. त्यावर मधोमध श्रीगजाननाची मूर्ती. रंगमंचाच्या मध्यभागी एक निरांजनाचं तबक. त्याच्यामागे प्रेक्षकांना रंगमंचावर मस्तक ठेवून अभिवादन करणारा कोणी एक तरूण कलाकार.

मृदुंगावर दमदार थाप पडली. मृदुंगाच्या तालावर तो कोणी एक उभा राहिला. तबकातील फुले त्याने प्रेक्षकांच्या दिशेनं उधळली. निरांजनाच्या ज्योती अधिकच उजळल्या. मृदुंगाच्या लयीवर तो तरूण आता नृत्य करू लागला, त्याच्या नाचाचा वेग वाढला. नृत्य संपवून तो रंगपटात गेला. रंगमंचावर अस्पष्ट प्रकाश आणि पुन्हा एकदा प्रेक्षागृहातील दिवे उजळले.... प्रेक्षकांच्या मागील बाजूनं आवाज घुमला,

श्रीगणराय !

हळूहळू हा घोष वाढत गेला आणि करवतीकाठी धोतर, बाराबंदी, गळ्यात करवतीकाठी उपरणे, डोकीवर पेशवाई पद्धतीचे चक्री पागोटे, कानात भिकबाळी, कपाळी दुबोटी गंध, भुवईत शेंदूर अशा वेशातले बारा-पंधरा ब्राम्हण 'श्रीगणराय' चा निनाद करत प्रेक्षकातून वाट काढत रंगमंचावर अवतरले. बघता बघता रंगमंचावर, हात जोडून पुतळ्यासारख्या स्तब्ध उभ्या राहिलेल्या ब्राम्हणांची रांग तयार झाली. पुन्हा मृदुंगावर दमदार थाप पडली. श्रीगजाननाचा मुखवटा धारण केलेला एक कलाकार लयदार पाऊले टाकत रंगमंचावर पदन्यास करू लागला.
आता तो पाठीमागील नि:स्तब्ध असलेला ब्राम्हणांचा पडदा सजीव झाला, झुलू लागला, गाऊ लागला

श्रीगणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामणहरी |
बामणहरी नर्तन करी, श्रीगणराय फेर की धरी ||

img014.jpg

नमन संपले. ब्राम्हणांच्या पडद्यातील कलाकारांनी रंगमंचावर विविध ठिकाणी वाद्यांच्या तालावर विविध गट केले. वाद्यांचा वेग आणि आवाज टिपेला पोचला आणि सूत्रधारानं रंगमंचावर प्रवेश केला...

हो | हो || हो ||| असा आवाज देऊन वाद्यांना थांबवण्याचा इशारा करून त्यानं मागे स्तब्ध झालेल्या ब्राम्हणांची एक एक करुन ओळख करून दिली -

हे सर्व पुण्याचे ब्राम्हण !
वेदांत शास्त्री, ज्योतिषमार्तंड, आम्ही कुंभकोणम... आम्ही बनारस....
आम्ही पुणेकर | आम्ही पुणेकर | आम्ही पुणेकर |||

img007.jpg

रंगमंचावर एक अद्भुत नाट्य साकारत होतं. माझा ताप कुठल्याकुठे पळून गेला होता. माझ्या आजाराचा, थकव्याचा पूर्णतः विसर पडला होता. बघता बघता पहिला अंक संपत आला. नाना फडणवीसांच्या, मोहन आगाशेच्या स्वगत पण जाहीर आदेशानं -

"घाश्या, अक्करमाश्या, केला, केला तुला कोतवाल...."

img013.jpg

आणि सूत्रधारानं दवंडी घुमवली " ऐका होऽऽऽ ऐका, आजपासून घाशीराम सावळदास यास पुण्याचा कोतवाल केला आहे हो ऽऽऽ

साध्या सुती धोतर, अंगरख्यातील घाशीराम धीमी पाऊले टाकत रंगमंच्याच्या मधोमध उभा राहिला. दोन ब्राम्हणांनी नम्रपणे त्याच्या अंगावर रेशमी अंगरखा चढवला. कंबरपट्टा बांधला. डोईवर सरदारी पगडी चढवली. तबकातील आसूड घाशीरामाच्या हाती दिला. घाशीरामानं रंगमंचावर विखुरलेल्या, नतमस्तक झालेल्या अवघ्या ब्राम्हणांवर करडी नजर फिरवली. हातातला आसूड कडाडला आणि त्याने विकट हास्य केलं ' हा.. हा... हा... हा' आणि पहिला अंक संपला.

दुस-या अंकाचा पडदा उघडला तोच मुळी अतिशय आक्रमक, अंगावर येणा-या गीताच्या आणि पदन्यासाच्या तालावर. गीताचे शब्द तेच होते पण त्यांचा अविष्कार अत्यंत वेगळा होता.

श्रीगणराय नर्तन करी |
आम्ही पुण्याचे बामण हरी |
बामणहरी नर्तन करी |
श्रीगणराय फेर की धरी ||

ब्राम्हणांच्या पडद्याच्या मधोमध असलेला सूत्रधार पुढे आला आणि पुन्हा "होऽऽऽ हो ऽऽऽहोऽऽऽ" करीत आता ब्राम्हणांच्या पडद्याचा आवाज थांबवत त्यानं घोषणा केली

"पुण्यनगरीत घाशीराम कोतवाल झाले"

पडद्याचा कोरस घुमला - झाले |

सुत्रधारानं कहाणी सांगायला सुरुवात केली...

"त्यांचा कारभार चाले, कारभार चाले, हो कारभार चाले |
गौरी बोले, नाना डोले, घाशीरामाचा कारभार चाले |
गौरी नाचे, नाना नाचे, घाशीरामाचे फावले साचे|

मग रंगमंचावर पुण्यातल्या ब्राम्हणांवर कडक 'घाशीरामी' सुरू झाली. एक क्रूर नाट्य अवतरलं आणि कोतवाली, पुण्याची अवघी रखवाली करता करता एके ठिकाणी घाशीराम फसला...
आणि अखेर शेवटी शेवट आला |

एक हात जेरबंद करून, घाशीरामाला ब्राम्हणांच्या पुढे सोडला. संतप्त जमावानं त्याच्यावर दगडधोंड्यांचा वर्षाव सुरु केला. जखमी, घायाळ, हिंस्त्र श्वापदासारखा रक्तबंबाळ घाशीराम गर्जना करतोच आहे -

img016.jpg

मी तुमच्या छाताडावर नाचलो. मारा. ठेचा मला |

मग एका भल्या धिप्पाड ब्राम्हणाने एक जड शिळा उचलली. आपल्या दोन्ही उंच हातांवर भक्कमपणे पेलली आणि जखमी घाशीरामाच्या मस्तकावर दणकन आदळली. घाशीराम गपगार झाला.
आहे त्या स्थितीत ब्राम्हणांचा जमाव गोठला, स्थिर झाला आणि भग्नशिराच्या घाशीरामाचं मृत्यूनृत्य सुरु झालं. ताशा कडकडला, टिपेला चढला आणि एका असहाय्य क्षणी घाशीराम रंगमंचावर कोसळला - कायमचा.

जमावानं विजयी आरोळी ठोकली आणि धीरगंभीर पावलं टाकत नानांनी प्रवेश केला. सर्व जमावानं कमरेत वा़कून त्यांना अभिवादन केलं. नानांनी हाताच्या काठीनं ढोसून घाशीराम नक्की मेला आहे याची खात्री केली आणि नाना रंगमंचाच्या एका कोप-यात आले. प्रकाश वलय फक्त त्यांच्यावर.

नानानी पुण्यनगरीला आवाहन केलं -
"पुण्यपतनस्य नागरिकहो ! या नगरावरील एक महान संकट सरले. एक रोग टळला. आपणासर्वांना छळणा-या नरकासुराचा, घाश्या कोतवालाचा वध झाला वध. श्रींच्या कृपेने सर्व यथायोग्य पार पडले. त्याची कृपा आपणासर्वांवर आहेच. .....
.... या शुभघटनेनिमित्त पुण्यामधे तीन दिवस उत्सव चालावा अशी आमची आज्ञा आहे.

विजयी आरोळ्या ठोकत पांगलेला ब्रम्हसमुदाय पुन्हा रांगेत उभा राहिला. पुन्हा दणक्यात

श्रीगणराय नर्तन करी |
आम्ही पुण्याचे बामण हरी | - चा द्रुत लयीत कोरस सुरु झाला.

img005.jpg

नानांनी गुलाबीला खुणेनं बोलावलं. नानांभोवती नाचून ती रंगपटात गेली.
ब्राम्हणांचा पडदा घाशीरामाचं कलेवर ओलांडून पुढे आला. रांगेच्या एका टोकाला मृत घाशीराम. मागे अंधूक प्रकाशात इंग्रज अधिकारी...त्या बारा ब्राम्हणांच्या रांगेत सामील झालेले नाना फडणवीस....आणि पुन्हा एकवार

श्रीगणराय नर्तन करी |
आम्ही पुण्याचे बामण हरी |
बामणहरी नर्तन करी |
श्रीगणराय फेर की धरी || - चा गजर.

img19.jpg
रंगमंचाचा मखमली पडदा पडला.. खेळ संपला...

१६ डिसेंबर १९७२. पुण्याच्या भरत नाट्यमंदिरात महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत 'प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन, पुणे' या हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थेने सादर केलेल्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग निर्विघ्नपणे पार पडला..... पुढील काळात अनेक विघ्ने निर्माण करण्यासाठी !
थिएटर अ‍ॅकॅडमीची स्थापना होण्यासाठी. अनेक वादळे उत्पन्न करण्यासाठी आणि झेलण्यासाठी. कलावंतांची कसोटी पाहण्यासाठी. त्यांच्या सत्वपरीक्षेसाठी.
समाजमन ढवळून काढण्यासाठी आणि आधुनिक मराठी रंगभूमीवरील एक 'माईल-स्टोन' ठरण्यासाठी !

१६ डिसेबर १९७२ ... घाशीरामच्या पहिल्या प्रयोगाची ही कहाणी तुमच्यापर्यंत पोचवणारा....या सर्व ऐतिहासिक घटनांचा मी एक साक्षीदार - घाशीराम कोतवाल नाटकामधील सूत्रधार.

बाकी इतिहास पुढे केव्हा तरी... तूर्त येथेच अर्धविराम घेतो.
तुम्हा तो सुखकर हो शंकर |

- श्रीराम रानडे
(ramranade at gmail dot com)

'घाशीराम कोतवालची' झलक

'घाशीराम कोतवाल' हे नाटक बघत मी आणि माझी बहिण लहानाचे मोठे झालोय. विंगेतून, हौद्यातून, प्रेक्षागृहातून, नाटक न समजण्याच्या वयापासून ते त्यावर विचार करण्याच्या, चर्चा करण्याच्या वयापर्यंत आम्ही हे नाटक पाहात आलोय. आपण न कळत्या वयातही काय अद्भुत अनुभवलंय, घडताना पाहिलंय असं आज आम्हाला अनेकदा वाटतं.
दुर्दैवानं मूळ संचातल्या कलाकारांच्या नाटकाचा प्रयोग आज कोणत्याच स्वरूपात पाहायला उपलब्ध नाही. नाटकाचं ऑडियो रेकॉर्डिंग ऐकून आजही अंगावर शहारा येतो. नुसतं रेकॉर्डिंग ऐ़कून नाटकाच्या प्रेमात पडलेले, झपाटलेले मला अनेक भेटले. 'घाशीरामची' लहानशी का होईना 'दृष्य स्वरूपातली झलक' तयार करायची असा विचार अनेक वर्ष मनात घोळत होता. बाबांच्या 'बहुरंगी बहुढंगी' या एकपात्री प्रयोगाच्या निमित्तानं ती संधी मिळाली.
१९८९ च्या सुमारास 'घाशीरामच्या' जर्मनीच्या दौ-याच्या निमित्तानं एक माहितीपत्रक काढलं होतं. त्या मधे नाटकाच्या प्रमुख घटनांचे फोटो आहेत. त्या फोटोच्या माध्यमातून आणि ऑडियो एडिट करून प्रेक्षकांना पाच्-सहा मिनिटात मूळ 'घाशीराम कोतवालची' झलक दाखवायची असं ठरलं आणि ही 'ऑडियो-व्हिज्युअल' तयार झाली.
हे काम पुष्पक कर्णिक, निलेश अग्नीहोत्री, नेत्रा जोशी आणि मुकुल रेणावीकर यांच्या मदतीशिवाय घडूच शकलं नसतं. 'घाशीराम कोतवाल' नाटकाच्या मूळ संचातील कलाकारांची ही झलक तुमच्यापर्यंत पोचवण्याचं सगळं श्रेय माझ्या ह्या मित्रमंडळींचं.
अवघ्या काही तासांपूर्वी हा लेख माझ्यापर्यंत पोचला. तो तुमच्यापर्यंत १६ डिसेंबरच्या मुहुर्तावर पोचवणं शक्य होतंय ते नंदन कुलकर्णी (नंद्या) यानी टंकलेखनासाठी केलेल्या मदतीमुळेच.

- आरती (RAR)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन आणि माहीतीही...:स्मित :

हे नाटक ऐतिहासिक बाजाचे नाटक असलेतरी, संपूर्ण ऐतिहासिक नाही. याचा खुलासा स्वत: तेंडुलकरांनीच खालील शब्दात केला होता.

हे ऐतिहासिक नाटक नव्हे.
ऐतिहासिक आधार असलेली ही एक अनैतिहासिक नॄत्यसंगीतमय दंतकथा आहे.
" घाशीराम "
हे विशिष्ट समाज-स्थितीची निर्मिती असतात.
हे समाज-स्थिती आणि घाशीराम स्थल कालातील असतात.
आधार मात्र इतिहासाची सर्व जबाबदारी लेखक जरी घेत असला तरी
पेशवाई, नाना फडणवीस, घाशीराम कोतवाल यांच्या इतिहासातील बर्‍यावाईट अव्वल अस्तित्वाविषयी मतप्रदर्शन
करण्याचा लेखकाचा हेतू नाही.
या दंतकथेमागील बोध..... असलाच तर..... वेगळा आहे.

विजय तेंडुलकर.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे संपूर्ण नाटक बारा भागात युटूबवर उपलब्ध आहे...

मस्त लेख. मी पाहिले आहेत मूळ संचातले प्रयोग. फोटोतील उजवीकडील नाजुकश्या सौ. वाटवे माझ्या वडिलांकडे गाणे शिकायला येत असत. पुणे रॉक्स. Happy

मस्तच. इथे आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद.
पहिल्यांदा पहाताना ते नृत्य बघून थक्क झालो, तेंव्हाच कळाले की ज्याची अपेक्षा बघन्याआधी केली होती ते हे नाही, वेगळेच काहीतरी आहे. तरी माझी पिढी खूप नंतरची असूनही हे वाटत राहते. जब्बार इथे दिसतात. हे नाटक केवळ तेच साकार करू शकले असते. दुसर्‍या कोणी घेतले असते तर पडले असतेच.
जब्बार द ग्रेट आणि तेंडुलकर द महान. Happy

<< ...चाळीस-पन्नास नवख्या, हौशी कलाकारांना हाताशी घेऊन उत्तम, गोळीबंद प्रयोग सादर करणे.>> १००% सहमत.
मी हा प्रयोग पाहिला तेंव्हां सूत्रधाराच्या अत्यंत लयबद्ध व चपळ हालचाली पाहून थक्क झालो होतो. इतक्या वर्षानी त्याना प्रत्यक्ष इथं मनापासूनचा सलाम पोचवायचा योग आला.
अप्रतिम, नेटका लेख. धन्यवाद.

लेख वाचून उत्फुर्तपणे प्रतिक्रीया दिल्याबद्दल आणि अधिक लेखनासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल रानडेकाकांतर्फे तुम्हा सगळ्यांचे
मनःपूर्वक आभार Happy

अप्रतिम लेख! दिग्दर्शक,सर्व कलाकारांनी किती मेहनत घेतली आहे या नाटकासाठी!हे मूळ संचातलं नाटक बघायचा योग नाही आला. पण या लेखामुळे तो काळ डोळ्यांसमोर उभा केलास.
धन्यवाद रार.

मस्तच.
या नाटकाबद्दल कधीतरी नुसते ऐकले, वाचले होते. हे अनुभवकथन खूपच आवडले.
आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल थँक्स रार.

काल रविंद्र नाट्य मंदिरला घाशीराम पाहिले. माधव अभ्यंकरांचा नाना एकदम खास.... गुलाबी झालेल्या कलाकाराची अदाकारी खूपच भारी....

प्रयोग अतिशय सुरेख...

खुपच छान माहीती थँक्स रार.जुन्या काळातील सगळे संदर्भ नव्याने पाहाता आले. आम्च्या ओळखीत दातार नावाचे आहेत त्यांच्या हॉलमध्ये ते घाशीरामची प्रसिद्ध रांगेच मोठं पोस्टर होत आम्ही शाळेत असताना नेहेमी कुतुहलाने ते पाहायचो ... आत्ताही घरी घाशीराम पाहाताना कालातित असे उच्चस्तरीय भ्रष्टाचाराचे नमुनेच पाहातोय असचं फिलींग येत . माझ्याकडे आजही संपुर्ण सीडीआहेत फक्त हे कलाकार त्यात नाहीत. पण तरीही नाट्काचा हा उत्तम फॉर्म मात्र सुखावुन जातो.

फार पुर्वी हे नाटक पाहिले होते. पण आता पर नवीन संचात आलेले नाटक पाहायचे आहे. आमच्या ओळखीचे एकजण ह्या नाटकात काम करतायत.

उत्तम लेख.
जुन्या आठवणींना उजाऴा मिळाला. मी १९७२ - ७३ साली हे नाटक किमान चार पाच वेळा पाहिले आहे. तेव्हा मी महाविद्यालयात शिकत होतो. त्या काळातील लोकांची मानसिकता पहाता नाटकाचा फॉर्म, कथानक वगैरे धक्कादायक होते. त्या वेळी पुण्यातल्या शनिवार पेठेसारख्या वस्तीत रहात असल्यामुळे तेव्हा या नाटकावरून झालेले वादविवाद, तत्कालीन वर्तमानपत्रातून येणारे लेख, चर्चा लक्षात आहेत.
या नाढकातील मोहन आगाशेनी केलेली नाना फडणीसांची भूमिका केवळ अविस्मरणीय. नाना फडणीसांची पालखीतून रंगमंचावर होणारी एंट्री , नाटकानील मोहन आगाशेंचा अभिनय व त्याचे संवाद अजूनही डोऴ्यासमोर उभे रहातात.
आजही हे नाटक मला आवडते. या नाटकाची सीडी मी पाहीलेली आहे. माधव अभ्यंकरानी केलेले नाना फडणीसांचे काम पण चांगले झाले आहे. या नाटकाचे मूऴ संचातल्या खेळाचे व्हीडीओ चित्रीकरण नसावे याचे आश्चर्य वाटते. मध्यंतरी टीव्ही वरील एका कार्यक्रमात मोहन आगाशेंना हा प्रश्न विचारला गेला असता, त्यांनी असे उत्तर दिले की परदेशात , बहुधा पोलंडमध्ये या नाटकाचा जेव्हा प्रयोग झाला होता, तेव्हा या नाटकाचे व्हीडीओ चित्रीकरण झाले होते. तिकडून ती चित्रफीत मिळवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सागीतले,

श्रीराम रानडे यांना लेखाबध्दल धन्यवाद

GHASHIRAM KOTWAL is a Marathi drama based on malicious accusations made by British on the Maratha Chancellor Nana Phadnavis. It caused a furore when it first appeared on stage in 1973. It was selected to represent the Indian theatre at the international gathering in Berlin in October 1980. Vasantrao Sathe the Minister for Information and Broadcasting and even Mr P. Narasinha Rao the Telagu speaking Foreign Minister protested. But Mrs Indira Gandhi overruled. What did the British papers say when the drama reached London?

No Pune intended

….. set in Pune at the end of the 18th century, the play shows the ruling class under the Chancellor, Nana Phadnavis to be decadent and debauched. Ghashiram a hard-done by Brahmin rises to power as Nana's Chief of Police and instigates a reign of terror (Guardian 28 October 1980)

Tales of the despots from old Bombay

.... As much an opera or ballet as drama "Ghashiram Kotwal" is set in the 18th century and tells with tart humour the story of a decadent city where the strait- laced ruling class, together with the all powerful and dignified Chancellor secretly frequent the red light district.

When the Chancellor attempts to seduce the beautiful daughter of a rascally servant, this cunning fellow insists on being made chief of police in return for his girl's favour.
(Daily Telegraph 30 October 1980)

What an exhibition at a time when Indians are regarded as good for nothing loafers everywhere in the world; How did this drama arise?

Nana Phadnavis's contemporaries like Warren Hastings, William Palmer (Resident at Pune) and John Seeley - Secretary to the British Governor General, have all praised Nana. He died in 1800. Maratha Peshwa Bajirao II was defeated by the English in 1818. Mountstuart Elphinstone was the last Resident at Peshwa's court in Pune, John Briggs (later General Briggs) was his assistant who forged an auto- biography of Nana and read it at the Royal Asiatic Society of London on 19 April 1828. It was published in their proceedings of 1830, but even Briggs admires Nana as a great hero.

Captain Archibald MacDonald wrote Nana's biography and even though it was published by the American Mission in 1851 it makes no reference to Nana's auto- biography. The 1927 edition of the book published by Humphrey Milford of London contains Nana's alleged autobiography. Ever since the days of Mahatma Phule there has been much anti-Brahmin feeling in Maharashtra. In 1863 one Moroba Kanhoba wrote a book entitled "Ghashiram Kotwal". Mr M.S. Dixit of Pune has recently (1981) proved it to be a thoroughly false document.

Knowing damn well that the theme of the drama is baseless, it has bad influence on the people and that it is insulting to a national hero like Nana, those who are trying to justify it are putting forward some fantastic arguments.

'Manoos' weekly of Pune has persistently supported the drama. When it first came on stage the editor wrote - "though the title is Ghashiram Kotwal it does not tell his story. (So why not use an appropriate title?) It is not, as suggested currently in newspapers, a one-sided picture of Nana nor does it have any mud-slinging on him. (Wonderful. Does it show the wit, cleverness & intelligence of Nana? No. It simply shows him to be a sex crazy man. So how is it not a one- sided picture of Nana? Don't ask such questions) During the downfall of any society people lose their moral values. In social history this decadence is very important. (24 Feb 1973)

Historian Setu Madhavrao Pagdi delivered a lecture in the famous Sarasbag in Pune on 21 January 1980. He explained the work of Nana Phadnavis and Mahadji Shivde. He said "These two were the giants ever produced by Maharashtra, and how do we remember and honour them today? By producing dramas like Ghashiram Kotwal; While watching that drama my blood was boiling every minute. During the interval I met a professor who remarked - what a chance did Nana have; I was absolutely furious.."

Commenting on Mr Pagdi's lecture Mr D.B. Mokashi a well known Marathi author wrote. "It is true that many people like Mr Pagdi were hurt. But it also gave pleasure to many, like the pleasure of saying "What a chance did Nana have;" Some were delighted to see how the Brahmins were humiliated (brahmanchee kashi jiravali!) Many actors who take part in this drama are themselves Brahmins, if they had known the truth about Nana, they would not have acted. I am sure they had quarrels with their parents. They would have had the satisfaction of having insulted the elderly as representatives of Nana's times..... As the time goes by Nana etc would not be regarded as historical characters (so why use the historical characters in the first place? Every generation has some randy, saucy men. Nana would be looked upon as one such man. (Manoos 9 Feb 1980).

(Note - we know damn well that this does not happen. People who see such drama carry foolish impressions throughout their life).

Justifying sending of this drama to Berlin Festival, Mr Majgavnkar the editor of Manoos wrote "Mr Tendulkar the author says that the drama is not a historical one at all;(So why use historical characters like Nana and Ghashiram Kotwal etc? Why not have some imaginary names like Jawaharlar Nehru or M.K.Gandhi?).

...In the near future lustfulness, corruption etc would become virtues. So what is all the fuss about? (27 Sept 1980).

"This is art, not a history book" says the play's director Jabbar Patel, a Muslim, "People like Ghashiram are created by the politicians so that they can kill their own enemies indirectly. It happens not only in India but throughout the world, so this becomes a universal play." (Guardian 28 October 1980)

(Note - Nana did not rely on a reign of terror to remain in power. After Raghoba Peshwa, who arranged a murder of his nephew Narayanrao, was deposed by the council of twelve (barbhai ) Ghashiram installed an excellent system of police and spies and made the Maratha state secure from the threat of English. True, in later days he misused his power and paid for it with his life).

Before the show we are assured that the author, Vijay Tendulkar intended no disrespect to a historical character. (Daily Telegraph 30 October 1980)

'Manoos' carries a series called " (shyamcha sansar) Shyam's family life". In one of them (in 1983) we are told - When the Europeans go to performances of foreign dramas like Ghashiram Kotwal, surely they study Maratha history beforehand and know the truth. (Note - what an argument; If a French or Polish drama comes to your town, would you study French or Polish history? or would you be guided by what you read in the papers or bulletins?)

In the same series the author tells us of the story of an old Arab from Oman who went to India and married a young Muslim girl from Miraj. He seeks help from Shyam for letter writing and dealing with formalities to bring his wife to Oman. A Bengali colleague tells him that Ghashiram Kotwal was becoming popular in Europe. Shyam says to hemself "What a life; We are gaining fame by showing a drama on a man of loose morals. When dirty old Nana married teenage girls or spoiled the life of Ghashiram's daughter how many people like me would have felt sad?" (Manoos 26 June 1982)

Mr Dattatreya Ganesh Godse, famous Maharashtrian painter and art critic has recently written a book of historical essays entitled "Samand-e-Talash. One of them is 'Nana's autobiography'. Mr Godse shamelessly and without the slightest hesitation repeats all the false stories. It is much more disgusting to find him arguing that those who condemn the drama Ghashiram Kotwal should study Nana's autobiography; (Manoos 5 June 1982)

Dramas like Ghashiram Kotwal have a lasting disastrous mental impact. Maharashtrians in England welcomed it with great enthusiasm when it came to London and the very same people are utterly reluctant to have any celebrations during the Veer Savarkar Birth centenary year; British immigration officers were carrying out virginity tests on our women when Ghashiram came here. And what were the staunch supporters of Ghashiram doing in India? Nothing. Absolutely nothing. It did not make their blood boil. And now it is reported that British doctors are carrying out horrifying experiments on pregnant Indian women in Central Middlesex Hospital and St Mary's Hospital Medical School (See Asian Times of 18-24 November 1983). Is Mr Tendulkar now going to write a drama giving us the pleasure of seeing how our women were humiliated? or is he going to find something stimulating, thrilling, inspiring and exciting in the life of Nana? Does he know that though Nana was never a swordsman he did not flee from the battle of Panipat in 1761 until after Holkar and Shinde had deserted?

by V S Godbole (Newsletter No. 12 of 16 February 1984)
http://satyashodh.com/nl12.htm

हे नाटक ‘अनैतिहासिक’ आहे, असे तेंडुलकरांनी म्हटले होते. सत्तासंघर्षांत होणाऱ्या (अपरिहार्य?) कटकारस्थानांचे, दगाबाजीचे आणि हिंस्रतेचे दर्शन या नाटकात आहे आणि म्हणून ते ‘स्थलकालातीत’ आहे, असेही नाटककाराने आवर्जून नमूद केले होते.
वरील वाक्ये आहेत लोकसत्ताचे तत्कालीन संपादक व पत्रकार श्री. कुमार केतकर यांच्या अग्रलेखातील. हा अग्रलेख वाचनीय आहे. त्यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेच्या संदर्भात या नाटकाचे कथासूत्र ऊलगडून दाखविले आहे.
हा लेख वाचण्याकरीता खालील दुव्यावर टिचकी मारा.
http://kumarketkar.blogspot.com/2010/04/blog-post_24.html

तसेच Indian Express या दैनिकात दि. २० ऑक्टोवर १९९९ रोजी या नाटकात खालील लेख प्रसिध्द झाला होता.

The Legend Endures

Vijay Tendulkar's plays reflect a magical combination of currency and timelessness, says Sona Bahadur

Topicality and timelessness combine to create an enigma around Vijay Tendulkar's plays. The playwright, who began his career in the mid-50s, has 28 full-length plays to his credit, most of which have been translated and produced in major Indian languages. The fierce controversy surrounding his plays, many of which were censored following their immediate publication, is perhaps an obvious indicator of their currency, their strong rootedness to the socio-political context in which they were written. At the same time, the magnetic quality of the plays, reflected in the frequency with which they continue to be performed in different parts of India and abroad, suggests a certain universal quality. What, then, accounts for the magic of Tendulkar's plays? The enduring appeal of Tendulkar's plays is most obviously exemplified by his play Ghashiram Kotwal. Set in late 18th century Pune, theplay documents the degeneration of the socio-political fabric during the last days of the Peshwa rule. First performed in 1973, the play was initially banned for its alleged anti-Brahman stance and for its portrayal of Nana Phadnavis, the central character, in a historically inaccurate light. The production was subsequently revived by the Theatre Academy, Pune, which went on to perform the play more than 500 times in the following years.

Translated into several languages, Ghashiram is regularly performed at theatre festivals across the country. It has also been performed abroad. But what makes a historical play like Ghashiram seem so relevant to the contemporary times? Says Tendulkar, "I never approached Ghashiram as a historical play. The impulse to write the play was provoked by the contemporary political situation of the time, specifically the rise to power of the Shiv Sena in Maharashtra. But it has been interpreted differently with changing political situations including theEmergency. Performed with sensitivity and intelligence, a play can be infinitely renewed to suit the current milieu. Take the case of Shakespeare, who remains the most widely performed playwright despite the passage of time. But the openness of the play to interpretation is not intentional on the part of the playwright. Rather, it is innate to the play. Though Ghashiram was a product of my reflections on the rise of the Shiv Sena, I was ultimately interested in examining the situations which lead to the creation of Ghashiram-like forces in society. The Ghashirams of the world die, but the situations, which give birth to such forces, recur and are personified in the character of Nana Phadnavis. Beneath the superficial changes in history, the larger dynamics of power are cyclical. That is why such a play continues to evoke interest."

The combination of currency and timelessness which characterises Ghashiram also manifests itself in Tendulkar's social plays, which, like his political plays,continue to inspire new productions despite their controversial content. Says Hindi theatre veteran Dinesh Thakur, who has directed and acted in Tendulkar plays for more than two decades, "Vijay Tendulkar continues to be my favourite Indian playwright because of the sensitivity and accuracy with which he depicts social issues. The astonishing range of his plays, be it the victimisation of the individual by society in Shantata! Court Chalu Ahe!, or the moral collapse of a family in Gidhade, or the ruthlessness of the media in Kamala, provides a director a very large thematic canvass to choose from. At the same time, the lack of moralising gives the plays a very open-ended feel, leaving ample scope for directorial interpretation."

Adds daughter Priya Tendulkar, who has acted in several of her father's plays and plans to write a book on him, "The innovative use of form, whether it is the mock trial in Shantata!... or the human curtain in Ghashiram.., is another magical component in his(Tendulkar's) plays." Currently involved with directing Aap Ki Adalat, an interview-based television show anchored by daughter Priya, on Zee News, Tendulkar says he does not want to write plays any longer. Why? "A certain weariness has set in with the collective medium. Now I want to write only for myself, for which a novel is better suited."

Significantly, the septuagenarian chose to clinch his theatrical career with The Cyclewallah (1992), a play which incorporated elements of fantasy to convey the sameness of human nature. "The cyclewallah is a reflection of people who spend their entire lives in a fantasy without any understanding of reality. But to live in the true sense of the word, a person must live through situations that force him to look beyond himself, situations which shock him by confronting him with the unimaginable," says Tendulkar. Perhaps it is this hard-hitting impact of Tendulkar's plays, which jolts audiences out of their complacency each time that accounts, more than anyother element, for their immortality.

<<हे नाटक ‘अनैतिहासिक’ आहे, असे तेंडुलकरांनी म्हटले होते.>>

पण हे कधी मान्य केले?? विरोध सुरू झाल्यावर, पुरावे मागितल्यावरच ना?? नाटक सुरू व्हावयाच्या आधी किंवा नंतर हे ‘अनैतिहासिक’ नाटक आहे व वास्तवाशी ह्याचा काहीही संबंध नाही असे सांगितले जाते का?? (मी ई मराठी वर नाटक पाहिले होते नाट्यग्रुहात असे सांगितले जाते का ह्याची कल्पना नाही, सांगत असतील तर उत्तम नाहीतर सांगावयास सुरूवात करावी.)

<<सत्तासंघर्षांत होणाऱ्या (अपरिहार्य?) कटकारस्थानांचे, दगाबाजीचे आणि हिंस्रतेचे दर्शन या नाटकात आहे आणि म्हणून ते ‘स्थलकालातीत’ आहे, असेही नाटककाराने आवर्जून नमूद केले होते.>>

तेंडुलकरांना नाना फडणीस ब ब्राह्मणांच्याच सत्तासंघर्षाचे उदाहरण का घ्यावेसे वाटले? ओरंगजेब, अकबर, बाबर, टिपू, इंग्रजांचे किंवा इतर स्वदेशी राजघरण्यांचे का दिसले नाही (होते हे त्यांना मान्य असेल तर)? नाना फडणीसांचे उदाहरणच घ्यायचे होते तर मग त्यांची चांगली बाजू का दाखिवली नाही??

अक्षय, शेवटच्या परिच्छेदाशी सहमत.
त्याचबरोबर,
यान्ना साधारण दोनशे वर्षान्पूर्वीचे नानाफडणवीस अन घाशीराम लेखनासाठी (खरेतर व्यावसायिक लेखनासाठीच!) आठवले पण तोवर उणीपुरी पन्चवीस वर्षेही न होऊन गेलेला, तेव्हाचा आख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातुन (व सध्याच्या उत्तर-पश्चिम) कर्नाटकातुन जाळपोळी खूनखराब्याच्या दहशतिद्वारे गावागावातुन हाकलवुन लावल्यामुळे "पुण्यातच" शब्दशः निर्वासित म्हणून कुणाच्या तरी काडीच्या आधाराने अत्यन्त दारीद्र्यात, (अन तरीही ताठ मानेने, एक मायबोलिकर 'विनायक रानडे' कुठे तरी एका धाग्यावर म्हणतात तसा "ब्राह्मणी संस्कार" जपु पहात) कसेबसे जीवन कण्ठणार्‍या असन्ख्य ब्राह्मणान्च्या वाताहातीवर, त्यान्च्या वाया गेलेल्या दोनचार पिढ्यान्च्या जिन्दगानीवर काही लिहावेसे वाटले नाही यातच सर्व येते. यातच या सो कॉल्ड लेखक/कलावन्त/कलाकारान्चे "अभिव्यक्ति स्वातन्त्र्य" ठसठशीत पणे उठून दिसते ते असेही/अशाप्रकारेही! Happy
अन समजा तेव्हाच लिहीले अस्तेही, तरी त्याचेही सादरीकरण कशाप्रकारचे अस्ते ते आजकालच्या ब्रिगेडी तमाशामधे दिसुन येतेच आहे! नै का? Proud
अर्थात मला या कशाचेच नवल न वाटता, टिळकयुगाच्या अस्ताच्या आसपासच सुरु झालेला तथाकथित समाजवाद, कम्युनिझम नि त्यान्चे कॉम्रेड्स अन त्यान्ची धर्मविरोधी मते, यान्च्या तालमीत तयार झालेल्या त्याकाळच्या "बुद्धिजीवीन्चा" स्वधर्मद्वेष, अन त्याकरता ब्राह्मणविरोध कधीच लपुन राहीला नव्हता. किम्बहुना, साहित्याच्या अनेक क्षेत्रात तो या ना त्या प्रकारे झिरपतच राहिला, स्लो पॉयझनिन्गप्रमाणे. पण तत्कालिन स्वातन्त्र्यचळवळ व नन्तरच्या धामधुमीच्या काळात यावर तितके लक्ष देणे तत्कालिक धुरिणान्ना जमले नाही/अशक्य व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली, जे काय असेल ते असो, पण आजचे ब्रिगेडी तत्वज्ञान ही त्याच झाडाला/वेलीला आलेली फळेफुले आहेत हे निश्चित. (हे माझे मत आहे)

Pages