तुम्ही यातील कोणत्या वर्गात मोडता...??

Submitted by मी_केदार on 9 December, 2011 - 03:59

सुरवातीलाच दिवे घ्या ........
फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती .. यावर आधारीत
मायबोली वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती ..

१. मायबोली कोंबडा ...: यांना वाटते कि रोज सकाळी , " गुड मोर्निंग " ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.

२. मायबोली बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .

३ . मायबोली देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.

४. मायबोली न्वूज रीडर : जागत काय चालू , ह्या न्वूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्वूज सांगत सुटतात.

५. मायबोली टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.

६. मायबोली विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.

०७. मायबोली कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.

०८. मायबोली विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.

०९. मायबोली कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.

१०. मायबोली द्वेषी : ह्या लोकांना मायबोली वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.

११. मायबोली च्याटर : यांना मायबोली वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,

१२ . मायबोली लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.

१३. मायबोली माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा ........ हि हि करत असतात.

१४ . मायबोली कलेक्टर : हे फक्त मायबोली वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.

१५. मायबोली कोळी - हे लोक नविन-नविन धागे काढत रहतात आणि बाकीचे त्यात गुंतत रहातात.

१६. मायबोली हवाबाण - हे लोक फक्त वेगवेगळ्या बा.फ.वर जाऊन पेटलेल्या आगीला वारा घालण्याचे काम करतात.

१७.मायबोली रिक्शा ड्रायव्हर - सूज्ञांस सांगणे नलगे.

१८. मायबोली धुमकेतू - जे सदस्य आहेत पण मधूनच गायब होतात आणि पुन्हा काही काळाने प्रकट होतात...

तुम्ही यातील कोणत्या वर्गात मोडता...??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्की | 10 December, 2011 - 03:31 नवीन

चौथी 'ब'! म्हणजे इथेहि जाति, पोटजाती वगैरे लगेच आहेच का?
मी ०७ मधे. सगळीकडे लिहितो पण सगळ्या लिखाणातून गोळाबेरीज अर्थ शून्य.

***

झक्कीकाका
चश्मा बदला हो. इथे जात पोटजात कुठून आली.
अन तुम्ही ०७ नको. ००७ म्हणा. टॅम्स ख्वाँड लाय्सन्स टू चिल्ल..

०९. मायबोली कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.>>>>>याचा अर्थ तुम्ही नक्कीच "मायबोली द्वेषी" आहात.

मनोरंजक आहे........ यात भर घालता येईल अजून......

कृपया मायबोलीवरच्या "अमीर खानच्या गर्लफ्रेंड कम बायकोला" संपर्क करा Proud अर्थात ती सध्या तिच्या मूळ नावाने वावरतेय की "माणसात" आलीये हे ही तपासून घ्या......... Biggrin

नाहीतर शोधायची किरण आणि सापडायचा मॅन स्पायडर Wink Light 1

मायबोली कोळी - हे लोक नविन-नविन धागे काढत रहतात आणि बाकीचे त्यात गुंतत रहातात.: Rofl

सद्ध्या हे कोण ते सांगायला हवे का???? Lol

मायबोली अ‍ॅडमीन - स्वतःच्याच धोरणाविरुध्द झालेले लिखाण मुकाटपणे पहातात आणि दुर्लक्ष करतात. हीन शेरे, हीन वैयक्तीक टीका, शिवीगाळ याकडे दुर्लक्ष करुन फक्त सदस्य संख्या कशी वाढेल याकडे लक्ष देतात.

Pages