तुम्ही यातील कोणत्या वर्गात मोडता...??

Submitted by मी_केदार on 9 December, 2011 - 03:59

सुरवातीलाच दिवे घ्या ........
फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती .. यावर आधारीत
मायबोली वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती ..

१. मायबोली कोंबडा ...: यांना वाटते कि रोज सकाळी , " गुड मोर्निंग " ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.

२. मायबोली बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .

३ . मायबोली देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.

४. मायबोली न्वूज रीडर : जागत काय चालू , ह्या न्वूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्वूज सांगत सुटतात.

५. मायबोली टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.

६. मायबोली विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.

०७. मायबोली कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.

०८. मायबोली विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.

०९. मायबोली कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.

१०. मायबोली द्वेषी : ह्या लोकांना मायबोली वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.

११. मायबोली च्याटर : यांना मायबोली वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,

१२ . मायबोली लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.

१३. मायबोली माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा ........ हि हि करत असतात.

१४ . मायबोली कलेक्टर : हे फक्त मायबोली वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.

१५. मायबोली कोळी - हे लोक नविन-नविन धागे काढत रहतात आणि बाकीचे त्यात गुंतत रहातात.

१६. मायबोली हवाबाण - हे लोक फक्त वेगवेगळ्या बा.फ.वर जाऊन पेटलेल्या आगीला वारा घालण्याचे काम करतात.

१७.मायबोली रिक्शा ड्रायव्हर - सूज्ञांस सांगणे नलगे.

१८. मायबोली धुमकेतू - जे सदस्य आहेत पण मधूनच गायब होतात आणि पुन्हा काही काळाने प्रकट होतात...

तुम्ही यातील कोणत्या वर्गात मोडता...??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
आणखी काही -
- मायबोली कोळी - हे लोक नविन-नविन धागे काढत रहतात आणि बाकीचे त्यात गुंतत रहातात.
- मायबोली हवाबाण - हे लोक फक्त वेगवेगळ्या बा.फ.वर जाऊन पेटलेल्या आगीला वारा घालण्याचे काम करतात.
- मायबोली रिक्शा ड्रायव्हर - सूज्ञांस सांगणे नलगे. Lol
[दिवे घ्यालच]

आता मला 'निल्या' च्या पोस्टीवर दात काढायचे होते, पण लगेच मला माबो 'माकड' म्हणणार म्हणुन एक एक वाक्य टाइप केलं. Wink

केदार, नविन सुचवलेल्या काही सिलेक्टेड कॅटेगरीज टाकाना तुमच्या वरच्या लेखनात. जसं कि कोळी, रिक्षा ड्रायव्हर. कोळीचा किताब जामोप्यांनाच्च ! Happy

24.gif24.gif24.gif

udayone :mast aahe....aata naave liha baghu >>>>>>>>>

म्हणतोय त्याप्रमाणे नावे होऊन जाउद्यात ! काय म्हणताय:;)

केदार, धागा बंद पाडायचाय का स्वतःचा? Wink प्रत्येकाला स्वतःपुरतंच बोलु देत. मी जामोप्यांच्या फॅनक्लबात आहे, Wink म्हणुन त्यांचं नाव लिहिलं. आपल्या उमेदवाराची १००% खात्री असल्याशिवाय नाव नकोच. Happy

केदार,
मनापासून सांगते, हे लिखाण मला व्यक्तिश: फार पटलं नाही आणि आवडलंही नाही. कोणत्याही व्यक्तिला (निदान इथे मायबोलीवर तरी) एकाच कॅटेगरीत टाकणे मुश्किल काम आहे. कोणतीही व्यक्ती फक्त काळ्या किंवा पांढर्‍या व्यक्तिमत्वाची नसते. त्यात मिक्स्ड शेड असते. व्यक्तिशः मी कधी टिका करेन, कधी रिक्षा फिरवेन, कधी बाबा सारखं वागेन वेळ पडल्यास माकडासारखं सुद्धा वागेन. त्यामुळे मी या सर्व कॅटेगरीत मोडते सुद्धा आणि मोडत नाही सुद्धा.

मनिमाऊ : प्रत्येकाला स्वतःपुरतंच बोलु देत>>>>>>>> अनुमोदन

दक्षिण:: मी या सर्व कॅटेगरीत मोडते सुद्धा आणि मोडत नाही सुद्धा. >>>>>>>>>>>>>>. हे सर्वांच्याच बाबतीत घडतं, पण एक गंमत म्हणून मी पोष्टलय ...... म्हणूनतर सुरवातीलाच Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 Light 1 घ्या म्हणालोय. Happy

jyannchi tubelight lavkar petat nahi tyanni bulp ghyaaaa... Happy

ani jyanchi petate tyanni starter badalun ghya...
magach vaachaa

चौथी 'ब'! म्हणजे इथेहि जाति, पोटजाती वगैरे लगेच आहेच का?
मी ०७ मधे. सगळीकडे लिहितो पण सगळ्या लिखाणातून गोळाबेरीज अर्थ शून्य.

मी दक्षिणाशी सहमत. इतरांचं सोडा पण मी स्वतः यापैकी पर्टीक्युलर एकाच कॅटेगरीत मोडेन असं वाटत नाही. एकच व्यक्ती यापैकी एक, एकापेक्षा अधिक किंवा सर्वच प्रकारात मोडण्याची शक्यताच जास्त आहे. हेमावैम. Happy

बाकी मनोरंजनाच्या दृष्टीने लिहिलं असलंत तर उत्तम जमलंय. Wink

चान्गली वर्गवारी Happy
मी १ ते ७ यातिल सर्व प्रकारात असू शकतो.
८ ते १८ मला लागू नाहीत असे माझे मत आहे.

अरे बाबान्नो, इथे कुठे लिहीलय की स्वतःला एकाच एका क्याटेगरीत मोजा? अन लिहील असल तरी आपण मानणार का? Wink

१. मायबोली कोंबडा ...: यांना वाटते कि रोज सकाळी , " गुड मोर्निंग " ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.
= होय, मी रोज सकाळी आल्याआल्या सिंहगडरोड बीबीवर जाऊन पेशल नमस्ते/रामराम/सलाम घालुन येतो.

२. मायबोली बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .
= होय, मी धार्मिक गृपचा सभासद आहे व तिकडेच नव्हे तर विपुमधेही प्रवचनात्मक हातहातभर लाम्ब पोस्टी टाकतो. Proud (कोण किती वाचते काय की!)

३ . मायबोली देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
= मी असा आहे असे माझे म्हणणे नाही, पण येथिल बरेचसे लोकच असे म्हणतात की लिम्ब्या म्हणे आपली वैयक्तिक आयुष्यातील दु:खद घडामोडी इथे मान्डून "सहानुभूती गोळा करू पहातो"

४. मायबोली न्वूज रीडर : जागत काय चालू , ह्या न्वूज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्वूज सांगत सुटतात.
= या प्रकारात माझी स्वगते बसू शकतात.

५. मायबोली टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसर्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.
= मी कधीही नविन धागे उघडत नाही. स्वतःची स्वतन्त्र पोस्ट तर क्वचितच. जे काय अस्ते ते "प्रतिसादात्मक / प्रतिक्रियात्मक". हां, आता काही लोकं त्यालाच टीका असे म्हणतात, पण त्याला माझा नाईलाज आहे.

६. मायबोली विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.
= मी तसा प्रामाणिक प्रयत्न करत अस्तो, पण लोकं (विनोद न समजल्यामुळे म्हणा वा स्वतःच्या कम्पुच्या ऐहिक सुखदु:खात रममाण असल्यामुळे म्हणा) हसायच्या ऐवजी अनुल्लेख करणे जास्त पसन्द करतात, त्यालाही माझा नाईलाज आहे.

०७. मायबोली कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.
= काय हे... इथेही लिहितोच आहे ना? तरि अजुन विश्वास नै बसत?

*****************

०८. मायबोली विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.
= चांगले वाईट हे सापेक्ष अस्ते, त्यातुन चांगले चांगले ठरविणे हे "कोणती आयडी" लिहीते आहे यावरही बरेच अवलम्बुन अस्ते. Proud सबब मी या वाटेला जातच नाही.

०९. मायबोली कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
= आयुष्यात मी एकदाच प्रेमात पडल्यावर एकदाच कविता केल्या होत्या, त्या ऐकवल्यावर चतुर्भुजही झालो. पण चतुर्भुज होण्याचे दु:ष्परिणाम जाणविल्यावर पुन्हा कविता करुन कुणाला ऐकविण्याचे धाडस आजवर झाले नाहीये. Proud सबब, मी या प्रकारात नाही.

१०. मायबोली द्वेषी : ह्या लोकांना मायबोली वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.
= हे माझ्याबाबत खरे नाही. मी माझ्या "शत्रुपक्षाचे" देखिल कौतुकच करतो. (कदाचित शत्रुपक्षही हे मान्य करील)

११. मायबोली च्याटर : यांना मायबोली वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,
= गप्पा मारण्यास, स्वतः बोलणे, याबरोबरच आपल्या बोलण्यावर "दुसरा-समोरचा" काय बोलतो ते ऐकणे-समजुन घेणेदेखिल तितकेच महत्वाचे अस्ते. नेमका याबाबत मी नापास असल्याने या क्याटेगरीत मी नाही. मी एकतर स्वतःच बोलत सुटू शकतो, किन्वा केवळ अन केवळ श्रोता बनुन राहू शकतो (जसे लिम्बीसमोर रहातो Wink )

१२ . मायबोली लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.
= लिम्बुटीम्बू या आयडीला असली थेर करण्याची आवश्यकता नाही.

१३. मायबोली माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा ........ हि हि करत असतात.
= माबोवर स्मायलिजची सन्ख्या कन्जुषान्सारखी काटकसर करीत अत्यन्त तुटपुन्जी असल्याने मी या प्रकाराच्या वाटेला जात नाही. (नै त काय्? सारख सारख काय त्याच त्या दातड्या विचकलेल्या अन डोळामारलेल्या अन हहगलोच्या त्याच त्या स्मायल्या? काही वेगळ नको? )

१४ . मायबोली कलेक्टर : हे फक्त मायबोली वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.
= हा प्रकार जर रेल्वे स्टेशनवरल्या तिकिट कलेक्टर कम तिकिट चेकर सारखा अस्ता तर विचार केला अस्ता. कारण येणारी प्रत्येक नविन पोस्ट्/पेज मी चेक करतोच करतो, व शक्य तिथे तिथे खरडतो देखिल. पण म्हणूनच मी या प्रकारात नाही.

१५. मायबोली कोळी - हे लोक नविन-नविन धागे काढत रहतात आणि बाकीचे त्यात गुंतत रहातात.
= हो आहेत असेही लोक. ते (खास करुन धार्मिक विषयान्वर) धाग्यान्च्या जाळी विणतात, माबोकर गुन्ततात, अन वैचारिकरित्या गुन्तलेल्या माबोकरान्ना अलगद सोडविण्याकरता मी माझ्या पोस्टीन्चा वस्तरा तिथे कराकरा चालवित ती जाळी तोडून मोडून टाकतो अन मग त्या त्या बीबीला टाळे लागते Proud
लोक नविन जाळी विणायला जातात.

१६. मायबोली हवाबाण - हे लोक फक्त वेगवेगळ्या बा.फ.वर जाऊन पेटलेल्या आगीला वारा घालण्याचे काम करतात.
= मी काड्या टाकतो असे लोक म्हणतात, अन म्हणून ते खरेही असेल, पण मग एकाच वेळेस काड्या टाकणे अन वारा घालणे ही दोन्ही कामे कशी शक्य होतील? एक कायतरी बोला राव.

१७.मायबोली रिक्शा ड्रायव्हर - सूज्ञांस सांगणे नलगे.
= मी रिक्षा ड्रायव्हर नाही.

१८. मायबोली धुमकेतू - जे सदस्य आहेत पण मधूनच गायब होतात आणि पुन्हा काही काळाने प्रकट होतात...
= मी राशीला लागल्याप्रमाणे इथेच पडिक अस्तो असे लोकान्चे मत आहे.
*****************
हुश्श्य!
आता या पोस्टला कन्च्या क्याटेगरीत टाकावे बरे?

>>>> तो आरत्यांचा धागा ही तुमचीच निर्मिती ना? <<<
विनन्तीवजा हूकूमनाम्याला तुम्ही चर्चेचा/गप्पागोष्टीन्चा धागा म्हणता? Proud

१०. मायबोली द्वेषी : ह्या लोकांना मायबोली वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात
- मला अशाच लोकांचा भरणा अधिक वाटतो.
आपण काही लिहायचं नाही, दुसर्‍यांनी काही प्रयत्न केला तर त्यांना बरं म्हणायचं नाही.

काही लोकांना प्रतिभेच्या प्रदर्शनाचा संकोच वाटू शकतो. माझ्या लक्षात आले आहे कि असे काही आयडीज आहेत ज्यांना निव्वळ सृजनात, निर्मितीत रस आहे, पण आपल्याचनावासमोर सगळे लागू नये म्हणून निरनिराळ्या टोपणनावांनी त्यांना हे लिखाण करावं लागतं..

मी समजून घेऊ शकतो... सगळ्यांना नाही समजणार Wink

Pages