बांगड्यांचे तिखले

Submitted by शैलजा on 13 December, 2011 - 10:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ ते ५ ताजे मध्यम आकाराचे घट्ट बांगडे. (शिळे बांगडे निस्तेज असतात आणि मऊ पडलेले असतात. )
अर्धा नारळ खवून
१५ सुक्या बेडगी मिरच्या
सुपारीइतकी चिंच
लहान चमचा धणे
५-६ मिरीचे दाणे
एक कांदा - मध्यम आकारात
पाव चमचा हळद
८-१० तिरफळे (बिया काढून)
फोडणीसाठी खोबरेल तेल
बांगड्याच्या तुकड्यांना लावण्यासाठी तिखट आणि हळद - २ ते ३ चमचे प्रत्येकी. (आवडीनुसार - कसे कमी, जास्त तिखट हवे त्यानुसार)

क्रमवार पाककृती: 

१. बांगडे विकत घेतानाच कोळिणीला साफ करुन देण्यास सांगावे, त्या बांगड्यांचा डोळ्यांचा भाग, पोटातली घाण, कल्ले, शेपटी वगैरे साफ करुन देतील. घरी आणून साफ केल्यास हे सर्व भाग काढून टाकावे.

२. बांगड्यांचे आकारानुसार २ वा ३ तुकडे करुन थोडा वेळ बांगड्यांना मीठ किंवा चिंचेचा कोळ लावून ठेवावा, अंदाजे १५ ते २० मिनिटे, नंतर हे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. मीठ वा कोळ लावून ठेवल्याने माशांचा वास जायला मदत होते. धुवून झाल्यावर तुकड्यांना तिखट, हळद लावून ठेवावे.

३. कांदा चिरावा, चिरलेला कांदा वाटणात वापरायचा आहे. त्यातलाच थोडासा फोडणीसाठी.

४. वाटणासाठी खवलेला नारळ, बेडगी मिरच्या, कांदा, चिंच, हळद, मिरी आणि धणे हे एकत्र करुन मिक्सरमधून काढून घ्यावे. अगदी गंधगोळी असे वाटायचे नाही आणि वाटणात खूप पाणीही वापरायचे नाही.

५. गॅसवर लंगडी तापत ठेवून त्यात २ टेबलस्पून खोबरेल तेल घालून, ते तापले की बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी करावी. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यावर बांगड्याचे तुकडे घालून, त्यावर वाटण घालावे. किंचित पाणी घालावे - सगळे ढवळता येईल इतपत. खूप पाणी नको.

६. ह्यातच आता तिरफळे ठेचून घालावी व चवीपुरते मीठ.

७. १० एक मिनिटे वा उकळी येईपर्यंत शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

:लाळ गाळ्णारी भावली: ता तिरफळा घालूच्या आधी वायच माका बाजूक काढून ठेव आणि बांगड्याची एक शेपडी Proud

करेक्ट पारंपारिक !
<< ता तिरफळा घालूच्या आधी वायच माका बाजूक काढून ठेव >> तिखलांच होयां मां ? मग तिरफळांशिवाय कसां चलात ! पण , तिरफळांऐवजीं हळदीचां पान टाकून केलेलां तिखलांय मी कोणाकडे तरी खाल्लंय; बरां लागलेलां.

शैलजा, रेसिपी मस्तच पण मी हेच लिहायला आले होते की फोटो का नाही टाकलास ? Happy
बांगड्यात काटे असतात ना खूप ? मला काटे जास्त असलेले मासे खायला भिती वाटते.

रेसिपी मस्त आहे.
फक्त लंगडी म्हणजे काय ते कळले नाही Uhoh
असो, फोटो टाकणे कृपयाच, नायतर पाकृ च्या १० मार्कांपैकी ३ मार्क कट Happy
तिरफळांचाही फोटो टाकल्यास माझ्यावतीने एक मार्क जास्तीचा मिळेल. Happy

तिरफळ काय असते? कुठे मिळते?>
तिरफळ गोवा कोकणचि स्पेशालिटी आहे. ते एक फळ असत ज्याच सुकल्यावर कवच वापरल जात. मिरमीरीत चव असते याचि. आमच्याकडे तिरफळ आणि हळदीच पान वापरुन बनवतात. बांगड्याना भरपुर मिठ लागत.

हे घ्या बांगडे आणि शैलजाचे मार्क वाढवा.

जायफळ आणि दगडीफुलच्या मधला तिरफला आता अजून मार्क वाढवा बघु.

मस्त वाफाळता भात आणि सोलकढीबरोबर.. स्वर्गसुख >>> अगदी अगदी हेच लिहायला आले होते. मस्त
गो शैलजा ! Happy

खुपच छान. तोंपासू येक्दम. बांगडे माझे बी फेवरेट. <<<<<मस्त. भाता बरोबर खायचे ना.>> लाळ गाळणारी बाहुली.

हो ग..
पण मी आज वाचल ना...बुधवारची संकष्टी अगदी परीक्षा पाहते Happy

Pages