या कवितेचा वस्तुस्थितीशी काही संबंध आढळल्यास, एकाच नेत्याचे नाव सर्व घोटाळ्यांमधे वारंवार येणे हा जसा, तसाच तो ही एक योगायोगच समजावा.
[चाल : "काळ्या मातीत मातीत" या कवितेच्या पहिल्या २ ओळी.]
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते
साखर स्वस्तात पाठविते, साखर महागात आणिते
साखर मध्यात साठविते, साखर तिजोरी भरिते \\१\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
प्याकेज कोनाला असते, प्याकेज कोनाला मिलते
साहेब 'शहर' बांधिते, साहेब 'धरण' चोरिते \\२\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
जमीन कोनाची असते, जमीन कोनाची दिसते
साहेब भूखंड गिळते, विळखा पुन्याले पडते \\३\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
'दोस्त' दुबैत राहते, हैवान देशात सोडिते
हैवान फटाके फोडिते, साहेब विमान धाडिते \\४\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
नारको चाचणी बोलते, ष्टांप साहेब छापते
तेलगी जेलात सडते, साहेब तिजोरी भरते \\५\\ त्यांच्या थोत्रीत थोत्रीत....
परजा पेटुन उठते, चापट गालाले लागते
अन्ना खुशीत हासते, 'फक्त एकच' इचारते \\६\\
त्यांच्या थोत्रीत थोत्रीत खणकन वाजते
चमचे नाचती थयथय, 'पेपर' ढोल वाजविते..
एकदमच भारी !
एकदमच भारी !
कहर कहर... वरच्या सर्व
कहर कहर... वरच्या सर्व प्रतिक्रियांना एक एक लाख वेळा सहमत....
कविता आवडली नाही.
कविता आवडली नाही.
लोकशाही मध्ये एखाद्या नेत्याला, मग तो कितीही नावडो, अशारितीने चापट मारणे ( वा काळे फासणे, बूट मारणे) व त्या प्रसंगाची क्लिप टीव्ही वर चवीने वारंवार दाखवणे भूषणावह नाही. अशी चापट मारल्याने काही निष्पन्नही होत नाही. तेवढीच एनर्जी त्या माणसाने एखादा लेख लिहिणे, पी आय एल करणे, आर टी आय मध्ये माहिती मिळविणे, अशा कामात वापरली असती तर काहीतरी झाले असते.
अण्णा हजारेंची प्रतिक्रियाही खेदजनक होती. पवारांचे कट्टर विरोधक आहेत तसेच इतरांचेही आहेत. सर्वांनीच असा आतताईपणा केला तर ?
चापट मारल्यामुळे आनंद झालेल्या अनेकांना पद्म विभूषण ची बातमी वाचून धका बसला असेल.
विकु आता तर पद्मविभुषण,
विकु आता तर पद्मविभुषण, महाराष्ट्रात छुपा पाठिंबा सगळे होणार.
पद्मविभुषन मिलता, तांदुळ धुवुन स्वच्छ होते
धनुष्याला वाकवायला, कमळ घडी घडी बघते
आधी हसलो पण आता त्याच वाईट
आधी हसलो पण आता त्याच वाईट वाटतयं , एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या गालात मारल्यावर हसु यायला नको होतं.
मस्त्च आहे हे...थोत्रित थोरित
मस्त्च आहे हे...थोत्रित थोरित....
मोदी उठते , निघ्ते बारामतीले
मोदी उठते , निघ्ते बारामतीले येते
साहेबच गुरु म्हंते साहेब खुदुखुदु हसते
फडणीसाचे बुडाला टेकू देते
बाप्पट डमरुवर नाचते
तुम्हाले कोन इच्यारते ?
मोदी उठते , निघ्ते बारामतीले
मोदी उठते , निघ्ते बारामतीले येते
साहेबच गुरु म्हंते साहेब खुदुखुदु हसते
फडणीसाचे बुडाला टेकू देते
बाप्पट डमरुवर नाचते
तुम्हाले कोन इच्यारते ?>>>मस्तच........
Pages