मटार, पनीर, बटाटा पराठा

Submitted by राजुल on 13 December, 2011 - 04:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारणा साठी-१ वाटी सोललेला मटार,२ बटाटे, १/४ वाटी किसलेले पनीर, ३ ते ४ मिरच्या वाटून, आले लसूण पेस्ट १/२ चमचा, १ कान्दा, १ चमचा कोथिम्बिर पुदिना पेस्ट, १/२ चमचा लिम्बू रस, १/२ चमचा साखर, मीठ चवी नुसार, १ चमचा तेल.
पारी साठी- १ वाटी कणिक, १/४ चमचा मीठ,१ चमचा तेल, ३ चमचे तेल पराठे भाजाताना.

क्रमवार पाककृती: 

पारी-कणिक, मीठ, तेल एकत्र करून, पुरेसे पाणी घालून मऊसर कणिक भिजवून घेणे.
सारण- मटार ब्लान्च करून मिक्सर मधे बारीक करून घेणे. बटाटे उकडून घेणे. एका कढई मधे तेल गरम करून कान्दा परतून घेणे, त्यात बारिक केलेला मटार परतणे.आले, लसूण, मिरची, कोथिम्बिर, पुदिना पेस्ट टाकवी.मीठ, साखर, लिम्बाच रस टाकावा व एक वाफ काढावी. मिश्रण कोरडे झाल्यावर गॅस बन्द करावा.बटाटा कुस्करून त्यात गार झालेले मटाराचे मिश्रण व पनीर एकत्र करावे.
क्रुति- २ मध्यम आकाराच्या पोळ्या लाटून घ्याव्यात.एका पोळीवर सारण पसरून दुसर्या पोळीने कव्हर करावे.पराठा हलक्या हाताने लाटुन घ्यावा आणि नॉन स्टिक तव्यावर तेल सोडुन खरपूस भाजावा.
गरमा गरम पराठा हिरवी चटणी आणि दह्या बरोबर खावा.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जण
माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थंडीत हा पराठा म्हणजे सु़ख Happy मायबोली वर नवीन आहे, अजून रेसीपी लिहायला शिकते आहे. हळूहळू फोटोज टाकीन. धन्यवाद.