वासोटा ते नागेश्वरः भाग१- प्रवास बोटीचा !
http://www.maayboli.com/node/30718
इथून पुढे....
बोटीतून बाहेर पडलो तरी सारखे वळून मागे बघावेसे वाटत होते.. पण शेवटी पुढे वाटचाल करायची होती सो थांबून राहणे शक्य नव्हते.. इथे काठावरच वनखात्याचे कार्यालय आहे.. वासोटयासाठी जाताना इथेच नावनोंदणी करुन पुढे जावे लागते.. याच कार्यालयात येथील जंगलात आढळणार्या पक्षुपक्ष्यांची सचित्र माहिती दिली आहे.. शिवाय कास पठारावर आढळणार्या फुलांची ओळखही करून दिलेली आहे.. एकूण छोटेच पण छान दालन आहे.. आता पुर्वीसारखे वासोटयावर राहता येत नाही.. मुक्काम करायचा असेल तर पुन्हा याच जागी यावे लागते.. आमचा मुक्काम इथे नव्हता.. वासोटयावर नव्हता.. नागेश्वरकडे पण नव्हता.. !! बस्स चालत रहायचे होते... एका दिवसात वासोटा ते नागेश्वर ट्रेक पूर्ण करून गावात उतरायचे असा प्लॅन होता.. !
वाटेत संपुर्णपणे झाडांचे छत असल्याने उनाच्या कवडसांचा आस्वाद घेत आमची टोळकी जंगलातून पुढे सरकू लागली..
प्रचि १
मला व रोहीतला जितके अपेक्षित होते तितके जंगल दाट वाटले नाही.. अर्थात अंगाशी झटापटी करणारे जंगल असेल की काय असे वाटले होते.. पण तसे काही नाही... वाट मस्तपैंकी रुंद नि चांगली मळलेली आहे.. चढही फारसे नाहीयेत.. तरीदेखील समिर, त्याचा मित्र (प्रदीप) व ग्रुपमधील विपुल म्हणून अजुन एक अशा या तिघांचा (आमच्या भाषेत इंजिन नसलेले डबे) ट्रेकशी फारसा संबंध नसल्याने त्यांना धापा लागणे स्वाभाविक होते.. चढताना वाटेत एक ओढा नंतर 'हनुमान व गणपती यांचे मंदीर ' अशा खुणा आढळतात.. त्या तीन डब्यांना खेचत ढकलत प्रोत्साहन देत हसतखेळत आम्ही कसेबसे ठरल्या वेळेत टॉपच्या समिप जाउन पोहोचलो... अर्थात या तिघांनी सर्वप्रथम सुटकेचा निश्वास सोडला..
मागे वळून पाहिले तर आतापर्यंतची वाटचाल दिसून येत होती.. वाटेचा पत्ता नव्हता.. पण वासोटयाकडे सरकलेला जलाशय सभोवतालच्या जंगलापुढे फिका वाटत होता..
प्रचि २:
प्रचि३:
इथूनच शेवटच्या टप्प्यातले कारवीचे छोटेसे जंगल पार करून वासोटयावर येउन पोहोचलो.. समोरच बजरंगाचे छप्पर नसलेले देउळ आहे.. पण मुर्ती छान आहे..
प्रचि४:
तिथेच मंदीराच्या समोरून एक वाट जंगलातून पुढे जाते तिथे काही अवशेष शिल्लक आहेत.. अवशेष असले तरी जे काही शिल्लक आहे ते एकदम मजबूत..
प्रचि५:
तिथूनच माघारी येउन मंदीराच्या मागच्या बाजूला गेलो की पाण्याचे टाके (इथले पाणी पिण्यास योग्य), चुना करण्याचे जाते(!!) नजरेस पडते...
प्रचि६:
आम्ही इथूनच पुढे गेलो जिथून जुना वासोटा खूप जवळ भासतो.. इथेच मग येथील प्रसिद्ध बाबूकडयाचे दर्शन होते... या बाबूकडयाचे रौद्ररुप बघण्यासारखेच... इथून दुरवर धूसर वातावरणात डोंगररांगा पसरलेल्या दिसत होत्या.... आणि खाली दरी बघायची तर दाट जंगलच !
प्रचि ७:
प्रचि ८:
इथेच मग उडीबाबाचा कार्यक्रम आटपूण घेतला... आमच्या उडया नेहमीच्याच.. त्यात आमची लिडर झीनत पण मग 'उडी मारो उडी' म्हणत सामिल झाली..
प्रचि ९:
उडया आटपून आम्ही पुन्हा माघारी फिरलो..नि तिथेच सावलीमध्ये पेटपूजा आटपून घेतली... सम्याने आपल्या बायकोच्या हातचे पराठे संपावेत म्हणून जबरदस्त मार्केटींग केली नि तो यशस्वी झाला... नाहीतर घरी त्याला धपाटे मिळालेच असते..
इथूनच मग आम्ही वासोटयाच्या दुसर्या टोकाकडे वळालो जिथून नागेश्वर गुहेचा माथा दिसतो.... या वाटेतच महादेवाचे मंदीर लागते.. बांधकाम बर्यापैंकी सुस्थितीत आहे..
प्रचि१०:
इथली शीतल जागा बघून मग थकल्या भागलेल्या मंडळींनी इथेच बसकण मारली.. पुढे येण्याचे कष्ट घेण्याच्या भानगडीत पडले नाहीत.. आम्हीसुद्धा त्यांना आग्रह न करता पुढे गेलो.. काय करणार.. खरा ट्रेक पुढे वाट पाहत होता.. !
आम्ही पुढे एका दरवाज्यातून दुसर्या माचीवर आलो.. इथून दिसणारे दृश्य छानच.. समोरच दोन टोकं दिसतात.. पहिले ते तुळस वृदांवन. .. नि मागचे दिसते ते नागेश्वर.. ! नागेश्वरला जाणारी वाट बघितली नि एकदम ट्रेकींग कुतूहल जागृत झाले... इतकेच काय तर तिथूनच कोकणात उतरणार्या डोंगरसोंडा बघून थक्क व्हायला होते..
प्रचि ११:
मी तर कितीतरी वेळ हा नजारा बघत होतो.. नागेश्वर गुहेपर्यंतचा मार्ग लक्षात आला होता.. पण आमचा पुढचा प्लॅन तिथूनच चोरवणे मार्गे कोकणात उतरण्याचा होता.. ते कसे हे मला पडलेले प्रश्णचिन्ह होते.. सुन्याला तसे विचारले.. त्याने मार्ग दाखवला.. मी वेळ बघितली.. दुपारचे दोन वाजत आले होते.. म्हटले.. 'लागणार.. चांगलीच बोंब लागणार.. नागेश्वर पर्यंत जाताना नाही तर तिथून उतरताना..' थंडीचे दिवस म्हणजे सुर्यास्त लवकर होणार नि अंधारात त्या जंगलमय दरीतून उतरणे म्हणजे मला टेंशनच आले.. ! म्हटले आता कमीतकमी वेळेत पटापट चालू नि शक्य तितके अंतर अंधार होण्याअगोदर कापू...
आम्ही तिथले फोटोसेशन आवरुन माघारी फिरलो.. इथून ते महादेवाचे मंदीर नि तो परिसर छान दिसत होता.. आम्ही किल्ल्यावर आहोत याची जाणीव करून देत होता..
प्रचि १२:
प्रचि १३: रानफुला...
जुना वासोटा हा चढण्यास कठीण आणि किती धोकादायक आहे हे खालील फोटोतील जंगल बघितले की कळेलच..
प्रचि १४:
म्हणूनच की काय तिथे जाण्यास बंदी आहे.. तर इथे वासोटा वा नागेश्वरला राहण्यास बंदी आहे... कारण इथे आढळलेले वाघ, बिबटे सारखे हिंस्त्र प्राणी.. त्यामुळे आम्हाला इथे कुठेच राहण्याजोगे नव्हते.. अंधार पडला तरी चालेल पण उतरणे सक्तीचे होते.. शिवाय नागेश्वरला जाताना लागणारे व हिंस्त्र प्राण्यांसाठी नावाजलेले घनदाट जंगल आमच्या पुढयात काय वाढून ठेवेल हे ठाउक नव्हते... एवढे असूनही इथे अगोदर जाउन आलेला आमचा लिडर सुन्या व झीनत मात्र निर्धास्त होते.. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचू सांगत होते.. पण मला स्वतःला टेंशन आले होते.. एकवेळ आम्ही नेहमीचे ट्रेकर्स असतो तर भरवेगात अंतर कापले असते.. पण आमच्या ग्रुपमध्ये दोन तीन 'इंजिन नसलेले डबे' होते ते कोण विसरणार.. आपल्या आयुष्यातील पहिला ट्रेक करणारा समीरचा मित्र 'प्रदीप' तर बैचेन झाला होता. ट्रेक कधी संपणार याची वाट बघत होता जिथे अजून खरा ट्रेक सुरु झाला नव्हता.. !
आता आमची पुढील वाटचाल एक रोमांचक अनुभव देणारी होती.. आधी जंगलातून.. मग कडेकडेने.. नि मग उतरतान थेट कातळाला बिलगुनच.. !
क्रमशः
यो, फोटो एकदम
यो, फोटो एकदम सह्हीईईईईईईईईईईईए..........!!!!!!!!!!
क्रमशः बघून बरं वाटलं !!
माफी पण आम्ही निरुपद्रवी
माफी पण आम्ही निरुपद्रवी ट्रेकर आहोत हो >> हाहाहा.. दादाश्री.. नुसते असे म्हणू नका... अनुभव शेअर केला सविस्तर तर बरे होईल.. तुम्ही मुक्काम केलात तेव्हा नियम माहीत होता का हो ? जे काय असेल पण ऐकायला नक्की आवडेल..
भाऊ काका
काही पटले नाही >> जे बोलायचे होते ते कळत नसेल तर ते कसे पटणार.. may be योग्य शब्दात मला व्यक्त करता येत नसावे..
नि कासबद्दल अजून ठाम आहे.. सर्वश्रूत आहे.. तिकडचे नियम पाळा म्हणजे निसर्गाची भलाई आहे.. अन इथला "मुक्कामाचा" नियम तोडा म्हणजे शिकाराच्या शोधात असणार्या वाघ, बिबटे या हिंस्त्र जनावरांची भलाई आहे...
नि हो माझ्या मनोवृत्तीचा जास्त अभ्यास नको... वेड लागेल
असो नागेश्वरला गावकरी राहू शकतात मग तुम्ही त्यांच्याबरोबर एखाद्या गावकर्याप्रमाणे राहिलात तर काही वावगे नाही.. उलट प्लॅस्टीक कचरा टाळावा याबद्दल प्रत्यक्षकृतीसह जनजागृती करण्याची संधी मिळेल..
बाकी महाशिवरात्रीला जत्रा असते तिथे म्हणे..!!!
यात्री.. तो सांजवेळच फोटू मस्तच रे.. नि ती बातमी कधी वास्तवात उतरणार..
पुढील भाग सोमवारी
मस्तच !
मस्तच !
Pages