तो दगडात हि दिसतो

तो दगडात हि दिसतो

Submitted by निलेश गुप्ता on 14 December, 2011 - 02:54

तो दगडात हि दिसतो

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
त्याच्या साठी आपण तासन तास रांगेत थांबतो
जनावरा सारखे धक्का बुक्की करत पुडे सरकतो
आणि नंबर आल्या वर डोक टेकवण्या आधीच बाहेर फेकले जातो.

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही
पार्किंग,चपल,हार, देणगी पेटी, हवन,महा पूजा , महा प्रसाद
या सगळयान , साठी आपण मन मोकळेपणाने पैसे देतो
पण मात्र भाजी वाला , रिक्षा वाला , किराणा वाला , दुध वाला
यांना पैसे देताना एक एक रुपया साठी भांडतो

तो दगडात हि दिसतो पण समोर असलेल्या माणसात दिसत नाही

गुलमोहर: 
Subscribe to RSS - तो दगडात हि दिसतो