हि तर सुंदर कविता झाली !

Submitted by अविनाश खेडकर on 4 December, 2011 - 04:29

जन्म घेतला का मी येथे
कधी कधी मज उगा वाटते
कमावण्याच्या अरूंद वाटेवर
बेकारांची गर्दी दाटते

किती भिकारी बनले येथे
एक टिचेच्या पोटासाठी
धान्य दडविती गोदामी ते
केवल आपुल्या स्वार्थासाठी

समानतेची शिकवण आमुची
एकात्मतेची आस वाटते
शाळेमधल्या दाखल्यात मग
धर्म-जात ती कशी नाचते?

घोटाळ्यांची भरवून स्पर्धा
इथला सेवक छळतो आहे
आर्त हुंदका महागाईचा
कुणा कधी का कळतो आहे?

शहिदांच्या बलीदानांवरही
शब्दच नव्हता स्मरला ज्यांना
अफजल गुरूच्या माफीसाठी
कोण पुरवितो भाषण त्यांना?

खून दरोडे, धोकादाडी
बलात्कारही रोज पाहिले
अराजक्तेच्या वादळात या
सदाचारी का कुणी न राहिले?

कुणा मागावी दाद आता ती
न्यायच पोषी अन्यायाला
त्या जनतेची चाड कुणा ती
जिथला राजा फितुर झाला?

या तमाची चिडच ज्याला
पेटून ऊठला एक दिवा तो
पणत्या करिती मदत दिव्याला
बदलच होता एक नवा तो

त्या रामाला लबाड ठरविती
मिळून सगळे इथले रावण
तुम्हीच सांगा कैशी व्हावी
भारत भूमी पवित्र-पावन?

बोथटलेल्या पुरूषत्वाची
आज मला जर चिडच आली
का मग म्हणता तुम्हीच मजला
हि तर सुंदर कविता झाली?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

karach sundar kavita zali
vichar karaya laanari.........

“का मग म्हणता तुम्हीच मजला
हि तर सुंदर कविता झाली?”

... ह्म्म्म.... मनाला स्पर्शून जाणार्‍या भावनांतूनच कविता जन्म घेते.

सुन्या,सांजसंध्या,चातक,
चाफेकळी,विभाग्रज्,प्रदुम्नसन्तु, भिडेकाका
आपल्या प्रतिक्रियांबद्ल मनापासुन आभार.

पण हि परिस्थिती बदलायला हवी. कुठतरी थांबायला हवं आता हे सगळ.
काहीच करू शकत नाही का आपण?

अविनाशजी तुमची तगमग तुमच्या प्रत्येक शब्दामधून जानवते.

पण हि परिस्थिती बदलायला हवी. कुठतरी थांबायला हवं आता हे सगळ.
काहीच करू शकत नाही का आपण?>>>>>>>>>> सहमत आहे तुमच्याशी मी.

आता या भ्रष्टाच्यार्‍याना चांगला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. पण त्याच बरोबर आपणही कळत नकळत भ्रष्टाचाराला जे प्रोत्साहन देतो त्याचा गाभिर्याने विचार करायला हवा. प्रत्येक ठिकाणी लाच न देता कामे करून घेण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे.

ही परिस्थिती संपवायची असेल तर स्वत: पासून सुरूवात करावी लागेल. तेव्हाच आपण इतरांना रोखू शकू.

क्रांतीताई आपल्या प्रतिसादाबद्ल मनापासुन आभारी आहे.

चाफेकळी

आता या भ्रष्टाच्यार्‍याना चांगला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. पण त्याच बरोबर आपणही कळत नकळत भ्रष्टाचाराला जे प्रोत्साहन देतो त्याचा गाभिर्याने विचार करायला हवा. प्रत्येक ठिकाणी लाच न देता कामे करून घेण्यासाठी प्रयत्नशील रहायला हवे.

ही परिस्थिती संपवायची असेल तर स्वत: पासून सुरूवात करावी लागेल. तेव्हाच आपण इतरांना रोखू शकू.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आपण सुचवलेला मार्ग खरच विचार करण्याजोगा आहे. आपण दुसर्‍यांना वाईट वाईट म्हणत राहायचे आणि वाईटपणाचे काही जळमटे आपल्याच कृतीत जोपासत राहायचे याला काय अर्थ आहे? परिस्थिती बदलायची असेल तर सर्व प्रथम सुरूवात सतः पासुनच करावी लागेल! पटलं अगदी.

समानतेची शिकवण आमुची
एकात्मतेची आस वाटते
शाळेमधल्या दाखल्यात मग
धर्म-जात ती कशी नाचते?

शहिदांच्या बलीदानांवरही
शब्दच नव्हता स्मरला ज्यांना
अफजल गुरूच्या माफीसाठी
कोण पुरवितो भाषण त्यांना?

कुणा मागावी दाद आता ती
न्यायच पोषी अन्यायाला
त्या जनतेची चाड कुणा ती
जिथला राजा फितुर झाला?

बोथटलेल्या पुरूषत्वाची
आज मला जर चिडच आली
का मग म्हणता तुम्हीच मजला
हि तर सुंदर कविता झाली?>>>>>>>>>>>>>

किती वास्तववादी लिहीता तुम्ही. तुमची तगमग प्रत्येक कडव्यातुन जानवते.

सलाम करावा वाटतो तुमच्या कवितेला. प्रत्येकाच्या मनातल मांडलत अगदी.

छान.

साधना२२ आपल्या प्रतिक्रियेबद्ल मनापासून धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.