बांगड्यांचे तिखले

Submitted by शैलजा on 13 December, 2011 - 10:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ ते ५ ताजे मध्यम आकाराचे घट्ट बांगडे. (शिळे बांगडे निस्तेज असतात आणि मऊ पडलेले असतात. )
अर्धा नारळ खवून
१५ सुक्या बेडगी मिरच्या
सुपारीइतकी चिंच
लहान चमचा धणे
५-६ मिरीचे दाणे
एक कांदा - मध्यम आकारात
पाव चमचा हळद
८-१० तिरफळे (बिया काढून)
फोडणीसाठी खोबरेल तेल
बांगड्याच्या तुकड्यांना लावण्यासाठी तिखट आणि हळद - २ ते ३ चमचे प्रत्येकी. (आवडीनुसार - कसे कमी, जास्त तिखट हवे त्यानुसार)

क्रमवार पाककृती: 

१. बांगडे विकत घेतानाच कोळिणीला साफ करुन देण्यास सांगावे, त्या बांगड्यांचा डोळ्यांचा भाग, पोटातली घाण, कल्ले, शेपटी वगैरे साफ करुन देतील. घरी आणून साफ केल्यास हे सर्व भाग काढून टाकावे.

२. बांगड्यांचे आकारानुसार २ वा ३ तुकडे करुन थोडा वेळ बांगड्यांना मीठ किंवा चिंचेचा कोळ लावून ठेवावा, अंदाजे १५ ते २० मिनिटे, नंतर हे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. मीठ वा कोळ लावून ठेवल्याने माशांचा वास जायला मदत होते. धुवून झाल्यावर तुकड्यांना तिखट, हळद लावून ठेवावे.

३. कांदा चिरावा, चिरलेला कांदा वाटणात वापरायचा आहे. त्यातलाच थोडासा फोडणीसाठी.

४. वाटणासाठी खवलेला नारळ, बेडगी मिरच्या, कांदा, चिंच, हळद, मिरी आणि धणे हे एकत्र करुन मिक्सरमधून काढून घ्यावे. अगदी गंधगोळी असे वाटायचे नाही आणि वाटणात खूप पाणीही वापरायचे नाही.

५. गॅसवर लंगडी तापत ठेवून त्यात २ टेबलस्पून खोबरेल तेल घालून, ते तापले की बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी करावी. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यावर बांगड्याचे तुकडे घालून, त्यावर वाटण घालावे. किंचित पाणी घालावे - सगळे ढवळता येईल इतपत. खूप पाणी नको.

६. ह्यातच आता तिरफळे ठेचून घालावी व चवीपुरते मीठ.

७. १० एक मिनिटे वा उकळी येईपर्यंत शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीठ वा कोळ लावून ठेवल्याने माशांचा वास जायला मदत होते. >>> काहीही.....माशांचा वास कशाला घलवला पाहीजे. ते पण माश्याच्याच रेसीपीत. मिठ, तिखट, विनेगर्/लिंबु/कोळ लावुन चव मुरायला ठेवायचे असते.

एकतर माश्याची रेसीपी त्यात.... फोटो नाही....... या रेसीपीचा णिषेध्ध्ध!!!!

<< अभक्ष्य भक्षण नाही. क्षमस्व ! बटाटा घेऊन हीच पाकृ. करुन बघीन.. >> त्येच्यापेक्षां भक्षणीय अभक्ष्यच परवाडलां !!! Wink
<< ...आणी ही लंगडी... >> माशांचां तिकलां, आमटी, कालवण इ. करताना माशे डावलान ढवळनत नाय; भांडाच हलक्यांसा हलवून मंद विस्तवावर शिजवतत. ह्यासाठीं 'लंगडी' सोयीस्कर पडता. [माकांय सैंपाकातलां कळता, ह्यां दाखवूंक नको ? Wink ]

भाऊकाका, बरोबर. Happy

चातक, माश्यांचा सुरवातीचा हिमूस वास जायला आणि स्वच्छ करायला मीठ वा कोळ लावायची आमच्यात पद्धत आहे. तसेच हिमूस वासासकट आम्हांला खाववत नाहीत. तुम्हांला गरज वाटत नसेल, तर तुम्हीं लावू नका. हाकानाका.

शैलजा, यू टू ! ( ब्रूटस यू टू च्या चालीत ...)
इतके दिवस जागू छळायची आता त्यात तूही सामिल झालीस ना ! पण एक लक्षात ठेव मला तुझे घर कधीही गाठता येईल Wink

Pages