शनिवारी केस का कापत नाहित

Submitted by पुरोगामी on 27 November, 2011 - 07:18

शनिवारी केस्,नखे कापू नयेत,नवीन काम सुरु करु नये,लोखंड घरी आणू नये असे काही पुस्तकात लिहिलेले असते.त्याचे कारण काय असेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारी नख कापले की आयुष्य सात वर्षानी घटते >>> बारा शनिवार जर नखे कापली तर १२*७+ ८४ वर्षे गेली. बारा आठवड्यात हमखास मृत्यु ? हे असल लॉजीक नसलेल आपण लिहु कस शकतो ?

जुन्या प्रथांच्या मागे काही शास्त्र असावे पण ते इतके सुक्ष्म असावे की कार्य- कारण, किंवा तर्काच्या कसोटीवर सुध्दा सिध्द करता येईल इतकी वारंवारता सर्वच नियमात असेल असे वाटत नाही.

ह्या सर्वच अंधश्रध्दा आहेत असे माझे मत नाही पण प्रत्येक नियम अधुनिक शात्रांच्या सहायाने तपासुन घ्यायला हवा असे माझे मत आहे.

मात्र हे यहुदी लोक अलिबाग ठाणे याच भागात होते. इतरत्र नाही.त्यामुळे शनवारचे प्रस्थ इतरत्र नाही. आमच्या मूळ खेड्यात सोमवारी केस कापत नाहीत. (बहुधा न्हाव्यांचा मंडे ब्ल्यू असावा :फिदी:)

अजय,

बेणे इस्रायल (शनवारतेली) या कोकणातल्या यहुद्यांची तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे. दोन पैसे माझेही...

एक छोटीशी दुरुस्ती करावीशी वाटते. ती म्हंजे १८व्या शतकातला प्रवासी युरोपीय नसून बगदादचा होता. डेव्हिड ससून त्याचं नाव. यहुदी धर्मातल्या अनेक चालीरीती बेणे इस्रायल लोक पाळतात हे पाहून अतीव आश्चर्य प्रकट केले. शेवटी त्यांना पूर्ण यहुद्यांचा दर्जा देवाविण्यास बरीच धडपड केली.

दानशूर असल्याने त्याच्या नावाने पुण्यात ससून रुग्णालय आणि मुंबईत ससून गोदी आहे.

न कर्त्याचा वार शनिवार ही म्हण शनवारतेल्यांशी निगडीत असावी का?

आ.न.,
-गा.पै.

अजय ..मस्त माहीती.

वाटलं नव्हतं या प्रथेमागे लॉजिक असेल म्हणून. भारतात गंमत म्हणून किंवा एखाद्या न केलेल्या कामाचं कारण म्हणून असं म्हणतात कि.... अशी सुरूवात करून एखादी थाप पारली कि ती प्रथा बनते. पुढे त्याला काही हुषार लोक धार्मिक कथा देखील चिकटवू शकतात... आणि पुन्हा तीच प्रथा विथ जस्टिफिकेशन आपल्यापर्यंत येते तेव्हा आपण चुकून मारलेली थाप इतकी बरोबर निघाली म्हणून आपण बुचकळ्यात पडण्याची शक्यता असते.

झक्की काका Proud

तुमचाच टाईमपास झाला असता मस्त.. आम्हाला काय Wink

आमच्या एका मित्राने दारू रोज, आणि खूप होते, म्हणून लोडशेडिंग करायचं ठरवलं. (याचा मार्केट यार्डात होलसेल तेलाचा व्यवसाय आहे. शिवाय मंचरला पेट्रोल पंप आहे- म्हणजे तेही तेलच). बराच विचार करून त्याने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे 'ड्राय-डे' ठरवले. हे ड्रायडे सुखरूप पार पडावेत म्हणून त्या त्या दिवशी निरनिराळ्या देवांच्या पूजापाठ करून घरात सात्विक वातावरण नांदवायचंही प्लॅनिंग केलं.

पण आता या ड्रायडेज् च्या दिवशी नेमक्या मित्रकंपनीने ठरवलेल्या पार्ट्या आल्या तर पंचाईत होऊ लागली. मग मित्रांच्या आग्रहाखातर तो पार्ट्यांत नुसता 'बसू' लागला. मग काही दिवसांत 'बारा वाजून जाऊ देण्याची' शक्कल लढवली. म्हणजे कसं, की सारा सरंजाम मांडायचा, ग्लासही भरून ठेवायचा. आणि घड्याळाकडे बारा वाजण्याची वाट बघत बसायचं. बारा वाजले, की सुरक्षित वार येतो. मग सुरू! मी एकदा उत्सुकतेने विचारलं, की अरे, देवाचं आणि तुझं घड्याळ सारखंच असेल कशावरून? या मुद्द्याचा त्याने गांभीर्याने विचार केला, आणि मग 'सेफर साईड' म्हणून बारा वाजल्यानंतर दोन थेंब इकडे तिकडे शिंपडण्यात आणखी अ‍ॅडिशनल २-५ मिनिटे खर्च करू लागला. म्हणजे देवाच्या आणि बहुतेक सार्‍या घड्याळांत बारा वाजल्याची खात्रीच!

तात्पर्य- शनिवारी तेल किंवा लोखंड आणू नये. केस किंवा नखं कापू नयेत. धर्म, शास्त्र, नियम वगैरे काय असेल ते असो, पण डोक्याला त्रास नको. शनिवार रात्री बाराला संपतो. त्यानंतर काही मिनिटांनी हे सारे करावे. त्यावेळी नक्की रविवार असतो.
--

विनोद जरा बाजूला ठेऊन-

पिढीजात न्हावी जर घरी आला, तर त्यास पैसे दिले जात नाहीत >> बहुतेक गावांमध्ये शनिवार हा आठवडी पगाराचा दिवस असतो. शेतमजूर या दिवशी संपूर्ण आठवड्याच्या हिशेबाचे पैसे शेतमालकाकडून घेतात. या दिवशी काहीही झाले तरी मालकाला कुठूनतरी पैसे आणून त्यांना द्यावेच लागतात. पगार झाल्यावर लगेच या पैशांचा बाजार केला जातो. त्या बाजारात अर्थात गोडेतेल, खोबरेल तेल वगैरे असतात. इतर वस्तूंमध्ये लोखंडाच्याही असतील. हा अर्थातच एकच विश्रांतीचा दिवस असल्याने याच दिवशी केस आणि नखे कापायला भरपूर वेळही मिळत असावा.

अनेक घरांमध्ये शनिवार (खास करून 'लाभतो' म्हणून) हा नवीन काम सुरू करण्याचा, पूजा करण्याचा, विविध खरेदीखते आणि अ‍ॅग्रीमेंट्स करण्याचा दिवस असतो. यात सर्व धर्म आणि जाती मी पाहिल्या आहेत.

>>>> शनिवार रात्री बाराला संपतो. त्यानंतर काही मिनिटांनी हे सारे करावे. त्यावेळी नक्की रविवार असतो. <<<<
ते इन्ग्रजी पद्धतिनुसार हो!
हिन्दू धार्मिक पद्धतिनुसार, वार सुर्योदय ते सुर्योदय असा अस्तो, म्हणजे शनिवार रात्री बाराला न सम्पता, रविवारच्या सुर्योदयाच्या वेळेस सम्पतो नि रविवार सुरू होतो.! Happy
असो.
शनिवारी पगाराची दिवस अस्तो, बाजारहाट अस्तो हे बरोबर. मात्र यात देखिल, पंचक्रोशीतील गाव/तालुके/वस्ती यान्च्या सन्ख्ये/सोईप्रमाणे, वेगवेगळ्या वारी आठवडे बाजार अस्तो.

पिढिजात न्हाव्याचे वर जे उदाहरण दिलय ते केवळ माहिती साठी, मी अनुभवलय म्हणून, पण हल्ली अशी पद्धत जवळपास नामशेष होत आहे/झाली आहे. मात्र अजुनहि, देव/देवीच्या उत्सवात वगैरे, कुम्भाराकडूनचे गाडगीमडकी पणत्या मुखवटे करता, सुताराकडून रथाचे साहित्य/काठी वगैरे करता अशा अनेक प्रकारे उत्सवात त्यान्चे त्यान्चे मान काढले जातात. इतकेच नाही तर मावळात, गावाकडे लग्न झाले असता, लग्नानन्तर बाराही बलुते/गुरव/खेळे/ब्राह्मण इत्यादीन्चा मान काढला जातो, व मुलीकडच्यान्नी १ रुपया दिला तर मुला कडच्यान्नी दुप्पट दोन रुपये द्यायचे व सगळे मिळून ३ रुपये त्या त्या मानाचे त्या त्या व्यक्तिला द्यायचे अशी प्रथा अजुनही आहे. अर्थात, हल्ली तो बराचसा उपचारस्वरुप झाला आहे. कारण खेळे वगैरेचा मान काढतच नाहीत जरी खेळे बोलावले असले तरी कारण त्यान्ची सुपारीच ३/४ हजाराच्या घरात असते, नि त्याच्या दुप्पट म्हणल्यावर वराकडच्याचे(ही) दिवाळेच वाजेल, म्हणून औपचारिकरित्या दहा वीस रुपये अशा दराने हे मान काढले जातात.
असो.

शनिवारी रात्री पार्टी असते म्हणून ब्यूटी पार्लर्स तर दिवसभर फार जास्त बिजी असतात. आमच्यासारखे साधे केस कापायचे गिराक घेतच नाहीत. परत पाठ्वून देतात.:)

आताच मयताच्या मोघे गुरूजींना विचारला हा प्रश्न
खर उत्तर धक्कादायक आहे....

शनिवारी केस कापल्यास लिंगपवरिवर्तन होते !!

अरे त्यात धक्कादायक काय आहे?
पुरुषासारखा पुरुष असून बायल्या वागायला लागलेल्या (किन्वा लग्न झाल्यावर बायलीच्या हातचे बाहुले बनुन आयशी बापसान्ना घराबाहेर काढणार्‍या, वा तत्सम) सर्व पुरुषान्नी पूर्वायुष्यात शनिवारी केस कापले होते की नाही, होते तर किती वेळा याचा डाटा गोळा करायला लागा बघु सत्वर! Proud

परवा १० तारखेला ग्रहण आहे.शनिवारप्रमाणे ग्रहणात पण नखे कापु नयेत व कटिंग व दाढी करु नये.

@ साजिरा
हा प्रकार आमच्या मित्रांमधेही बराच चालतो.श्रावण आणि अलीकडे मार्गशीर्ष चालू होण्याआधीचे दोन-तीन दिवस तर नुसती धूमच असते.(अस्मादिकांची नव्हे. आमच्यासाठी
सातो दिन भगवानके क्या मंगल क्या पीर
जिस दिन सोये देर तक भूखा रहे फकीर
हेच ब्रम्हवाक्य. )

(याचा मार्केट यार्डात होलसेल तेलाचा व्यवसाय आहे. शिवाय मंचरला पेट्रोल पंप आहे- म्हणजे तेही तेलच).
हे आपण कुणासाठी लिहिले आहे ? अंदाज येतोय..

स__ किंवा सु__ ___व..

चाळीस वर्षं मंचरकर असलेला.

र_ _ते.

(विपूत बोलूच.)

ज्यू लोकांचा किस्सा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझे १-२ ज्यू मित्र असे आहेत की ते शुक्रवारी १ पैसा सुद्धा खर्च करत नाहीत, म्हण्जे क्रेडिट कार्डावर पण नाही.
एकाचं घर ट्रेन स्टेशन पासून ५ किमी वर आहे तर हा पठ्ठ्या बसचं टिकिट काढण्यासाठी पैसे द्यावे लागू नयेत म्हणून शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर थंडी, वारा, बर्फ काहीही असलं तरी ५ किमी चालत जातो. शेवटी एका सरदार टॅक्सीवाल्याशी त्याची ओळख करून दिलीय तो सरदार त्याला टॅक्सीनं घरी सोडतो पण शुक्रवारी पैसे घेत नाही, नंतर कधीतरी ४ शुक्रवारांचे मिळून घेतो. हे त्या ज्यू मित्राला मनातून पटलेलं नाहीये पण सध्या तरी तो सरदाराची टॅक्सी वापरतोय :).
सरदार टोटली कंफ्युज्ड आहे, त्याला ही काय भानगड आहे हे समजत नाहीये.

५२

शनिवारी केस किंवा नखे कापल्याचे फायदेच असतात...
ब-याचदा रविवारी आपण बाहेर फिरायला जातो,मित्रांना किंवा नातेवाईकांना भेटतो मग जरा बर नको दिसायला.

शनिवारी केस कापल्यावर वय कमी होते किंवा लिंगपरिवर्तन होते........... कै च्या कै.... Rofl
या वाक्याचे संदर्भासहीत स्पष्टीकरण पुरेसे नाही. किंवा कुठेच नाही.

Pages