तिखटमिठाच्या पुर्या

Submitted by saakshi on 12 December, 2011 - 04:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. गव्हाचे पीठ - २ वाट्या
२. बेसन - अर्धी वाटी
३. ओवा - १ चमचा
४. लाल तिखट - दिड चमचा
५. चवीनुसार मीठ
६. तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

१.गव्हाचे पीठ, बेसन, लाल तिखट, मीठ एकत्र करून नीट मिसळून घ्या.
२. ओवा दोन्ही तळहातांनी चुरडून त्यात घालावा.
३. दोन चमचे कडकडीत तेल तापवून त्यात घाला. पुन्हा मिसळून घ्या. तेल घातल्यानंतर थोडा वेळ थांबा,नाहीतर मिसळताना तेलाने हात भाजण्याची शक्यता...
४. मग थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्या. १० मिनिटे झाकून ठेवा.
५. मग पुर्या लाटून मंद आचेवर तळा. मंद आचेवर अशासाठी की, पुरी बराच वेळ तळली गेल्याने कडकडीत होते आणि अशा पुर्या ५-६ दिवस आरामात टिकतात. (प्रवासात न्यायला मस्त!!!)

वाढणी/प्रमाण: 
भरपूर होतात........ ३०-४० तरी........ अर्थात आकारावर अवलंबून......
अधिक टिपा: 

तळल्यानंतर पुर्या कागदावर काढाव्यात, म्हणजे जास्तीचे तेल शोषले जाते..
या पुर्या नुसत्याच गट्टम कराव्यात.......
सोबत वाफाळता चहा... जोडीला आवडती गाणी.... आणि बाहेर हवेतला गारवा....... ही भट्टी जमली तर पूर्वजन्मी आपण खूप काहीतरी पुण्य केलेले असणार या बाबतीत निश्चिंत असावे आणि पुर्यांना पोटात जागा द्यावी..... Happy

माहितीचा स्रोत: 
माझी आई...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हि करतो अशा पुर्या....फक्त पुरी लाट्ल्यावर त्याला सुरीने बारिक बारीक भोक करतो....जेणेकरुन त्या फुगत नाही Happy

एक टिप आहे- ह्यात चवीला अर्धा चमचा साखर घातली की कुरकुरीत होतात म्हणे >>> हो इन्द्रधनु, मी एकदा केल्या होत्या तशा, पण त्याने तो तिखट आणि ओव्याचा खमंगपणा कमी होतो... Uhoh

फक्त पुरी लाट्ल्यावर त्याला सुरीने बारिक बारीक भोक करतो....जेणेकरुन त्या फुगत नाही >>> मी_मयुरी, मीही करते तशा पण मी बारीक खाचरया पाडते पुरीला मग न फुगता कडकडीत होतात... Happy

2 चमचे रवा टाकला तरी कुरकुरीत होतात तसेच वाटीभर मेथी ची पाने टाकावी मेंथी - पुरी खायला स्‍वादीष्‍ट लागते

मी केल्या होत्या माग्च्या विकेंड्ला.छान झाल्या पण मला फुगलेल्या पुर्‍या आवड्तात म्हणून मी मंद आचेवर नाही तळल्या.
Puribhaji.jpg