नवीन म्हणी

Submitted by Kiran.. on 1 December, 2011 - 03:03

नवीन युगाच्या नव्या म्हणी या धाग्यावर येउद्यात

उदा.

नकटीच्या प्रोफाईलला व्हायरस फार...

चार दिवस देओलचे, चार दिवस लिऑनचे

आले अण्णांच्या मना, तेथे कुणाचे चालेना..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकल्या मुली ब्युटीपार्लरमधे

वंशाला नाही दिवा, ही म्हणते इश्श ..! तिकडं जावा Wink

मुलं करतात वेबसर्फ, आइबाप करतात होमवर्क

नाजूक मानेला मोबाईलचा आधार

मनोरंजन नको, रिंगटोन आवर

स्क्रीनपेक्षा एसेएमएस मोठ्ठा

( ढापाढापी )

खिशात नाही डोनेशन, आणि हवी अ‍ॅडमिशन

उचलला मोबाईल, लावला तोंडाला

ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार

नाकापेक्षा मोती जड - लेखापेक्षा प्रतिसाद जड
मेल कोंबड आगीला भित नाही - खरा डुआय कारवाईला भित नाही

काही नवीन म्हणी

- ओळखीचा कवी रस्ता न सोडी
- कवी तिन्ही वेळेचा, श्रोत्याविना भिकारी
- कविवर्यांच्या घरी गझलकार
- राजाने मारले, पावसाने झोडपले आणि कवीने अडवले, तर तक्रार कुणाकडे करणार ?
- कवीके घर कवी

- रिकामटेकड्यांना बिझी-नेसची चव काय
( गूळ गाढव काहींना जिव्हारी लागण्याची शक्यता असल्याने सुधारीत व्हर्जन )
- ऑनलाईन आखाड्यात कागदाचे वाघ
- आभासी संतापाचा थयथयाट फार
- बाफ पोखरून आशय शोधणे
- ज्या आयपीचा कनवाळू आयडी , त्याच आयपीचे सरकू डुआयडी
- स्वामी बड्या संस्थळाचा, जाहीरातीविन भिकारी
- पेशंट थोडे सोंगे फार
- मोकळा वैद्य दिवसातून पाच वेळा प्रिस्क्रीप्शन देतो
- नेटवंतांना कलेची कदर काय ( पार्ट टू)
- अय्या गडे इश्श गडे, ऑनलाईन वैद्यांचे पाऊल वाकडे