सुकी मच्छी पाककृती- सुकट तिकले - १ (फोटोसहीत)

Submitted by रुपाली on 1 December, 2011 - 02:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो सुकट स्वच्छ करुन भिजवलेली(५ मिनिटे)
(चिकनचे)वाटण- १ १/२ मोठा डाव
आलंलसुण पेस्ट - १/२ मोठा डाव
१ डाव तेल
१ कांदा बारिक चिरलेला
१ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट मसाला
१-२ चमचा मालवणि मसाला(तिखट हवे असेल तर)
१ चमचा हळद
मीठ चवी नुसार
कोथिंबीर बारिक चिरलेली (गार्निशसाठी)

क्रमवार पाककृती: 

सुक्या मच्छीच्या वासामुळे खुपशे लोक मांसाहारी असुन देखील सुक्या मच्छीपासुन लांब रहतात. फक्त जरा वास सहन केला तर खरच खुप चवीचे आणि झटपट मांसाहारी जेवण बनु शकते. यासाठी हा सगळा खटाटोप..

आवडला तर जरुर कळवा.. Happy
-------------------------------------------------------------------------

कढईत तेल तापवुन त्यात प्रथम कांदा खमंग भाजावा. त्यात आलंलसुण पेस्ट, वाटण, मसाले, हळद सगळे चांगले तेल सुटेपर्यंत भाजुन घ्यावे. त्यात भिजवलेली सुकट, मीठ, पाणि टाकुन मंद आचेवर एक वाफ काढावी(रस्साच पण थोडं घट्ट ठेवा). गॅसवरुन खाली उतरले की त्यावर कोथिंबिर पेरावी.

गरमागरमच भाकरी किंवा भातावर वाढावे.

झटपट एकदम चवीचे सुकट तिकले तयार.. Happy

वाढणी/प्रमाण: 
२ माणसे
अधिक टिपा: 

१) ह्यात कोकम(१-२) पण टाकतात पण आंबटपणामुळे तिखट कमी होते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूपाली....सहीच्.....मला सुकट खूप आवडते.....पण परदेशी अस्ल्याने थोडा problem होतो....तरी बिचारी माझी बायको शोधून आणते ......आणि करते....Thnx...I will share this with her.....तोंपासू.... Happy

रुपाली वेगळीच आहे पाकृ छान.

मला सुकी मच्छी आवडते. चेंज म्हणून छानच लागते. मी वेगळ्या पद्धतीने करते. कांदा तलून घ्यायचा मग त्याच्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन सुकट टाकायची. पाणी न टाकता वाफेवर मीडीयम गॅसवर शिजवायची. शिजत आली की कोकम टाकायचा मग मिठ, कोथींबिर पेरून पुन्हा एक वाफ आणून बंद करायचे. कालवण करायचे असल्यास चिंचेच्या कोळातच थोडे तांदळाचे पिठ घालून ते उकळवायचे.

रुपल्या, तुज्या घराक केलेल्या सुकटाच्या तिखलाचो दरवळ माज्या घरात शिरलो गो ! Wink मेल्या एकट्यानच खाव नुको. वायच वाटीभर धाडुन दी. नाय तर पोटात दुखात ! Proud ................

सुकट... अहाहा!!! नुसते वाचुन तोंडाला पाणि सुटले...( उपवास असुन रेसिपी वाचली Proud आता महिना कसाबसा काढावा लागेल Sad )

वेगळीच पद्धत! मी जागूसारखेच करते. फक्त शेवटी थोडे ओले खोबरे, कोथिंबीर आणि दालचिनीचा तुकडा वाटून घालते.

रोचीन कोणताही साधा तिखट मसाला.
नीलुताई, Proud
वनाताई, शनवाराकच करुन खाल्लय.. मन एकदम भरुन पावला. Proud
मयुरी, स्वाती Happy
सगळ्यांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद.. Happy
हि पद्धत माझ्या सासर्‍यांची आहे.. माझी नाहि.. पणा चवीला एकदम भन्नाट.. Happy

वाह!! सुकटीची चटणी तर एकदम आवडीची !! आणि नवरोबाला सुकटीचा वास पण चालत नाही.. Sad
रुपाली,
(चिकनचे)वाटण म्हणजे?
(परतलेला कांदा + भाजलेलं खोबरं + लसूण + आलं) ह्या सगळ्याचा वाटलेला गोळा?

फुडच्या गटगक घेवन ये म्हणजे मग खावन प्रतिसाद देईन <<<<<<<<<+१ Happy
रुपल्या, निदान फोटो तरी टाकुचो, तेवढाच समाधान Wink

सुकटाला भिजवुन काप द्यावेत आले लसुण पेस्ट लिंबु विनेगर मीठ लावुन ओवनमधे खरपुस रोस्ट करावे चांगले लागते चवीला.

फोSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSटोSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSssssssssssssssssssssssssssssss

मस्त वाटतेय कृती. मी नेहमी फक्त कांद्यावर परतून , मालवणी मसाला घालून करते. आता या पद्धतीने करणार .