माय(बोली) प्रतिज्ञा

Submitted by बागुलबुवा on 6 December, 2011 - 23:23

मायबोली गीत व मायबोली व्हिडीयो वरुन प्रेरणा घेउन आपण एक मायबोली प्रतिज्ञा का बनवू नये बरे ?

मायबोली माझी(च) साईट आहे.
सारे मायबोलीकर माझे मित्र व माझे शत्रू यात विभागले गेले आहेत. म्हणजेच जे माझे मित्र नाहीत, उघड आहे की ते माझे शत्रू आहेत. माझ्या मतांना विरोध करणारे मूर्ख आहेत. माझी मते न समजणारे वा त्यांची टवाळी करणारे अतिशहाणे आहेत.

माझ्या लेखनातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मतांचा मला (दुरा)भिमान आहे.
त्या मतांचा आदर करण्याची पात्रता इतरांच्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझे लांगूलचालन करणार्‍यांचाच मान ठेवीन व त्यांच्याशी सौजन्याने वागेन. त्यांच्याद्वारे व इतर उपायांनी माझे लेखन वर आणण्याचा व लोकप्रिय असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तिन्ही शिफ्टमध्ये रीक्षा फिरवून आमंत्रण करेन.

माझा (ओरिजनल) आयडी व माझे ड्यू आयडी यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. माझी वाहवा व कंपू बनवणे यातच माझे सौख्य सामावले आहे.

डिस्क्लेमरः भारतीय संविधानाचा पूर्ण आदर बाळगूनच सदर लेखन केलेले आहे. त्यासंबधीचे वाद कृपया आपल्या राखीव कुरणात घालावेत.

गुलमोहर: 

डिस्क्लेमरः भारतीय संविधानाचा पूर्ण आदर बाळगूनच सदर लेखन केलेले आहे. त्यासंबधीचे वाद कृपया आपल्या राखीव कुरणात घालावेत. >>> हे लिहिलंस ते बरं केलंस.

<<त्यांच्याद्वारे व इतर उपायांनी माझे लेखन वर आणण्याचा व लोकप्रिय असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तिन्ही शिफ्टमध्ये रीक्षा फिरवून आमंत्रण करेन. <<<

हे भारीय... Rofl

निषेध! निषेध! निषेध!

डिस्क्लेमरः वरिल निषेध विडंबनाचा नव्हे तर... लांगूलचालन आणि वाहवा करणार्‍या कंपूचा आहे.

बा-बू...
व्वा...!!! बरां वाटलां... बर्‍याच लोकांच्या मनांतलां बोललंस...
Lol

व्वा बा.बु. खुप दिवसांनी..
आवडल..
मस्त जमलय..
छान विडंबन..:)

नेमक लिहीलय Happy

अर्थात काही वाक्ये अशीही चालली अस्ती (मला) Proud .

>>> सारे मायबोलीकर माझे मित्र व माझे शत्रू यात विभागले गेले आहेत.
= सार्‍या मायबोलीभर माझे शत्रू विखुरलेले आहेत. Proud

>>> माझ्या मतांना विरोध करणारे मूर्ख आहेत. माझी मते न समजणारे वा त्यांची टवाळी करणारे अतिशहाणे आहेत.
= माझ्या मतांना विरोध करणारे दगडावर डोके आपटून घेत आहेत तर अनुल्लेख करणारे निरक्षर वन्चित घटक आहेत. माझी मते न समजु शकणार्‍यान्ना व माझ्या मतान्ची टवाळी करणार्‍यान्ना आता देवच सद्बुद्धि देवो.

>>>> मी माझे लांगूलचालन करणार्‍यांचाच मान ठेवीन व त्यांच्याशी सौजन्याने वागेन.
= माझ्या लिखाणास आवर्जुन फॉलो करणार्‍यान्चा (पाठलाग करणारान्चा, भले ते शत्रुपक्षातील असतील) मी मान ठेविन व त्यांच्याशी सौजन्याने वागेन.

बाबू Lol

Pages