मधुर मिलनातील काही मधु-कण

Submitted by pradyumnasantu on 11 December, 2011 - 11:41

मधुर मिलनातील काही मधु-कण

ती
धुआंधार प्रेमाने तुझिया
काजळ-तोरा विस्कटला
धसमुसळ्या अन करस्पर्शाने
केश न गजरा फिस्कटला
मोहर उमटली ओठावरती
असे वाटते लपवू किती
पुन्हा वाटते जगा कळावी
अपुल्या प्रीतीची किर्ती
हृदयापाशी जाताजाता
हात तुझा का थरथरला?
व्याधी आठवून मम हृदयाची
काय गळा व्याकुळ झाला?
नको घाबरू आज ना उद्या
होईल मजवर शस्त्रक्रिया
परतुन येईन
तुझ्या प्रितीच्या झंझावाताकडे प्रिया

तो:
नाही भिती नाही धास्ती
तुझ्या व्याधीची प्रिये मला
गरज भासता छाती फाडुन
देईन माझे हृदय तुला
भिती वाटते की मी देखील
माझ्या व्याधीने ग्रस्त
यासाठी मी चिंतातुर अन
या प्रश्नाने संत्रस्त

दोघे:
कायावाचामने एकरुप
होऊन आपण एकसाथ
प्राणपणाने लढुया दोघे
जीवनाशी करू दोन हात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रद्युम्न,
या कवितेच्या रचने बद्दल किंवा तिच्यामधून व्यक्त झालेल्या गंभीर परिस्थितीबद्दल प्रत्यवाय नाही पण आवडली नाही म्हटले ते येवढ्याचसाठी की करुणरसाचा, असहाय्यतेचा किंवा उद्वेगाचा ठसा तुमच्या कवितांमधे वारंवार दिसू लागला आहे. यापलिकडलेही विषय तुम्ही हाताळावेत. तुमच्याकडे प्रतिभा नक्कीच आहे. ती एका साच्यात बंद करू नका. सर्व रसातील कवितांची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
खूप सार्‍या शुभेच्छा.

धुआंधार प्रेमाने तुझिया
काजळ-तोरा विस्कटला
धसमुसळ्या अन करस्पर्शाने
केश न गजरा फिस्कटला
मोहर उमटली ओठावरती
असे वाटते लपवू किती
पुन्हा वाटते जगा कळावी
अपुल्या प्रीतीची किर्ती>>>>>ही छोटी कविता खुप आवडली.

या कवितेच्या रचने बद्दल किंवा तिच्यामधून व्यक्त झालेल्या गंभीर परिस्थितीबद्दल प्रत्यवाय नाही पण आवडली नाही म्हटले ते येवढ्याचसाठी की करुणरसाचा, असहाय्यतेचा किंवा उद्वेगाचा ठसा तुमच्या कवितांमधे वारंवार दिसू लागला आहे. यापलिकडलेही विषय तुम्ही हाताळावेत. तुमच्याकडे प्रतिभा नक्कीच आहे. ती एका साच्यात बंद करू नका. सर्व रसातील कवितांची तुमच्याकडून अपेक्षा आहे.
खूप सार्‍या शुभेच्छा.>>>सहमत.

प्राणपणाने लढुया दोघे
जीवनाशी करू दोन हात

मृत्युशी केले पाहिजेत ना दोन हात? निदान व्याधीशी तरी?
कविता मजेशीर वाटली. 'करूण रस' पिळून काढल्यासारखा वाटत असल्यामुळे असेल.

Rofl

कवितेत डॉक्टरकाकांची उपस्थिती! लै करमणूक झाली. हृदयरोग आणि त्याबरोबरच मधु-कणामुळे डायबिटीसही असावा अशी शंका येतेय. डॉक्टरकाकांना पुन्हा दाखवा आणि इलाज सुरू करा.

ही कविता वाचून मन अगदी सुन्न झालं. दोन प्रेमी लोकाची आणि त्या प्रेमावर आलेल्या व्याधीरूपी संकटाचे वर्णन वाचून मनाला अक्षरशः भगदाडे पडली. का देव अशी परीक्षा घेतो? Sad एक बरे आहे, की या दोन प्रेमी जणांकडे शस्रक्रिया करण्यासाठी अथवा अजून काही उपचार करण्यासाठी डॉक्टरकाकांचा मोठा आधार आहे. असे डॉक्टरकाका ज्याना मिळाले असतील ते लोक खरंच नशीबवान म्हणावे लागतील. माझ्या या दोघासाठी शुभेच्छा.

ही कविता नीट वाचल्यानंतर बहुतेक हा रा.वनच्या दुसर्‍या भागाची कथा असावी असादेखील मला प्रश्न पडलेला आहे. हा प्रेमी बहुतेक रा.वन असावा मला दाट संशय आहे. कारण जी.वन शी दोन हात करण्याची अजून कुणाची इच्छा असेल? दुसर्‍ञा भागात त्याला एखादी हिरा.वन मिळाली असेल.

पु.ले.शु.

एकला हॄदय रोग, व एकला मधुमेहानी ग्रासले आहे अशा युगुलावर आधारीत कविता छान आहे. पण डॉक्टरकाका शब्दप्रयोग नाही आवडला. दुसरा शब्द अधिक चांगला वाटला असता.

मामी, नंदिनी: आपल्या संवेदन्शीलतेचे दर्शन प्रतिसादातून घडले. आभार. कवितेहून प्रतिसाद अधिक मनोरंजक असे क्वचितच घडते.

मुक्तेश्वरजी 'डॉक्टरकाका' बदलत आहे.

उत्तम.
सेकंड ओपिनीअन घेतलेले कधीही चांगले. Happy

सशक्त जीवनानुभवाचे पाठबळ असतांनाही प्रतिसादकांच्या टिप्पणीवरून आपल्या काव्यात फेरफार करणे योग्य नाही, असे मला वाटते.