स्वयंसेवक हवेत - मायबोली शीर्षक गीत

Submitted by रूनी पॉटर on 5 December, 2011 - 14:47

यंदाच्या मायबोली गणेशोत्सवात "मायबोली शीर्षक गीत" स्पर्धा घेतली होती आणि त्यात श्री. उल्हास भिडे यांनी लिहीलेल्या गीताची शीर्षक गीत म्हणून निवड झाली. जगभरातल्या मायबोलीकरांनी मिळून हे गायले आहे आणि लवकरच मायबोलीवर प्रदर्शित केले जाईल.

या उपक्रमासाठी वेगवेगळ्या कामांसाठी स्वयंसेवक हवे आहेत.

या गीताबरोबरच "मेकींग ऑफ मायबोली शीर्षक गीत" स्वरुपाचा छोटा व्हिडीओ अथवा पॉवर पॉइंट प्रेझेंट्रेशन तयार करायचे आहे. याचा कच्चा आराखडा तयार आहे त्याच्यावर योग्य ते काम करून एक चांगले प्रेझेंटेशन तयार करायचे आहे. या कामासाठी तांत्रिक मदत करू शकतील असे काही मायबोलीकर हवे आहेत.
ज्यांना हे काम करायला आवडेल त्यांनी कृपया श्री उल्हास भिडे यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा.

जरी हे काम जमणार नसेल आणि या उपक्रमासाठी इतर कामात मदत करण्याची इच्छा असेल तर कृपया याच पानावर खाली तसे लिहा.
धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय काय कामे अपेक्षित आहेत? आनि पात्रता काय लागेल? >>>
रुनी यांच्या वरील पोस्टमध्ये काय करायचं आहे ते सांगीतलं आहेच. कृपया हे " या गीताबरोबरच ……… मायबोलीकर हवे आहेत" परत वाचावे.

थोडक्यात सांगायचं तर सदर शीर्षक-गीताला अनुरूप असा एक व्हिडिओ (अ‍ॅनिमेशन सहित) तयार करायचा आहे. जो गीताच्या ऑडिओबरोबर पूर्णत:(अर्थ/आशय तसंच गीताला लागणारा वेळ इ.) मॅच होणारा असावा.

इच्छुक माबो सदस्य अशा प्रकारचे इफेक्ट्स देऊ शकण्याइतपत जाणकार आणि निष्णात असावा.
व्हिडिओचा Screen-play त्याला/तिला दिला जाईल आणि त्यानुसार ऑडिओ बरोबर व्हिडिओ इफेक्ट्सचं
Synchronization साधून व्हिडिओ बनविणे अपेक्षित आहे.

अरे वा ! खुप छान कल्पना ! मला आवडेल यात काम करायला.
मला प्रिमियर आणि आफ्टर इफेक्ट या दोन्हीत काम करायचा थोडा अनुभव आहे.
माझी 'सफर बांधवगडची' हितगुज दिवाळी अंकातली फिल्म आणि दिपज्योती दिवाळी अंकातील 'पृथ्वीचे पाणिग्रहण' ही फिल्म बघितलीत तर थोडा अंदाज येईल.
मायबोलीच्या शीर्षक गीताच्या फिल्मसाठी मी काही करू शकले तर मला खुप आनंद होईल, धन्यवाद !

मला ह्या प्रोजेक्टवर काम करण्याची इच्छा आहे.
लहान प्रमाणात movie making, Audio-Video editing वगैरेचा थोडाफार अनुभव आहे आणि आजवर केलेले प्रोजेक्टस पाहता, बहुतेक अश्या कामासाठी लागणारं थोडंफार creative mindset पण असावं असं वाटतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करायची इच्छा आणि passion आहे.
सहभागी करुन घेतलंत तर नक्की आवडेल काम करायला. Happy

>>काय काय कामे अपेक्षित आहेत?

तूर्तास वर ऊल्हास भिडे यांनी लिहीले तसे ध्वनिमुद्रीत केलेल्या मायबोली गीतावर फोटोज, व्हिडीयो, आदी संस्करण करायचे आहे. भिडे यांनी एक कच्चा आराखडा (पॉवरपॉईंट स्लाईड्स) तयार केला आहे. ज्यात मूळ गीत व एकंदर तयार झालेल्या अंतीम ध्वनिमुद्रीत गाण्याच्या अनुशंगाने स्लाईड्स/दृक्श्राव्य दाखवले जाईल. हे दोन पायर्‍यात विभागले जाईल. पहिले साधारण एक मिनीटाचा निवडक भाग (ट्रेलर) तयार करायचा आहे आणि मग संपूर्ण गीतासाठीचे सादारीकरण बनवायचे आहे. पहिला (ट्रेलर) भाग साधारण या महिन्या अखेर पर्यंत मायबोलीवर विशेष बातमीफलकावर अपलोड केला जाईल. आणि मग थोड्याच कालावधीत जेव्हा गाण्याच्या लाँच ची तारीख जाहीर केली जाईल तेव्हा संपूर्ण भाग अपलोड केला जाईल.
थोडक्यात भिडे यांनी बनवलेल्या कच्च्या आराखड्याचे पुढे अंतीम स्वरूप बनवणे, त्यावर सुबकता, कलाकुसर, ईतर नविन कल्पना (प्रदर्शन/प्रसारण च्या अनुशंगाने) यांचा अंतर्भाव करणे या सर्वाबरोबर तांत्रिक काम (ऑडीयो वा व्हिडीयो एडीटींग) असे अपेक्षित आहे.
श्री भिडे, व मी (जमेल तसे) कल्पना/संकल्पना देवाण घेवाण व अंतीम रूपरेषा बनवणे यात सहभागी असूच पण मुख्य काम स्वयंसेवकांनाच करायचे आहे. एकंदरीत ४-५ जणांचा गट बनवून मग काम वाटप वगैरे केले जाईल.
>>>>जरी हे काम जमणार नसेल आणि या उपक्रमासाठी इतर कामात मदत करण्याची इच्छा असेल तर कृपया याच पानावर खाली तसे लिहा.

गीताला भविष्यात मिळालेल्या प्रतीसादावरून यातून पुढे जाहिरात, प्रतीक्रीया, संवाद, गाण्याचे प्रसारण ई. बाबत अधिक काम केले जाण्याची शक्यता आहे असे संस्थापकांकडून समजले.

तेव्हा तूर्तास तुमच्या सहभागाची नोंद ईथे करावी.

अजून काही काम बाकी असेल तर थोडीफार मदत करता येईल... व्हिडीओ एडीटींग, मिक्सींग, असले उद्योग करायचा अनुभव आहे..

'गीत-ध्वनीमुद्रणा'त सहभागी होतो... या भागात देखिल काम करायला मनापासून आवडेल, फक्त या अपेक्षीत क्षेत्राचा अजीबात अनुभव नाहिय... अनुभवी तंत्रज्ञांचा सहाय्यक/ मदतनिस म्हणून काम करायला निश्चीतच आवडेल... Happy ...

"रार" कडे या कामाची प्रमूख सूत्रे सोपवली आहेत.

ईच्छुकांनी आपली नावे (मायबोली आयडी) व ईमेल संपर्क "रार" व "उल्हास भिडे" यांना २२ डीसेंबर तारखेपर्यंत पाठवावी. सर्वांचा मग एक ईमेल गृप करून पुढील काम केले जाईल. पुढील एक महिना तुमच्या व्यस्त दैनंदिनीतून या कामासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. नेट अ‍ॅक्सेस, नेमून दिलेले काम वेळेवर करून ते ईमेल द्वारे पोचविण्याची तयारी हे अतीशय आवश्यक आहे.
अनुभव/पात्रता/ऊपलब्ध साहित्य यापैकी काहिही:
१. फोटो एडीटींग
२. ऑडीयो/व्हिडीयो एडीटींग
२. रूपरेषा चित्रांकन (concept sketches)
3. पॉवरपॉईंट स्लाईड्स बनवणे
४. मायबोलीवरील काही बाफ वर सर्च करून आवश्यक ते टेक्स्ट्/मटेरियल एकत्रीत करून देणे- mainly net browing and compilation.

गणेशोत्सव वा दिवाळी अंकात ज्यांनी अशी कामे आधी केली आहेत त्यांच्याकडून अधिक अपेक्षा आहेत.

फोटो एडीटींग, ऑडीयो/व्हिडीयो एडीटींग यात काही काम करू शकेन. उल्हास यांना आताच इ-मेल केलीय, योग आणि रार यांना ती फॉरवर्ड केलीय. त्यात कूल्-एडिट प्रो बद्दल लिहायचे राहिलेय. ते इथेच लिहिते. धन्यवाद !

>>> 3. पॉवरपॉईंट स्लाईड्स बनवणे

यासाठी नक्की मदत करू शकेन.

>>> ४. मायबोलीवरील काही बाफ वर सर्च करून आवश्यक ते टेक्स्ट्/मटेरियल एकत्रीत करून देणे- mainly net browing and compilation.

यासाठीसुद्धा मदत करू शकेन. पण नक्की काय हवे आहे याची जरा सविस्तर माहिती द्या.

मास्तुरे (व ईतर),

नक्की काय हवे आहे आणि काय स्वरूपात यासाठी रार ना त्वरीत संपर्क करा. साधारण कामाचा अंदाज यावा या दृष्टीकोनातून वर पोस्ट केले होते. पुढील सर्व रूपरेषा, कामाचे वाटप ई. सर्व रार हाताळत आहे.