तो दगडात हि दिसतो

Submitted by निलेश गुप्ता on 14 December, 2011 - 02:54

तो दगडात हि दिसतो

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
त्याच्या साठी आपण तासन तास रांगेत थांबतो
जनावरा सारखे धक्का बुक्की करत पुडे सरकतो
आणि नंबर आल्या वर डोक टेकवण्या आधीच बाहेर फेकले जातो.

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
पार्किंग,चपल,हार, देणगी पेटी, हवन,महा पूजा , महा प्रसाद
या सगळयान , साठी आपण मन मोकळेपणाने पैसे देतो
पण मात्र भाजी वाला , रिक्षा वाला , किराणा वाला , दुध वाला
यांना पैसे देताना एक एक रुपया साठी भांडतो

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
त्याची श्रीमंती दिवसेंदिवस वाढत आहे.
आणि आपली गरिबी जवळ येत आहे
त्याच्या घरी पैसे मोजण्याची मशीन आहे
आणि आपल्या कडे मोजण्या इतके पैसे नाही
त्याची रोज दुधाने अंघोळ असते
कित्तेक घरी प्यायला दुध नसते

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
असे म्हणतात कि तो चोरांना शिक्षा देतो
चोरांन पासून सावध राहा असा संदेश त्याच्याच घरी असतो
आपण म्हणतो कि तो आपल्यात आहे
तर तो आपल्याला माणसात का दिसत नाही
तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही

गुलमोहर: 

खरय.