चांगले दृकश्राव्य कार्यक्रम

Submitted by रैना on 10 December, 2011 - 02:28

काय लिहीणे अपेक्षित आहे
- आंतरजालावर असलेले उत्तम दृकश्राव्य, किंवा श्राव्य कार्यक्रमांचे दुवे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाला रुची असली तर हे घ्या
http://www.youtube.com/watch?v=wIDDka3X-LI
जेन ऑस्टेनची Emma . आवडले हे दृश्य रुपांतर. चक्क कादंबरीला न्याय अँड ऑल दॅट. एम्मा किमान चारदा तरी वाचली असेन. या रुपांतरात भाषेत थोडासा बदल केला आहे पण तोही छान वाटतोय. एम्मा आणि मिस्टर नाईटली दोघांचीही कामं उत्तम आहेत.

माझं ऑल टाईम फेव्हरीरट ईप्रसारण.कॉम.
मराठी आणि हिंदी, दर आठवड्याला बदलणारे कार्यक्रम. त्यात आपली आवड, फर्माईश बरोबरच त्यांचे प्रासंगिक कार्यक्रम देखील असतात. शास्त्रीय संगीताचे सुंदर कार्यक्रम असतात आणि त्यात एकेका रागाची सविस्तर ओळख करुन दिलेली असते.
हार्मोनियम वादनाचेही कार्यक्रम असतात. याशिवाय प्रवचन पण असते. सर्वच निवेदक उत्तम निवेदन करतात. शिवाय आता ते आपल्या सोयीप्रमाणे कधीही ऐकता येतात.

भरत- मस्तय हाँ ते. थँक्यु. केवढ्या लहान आहेत देवकीपंडित.
ते निवेदक कोण आहेत हो?

दिनेश,
माहित नव्हते इप्रसारण आता ऐकेन. धन्यवाद.

गुलाम अलीच्या नेहेमी न दिसणार्‍या गझलांमधील एक, आणि गालिबची म्हणून विशेष आवडती.
http://www.youtube.com/watch?v=NWYgP7Sdl8g

ह्याला मिमिक्री म्हणणे केव्हिन स्पेसीवर अन्याय होईल.
http://www.youtube.com/watch?v=bKKDKAKNH-k

soundasiafm.com पण वेळ मिळाल्यास ऐकून बघा. नैरोबीहून प्रसारित होणार्‍या चॅनेलवर जूनी गाणी ऐकवतात. २४ तास प्रसारण असते.
निवेदन चांगले असते. स्थानिक जाहिराती मनोरंजक वाटतील.

मालगुडी डेज सीरियल ज्यांना आवडायची त्यांच्यासाठी : http://www.youtube.com/watch?v=Ahwj4GB_hJM

उजव्या बाजूला मालगुडी डेजच्या इतर भागांच्या लिंक्सही दिसतील. Happy

रैना , ते प्रा सुरेशचंद्र नाडकर्णी. रंग माझा वेगळाचे संगीतकार कोण असतील?
.
.
.
.
.
.
सुधीर मोघे

अलीकडेच आकाशवाणीवर सुरेश भटांच्या आवाजात एक गझल गाण्यांच्या कार्यक्रमात ऐकायला मिळाली Happy

http://www.youtube.com/watch?v=pAsmDSpjWIM&feature=related
ऑडेन यांच्या जीवनावरचा आणि त्यांच्या कवितांवरचा माहितीपट. वेळ आणि मुड पाहुन पहावा लागतो.

W.H. Auden यांची Funeral Blues ही अप्रतिम कविता मी Four Weddings & a funeral http://www.youtube.com/watch?v=b_a-eXIoyYA या चित्रपटात पहिल्यांदा पाहिली. ते शब्द मनात रुतुन राहीले. त्या कवीचे कधी नाव ऐकले नव्हते. मग कविता शोधल्या. साधे सोपे इंग्रजी शब्द, सहसा यमक जुळणारे, विलाप, दु:ख्खावेग, रक्त गोठवणारी थंडी आणि ओघळणारे गरम अश्रु, विध्वंस आणि आयुष्याची/देशाची पुनर्बांधणी त्याच्या शब्दातून सहज भेटावेत.

Poems of loss, of grief, of trying to make sense of the world तरीही रोमँटिक.
ना कवितेची भीती वाटावी, ना इंग्रजी भाषेची अशी साधी भाषा, तरीही परिणामकारक. इंग्रजी स्वभावधर्माच्या कविता. नियमबद्धतेशी, संकेतबद्धतेशी कुठल्याही संवेदनशील मनाप्रमाणे सतत झुंझणारी कविता..
किती साधे शब्द आहेत पहा. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही ची आठवण येईल..
http://www.poemhunter.com/poem/the-unknown-citizen-4/

War is simple like a monument असे तो लिहीतो तेव्हा फाडकन मुस्काटात बसते.

दुसर्‍या महायुद्धाने या संवेदनशील कवीला आणि त्याच्यासारख्या पिढ्यांना उभेआडवे सोलुन काढले.
I do believe that in critical times such as ours, the poet must have direct knowledge of the major political events
भावनेच्या भरात कविता लिहील्याही.. नंतर स्वतःच त्यावर निषेध नोंदवला.
सनकी म्हातार्‍याचे स्पष्ट विचार. त्याकाळात लिहीलेली स्वतःचीच एक कविता त्याला आवडत नाही.
मुलाखतकार विचारतो I am just wondering, whether you are quite right to be a self confident censor of the young Auden..
...उत्तरः I object to the manner. Its too highflown
Even if you.. you can't really excise it except in the present editions of your...
उत्तरः While I can.. I just want people to know, I disapprove Lol
१ सप्टेंबर १९३९ ही ती कविता.
http://www.youtube.com/watch?v=oWtVYYoJFl4&feature=related ९/११ नंतर पुन्हा वाचली जाऊ लागली.

...We made a great mistake in the 30's, in writing about things that we did'nt know about
....Unhappy as we were in my youth, I never recall being bored, yet that is something that I see in the youth today...
Before 1930 I never opened a newspaper.
..at 19 I knew the poems I was writing were a mere derivative..
हे सगळे या माहितीपटात आहे.

या ओळी मला आवडतात
How should we like it were stars to burn
With a passion for us we could not return?
If equal affection cannot be,
Let the more loving one be me.

http://www.poemhunter.com/poem/the-labyrinth-2/
ही मला आवडते.

काही ओळी वानगीदाखल
Once we had a country and we thought it fair,
Look in the atlas and you'll find it there:
We cannot go there now, my dear, we cannot go there now.

ही अजून एक गाजलेली. http://www.poemhunter.com/poem/o-tell-me-the-truth-about-love

http://www.poemhunter.com/poem/in-memory-of-w-b-yeats-2/
इथे ऑडेनच्या सत्तर कविता आहेत एकुणात.
हीच कविता त्यांनी स्वतः वाचलेली. सुरेख वाचन.
http://www.youtube.com/watch?v=BNlS_Vbip_Q&feature=related

एक भारी प्रयोग. पश्चिमी वाद्य (काय आहे काय ते? सिंथ/ पियानो की काय?) आणि 'आज जाने की जिद ना करो'
त्या मुलीने गायलेही काय सुरेख आहे.
http://www.youtube.com/watch?v=m3ZyU98N3Fk&feature=related

तुफान आहे तो शंकर टकर. बाकीचेही व्हिडीयो भारी आहेत. क्रेझी फ्युझन.

थँक्यू रैना... इस्पेशियली तिचा आवाज आणि गाण्यातली सहजता आवडली..
(मला पर्सनली जास्त इन्स्ट्रुमेंटस आवडत नाहीत - पण एकूणात प्रयोग आवडला)

तिची पट्टी पहा किती नैसर्गिक नॉर्मल आहे. आणि कुठे काय कमी पडतय का गाण्यात त्यामुळे? तारसप्तकात किंचाळण्याची गरज नाही लताबाईंचे अनुकरण करायला (लताबाई गिफ्टेड आहेत. बाकीच्यांनी मुकाट आपल्या पट्टीत गावे) हे लोकांना कधी कळणार.
वे टु गो. तिचे ते 'सपनो से भरे नैना'ही मस्त आहे.

अकु, कोण आहे कोण हा शंकर टकर? मला फ्युजन एक पैसाही आवडत नाही खरंतर, पण कालपासून येड लागलय.

तिथे त्या तमिळ 'आशई मुगम' गाण्यावर कोणीतरी लिहीलही आहे की
If Kolaveri can get 30Millions i believe this one deserves more. Thumps up if u agree

http://www.youtube.com/watch?v=d9q8MxZ2NYk&feature=relmfu
Kandukondein kandukondein - मस्तय ही हार्मनी सुद्धा.

शंकर टकर का? .. वा वा गुरू माणूस आहे.
ARR che मुन्बे वा : मुन्बे वा मला ओरिजीनलपेक्षा जास्त आवडते.
सुरूवातीचा आलाप असा काही आहे ना ... गोरखकल्याण असावा बहुतेक असाच ...

रैना, धन्यवाद. अफाट सुंदर आहे आज जाने की.. आणि सपनों से भरे नैना तर अशक्य. कालवाकालव होते ऐकताना. एकूणच गाणारा गायक, वाद्य वाजवणारा वादक पाहताना मला एकदम अलौकिक असं काहीतरी वाटायला लागतं. म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या रोजच्या आयुष्यातल्या लढाया,प्रश्न नसतीलच, एकदम अ सामान्य असं. संगीत, गाणं ऐकण्याशिवाय माझा त्याला स्पर्श नाही ही खंत राहून राहून जाणवते. सपनों से भरे ने तर तेच घुसळून वर आलं पुन्हा. धन्यवाद.

रैना, भारतात तो २०१० पासून पं. हरिप्रसाद चौरसियांकडे शिकतोय. पण त्याअगोदरचा त्याचा वेस्टर्न म्यूझिक वरचा जबरी अनुभव / अभ्यास आहे. त्याची साईट आहे त्यावर त्याची माहिती, गाणी, सबकुछ आहे : http://www.shankartucker.com/bio
तो ज्या प्रकारे ही गाणी हँडल करतो ते खरंच मस्त आहे.... आणि त्याची गाणी कोठेही jarring होत नाहीत. मोस्ट सूदिंग वन्स!! Happy

टिव्हीवर बीबीसी एंटरटेंनमेंट चॅनेलवर सध्या ह्युमन प्लॅनेटची सिरीज दाखवत आहेत. अजिबात संधी सोडू नका. केवळ अप्रतिम!!!

ओह धन्यवाद श्यामली/ अकु. तुम्ही दिलेल्या दुव्यावरची त्याची माहिती वाचली. Happy

नंद्या- हो तेही भारी आहे.

अश्विनी- हो ना अगं ते 'सपनों से भरे नैना' खत्तरनाक जमलय. मूळ गाण्याहुन सुरेख. चढलेय ते गाणे मला आता.
ते क्लॅरिनेट असं बासरीसारखं वाजवलय.

थँक्स मामी. पहायला पाहिजे ऑनलाईन दिसतय का ते.

Pages