शरद पवार यांच्यावर हल्ला

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2011 - 03:48

आत्ताच टीव्हीवर स्टार माझा या वाहिनीने एका शीख तरुणाने केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांना एक थप्पड लावल्याचे व एक लहानसे शस्त्र काढून धमकी दिल्याचे दृष्य पाहायला मिळाले. प्रमोद देव काका यांनी हे प्रथम पाहिल्यानंतर हे समजले व टीव्हीवर पाहिले.

हवालदिल झालेले पवारसाहेब निघून चालले होते व त्या प्रकारावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते याचे आश्चर्य वाटले. अर्थातच, ते तरी अचानक काय करणार म्हणा!

१. सुरक्षा व्यवस्था बोंबलल्याचे लक्षण

२. शरद पवार यांच्याबद्दल रोष आहे.

३. सामान्य नागरीक या पातळीला उतरत आहेत. (हे त्याने वाढत्या महागाईमुळे केले असे समजते)

४. त्या शीख तरुणाला काबूत आणणार्‍यांपैकी एक जण किंचित हासत होता आणि इतर जण जरा कॅज्युअलच वाटत होते.

याच तरुणाने पुर्वीही एका मंत्र्यावर असाच हल्ला केला होता.

वरील चार मुद्यांबाबत आपल्याला काय वाटते? धक्कादायक प्रकार म्हणून धागा काढावासा वाटला. असा धागा चुकीचा असल्यास अप्रकाशित करेन.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदारशी सहमत. याच्याशी महाराष्ट्राचा संबंध का जोडला जात आहे कोणास ठाऊक?

पुण्याचे महापौर स्वतः शीख असल्याने त्यांना overreact करण्याची गरज वाटली असेल (त्वरित आणि तीव्र निषेध करण्याची) पण ते वैयक्तिक लेव्हलला करायचे.

आज महापौर पुणे बंद म्हणतायत, उद्या मुख्यमंत्रीच महाराष्ट्र बंद म्हणतील, परवा पंतप्रधानच भारत बंद पुकारतील Happy

दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे ह. सिंगने थप्पद मारली, त्याला बाजुला नेले मग तो कृपाण काढून पुन्ह धावला 'चीर दूंगा' असे ओरडत होता. मग त्याला इमारतीच्या खाजगी सुरक्षा गार्डने बाहेर नेले . जाताना व नन्तर उभे राहून त्याने शांतपणे आपल्या 'सुप्रसिद्ध ' मिडियाला बाईट कसले चांगले भाषणच दिले. एवढ्या प्रकारात एकही पोलीस मात्र कुठेही दिसत नाही. आजूबाजूच्या लोकाना देखील फारसे गाम्भीर्य दिसले नाही. निळ्या डगल्यावाल्या खाजगी सुरक्षा रक्षकानीच त्याला लाजेकाजेस्तव बाहेर नेले असे दिसले . दिल्लीत कॅबिनेट मंत्री एवढे व्हल्नेरेबल असतात...? Uhoh

दुकानांच्या काचा फोडणार्‍यांच्या व्हिडीओ क्लिप्स मीडियाकडे आहेत, त्या पाहून त्या लोकांवर कारवाई करण्याचा आग्रह करण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणाकडे असेल काय? का असले काही होणे कोणत्याच पक्षाला परवडणारे नाही?

ज्या पक्षाने पुणे व इतर शहरे/गावे बंद पुकारून रोजच्या कमाईवर ज्यांचे पोट अवलंबून असते अशा असंख्य लोकांचे नुकसान केले आहे, त्याच पक्षाचे उमेदवार निवडणुकीत निवडून आले तर असे नुकसान होणे त्या सर्वसामान्य लोकांना मान्य होते असे समजायचे काय?

>>> दिल्लीत कॅबिनेट मंत्री एवढे व्हल्नेरेबल असतात...? <<<<
बाजो, मुद्दा महत्वाचा आहे.
अन म्हणूनच मी नि:सन्देह निषेध नोन्दविला (म्हण्जे काय केले असे कृपया विचारू नकोस)
शप अन त्यान्च्या पक्ष यान्चेशी आमची जवळीक असणे शक्य नाही, पण दिल्लीमधे, अत्यन्त अपुर्‍या सुरक्षाव्यवस्थेत एका महाराष्ट्रीय नेत्याला थप्पड मारली जाते, तर तो केवळ त्या नेत्याचा अपमान नसुन यच्चयावत महाराष्ट्रीय जनतेचाच अपमान होत अस्तो, कुणी माना वा न माना.
शप ना झालेली मारहाण काय की बाबा रामदेव्/अण्ण यान्च्या आन्दोलनात झालेला तमाशा काय, मला यात केन्द्रीय सत्तेचे एक सूत्र समान दिसते. दुर्दैवाने अण्णान्ना हे वेळेत समजुन आले नाही व मूर्खा सारखे बडबडले की "एकही मारा?"
दिल्लीश्वरान्च्या नजरेत शप काय की अण्णा काय (जुन्या काळात यच काय की वपा काय) सगळे एकाच महाराष्ट्राबद्दलच्या तुच्छतापूर्वक मोजमापाने मोजायची सवय अशी थोडिच जाणारे?
यातुनही शप अन त्यान्चे अनुयायी वेळीच शहाणे झाले तर बरय.

सगळ्यात हिणकस प्रतिक्रिया हजारे आणि बेदींची होती... ही माणसे सार्वजनिक जीवनात वावरण्यास किती नालायक आहेत हे या निमित्तने दिसून आले.>>> प्रचंड अनुमोदन.
यांच्यावर हल्ले झाले की 'सरकार आम्हाला त्रास देते आहे, हा कट आहे' म्हणून रडणार आणि नेत्याला फट्का बसला की 'असचं व्हायला पाहिजे'...वा रे 'सिव्हिल' सोसायटी!!!

पण अशाच गोष्टींचा सामना चिदंबरम पासून इतरांनाही करावा लागला आहे. केवळ मराठी नेत्यांना सुरक्षा कवच कमी आहे असे तर नाही ना. महाराष्ट्राचा अँगल उगाच आणला जातोय.

एका महाराष्ट्रीय नेत्याला थप्पड मारली जाते, तर तो केवळ त्या नेत्याचा अपमान नसुन यच्चयावत महाराष्ट्रीय जनतेचाच अपमान होत अस्तो, कुणी माना वा न माना. >>> आँ? लिंब्या?

हां तेच जर त्याने ये मराठी आदमी ऐसेही होते है असे म्हणून मारले असते तर तुझे बरोबर होते पण अरे तो मराठी माणूस केन्द्रीय कृषीमंत्री आहे हे विसरलास का? इथे मराठी अन न मराठी असण्याच्या संबंध येतो कुठे? मग केन्द्रात मराठी माणसे कमी आहेत तर मराठी माणसे कमी भ्रष्टाचार करतात असे तर तुला म्हणायचे नाही ना? बाळासाहेबांबद्दल मला अत्यंत आदर वगैरे आहे पण त्यांच्या प्रत्येक मताशी सहमत असावे असे थोडी असते?

पण अशाच गोष्टींचा सामना चिदंबरम पासून इतरांनाही करावा लागला आहे.
---- फरक आहे.... चिदंबरम वर दुरुन जोडा हाणला होता... येथे हल्ला करणारी व्यक्ती शरीरापर्यंत पोहोचली होती. त्याने कृपाणही बाहेर काढले होते...

महाराष्ट्राचा अँगल उगाच आणला जातोय.
---- हे अगदीच मान्य आहे. ते देशाचे कृषी मंत्री आहेत. येथे उगाच मराठी किंवा मारणारा शीख असे का संबोधले जाते कळत नाही.

हल्लेखोर हा हल्लेखोर आहे.... त्याची जात वा धर्माचा उल्लेख कशासाठी?

शरद पवारांचे राजकारण आणि एकूण व्यक्तिमत्व याबाबत मतमतांतरे असली तरीही त्यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन होउ शकत नाही.... >> अनुमोदन.

बाळासाहेबांबद्दल मला अत्यंत आदर वगैरे आहे पण त्यांच्या प्रत्येक मताशी सहमत असावे असे थोडी असते?
---- त्यांनी प्रतिभाताईंना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्या केवळ मराठी आहेत म्हणुन पाठिंबा दिला होता.... पण सेनेने राज्यसभेवर बहुतेक अमराठी खासदार पाठवले होते.

लिंम्बुजी - कृत्याचा निषेध जरुर करा पण ते (केवळ) मराठी आहेत म्हणुन निषेध नको.

ह. सिंगच्या शीखपणाबद्दल कोणीही कुठेही मुदा काढलेला नाही. आता महाराष्ट्रीयन माणूस म्हणूनही सिंगाने थप्पड मारलेली नाही. मात्र तो शिंचा 'आज तेगबहादुरांची जयंती आहे त्या मुहुर्तावर आज मी हे असे करणारच होतो. करकेही दिखाया ' असे का म्हणत होता न कळे.
शपंच्या जागी तामिळनाडूचा एखादा मंत्री असता तर ता.ना. तीन दिवस शुद्धीवर आले नसते Proud

तो माथेफिरूही नाही, तो दारू प्यालेलाही नसावा मात्र त्याने हे प्रसिद्धी स्टन्ट म्हणून केले हे निश्चित. दुर्दैवाने शप त्यात सापडले.

प्रसिद्धी स्टन्ट <<
असहमत. तो ज्या प्रकारे बोलत होता नंतर ते बघता त्याचे डायलॉग्ज त्याच्याकडून रटून घेतल्यासारखे वाटत होते.

अण्णा, हा कुठला न्याय?
अण्णांनी पवारांबद्दल व्यक्तकेलेल्या भावनांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीत आत्मक्लेष आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करताच राळेगणचे सरपंच जयसिंग मापारी यांनी या आंदोलनास ग्रामसभेची परवानगी नसल्याचे स्पष्ट करतानाच पक्षप्रतिमा सुधारण्यासाठी हे आंदोलन असल्याची खिल्ली उडविली. पोलिसांनी राळेगणसिद्धीची नाकाबंदी केली असून अण्णा थांबलेल्या पद्मावती बनात येणार्‍यांवर बंदी घातलीय. ब्लॅक कमांडो आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेय. अण्णा आणि त्यांचे सहकारी देशात कोठेही उपोषण करू शकतात. दिल्लीतील उपोषणास परवानगी नाकारताच अण्णा व त्यांच्या सहकार्‍यांनी तिहारमध्ये उपोषण करून सरकारला वेठीस धरले. इथे राळेगणमध्ये उपोषण करण्यास येणार्‍यांवर मात्र, अण्णांनी बंदी घातलीय. हा कुठला न्याय?
'देशदूत' अहमदनगर आवृत्तीतून.

असहमत. तो ज्या प्रकारे बोलत होता नंतर ते बघता त्याचे डायलॉग्ज त्याच्याकडून रटून घेतल्यासारखे वाटत होते
>>
शक्य आहे पण 'गँग अण्णा' या थराला जातील असे वाटत नाही Happy

कानफटात वाजवणे या प्रकाराचे लोण पसरले तर मग जुने हिशेब चुकते करणे हा एक धंदा महाराष्ट्रात होऊन बसेल. दिल्लीत काँग्रेसचं सरकार असतानाही राष्ट्रवादीच्ञा सर्वोच्च नेत्यावर हल्ला होऊन महागाईचा संबंध शरद पवारांशी जोडला जाईल अशी खेळी कुणी खेळत असेल तर उद्या शीतकपाट उघडून परदेशी जन्माच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातही सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षांच्या बाबतीत असा प्रकार घडणे अशक्य नाही.

अण्णा हजारेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागल्यास त्यांच्याबद्दल सहानुभूती उमटेल का ? कालच्या त्यांच्या प्रतिक्रियांनी ते गांधीजींचे फेक आयडी आहेत असं म्हणावंसं वाटतंय...

हो, उपोषण चा प्रताधिकार 'गँग अण्णा' ने सुरक्षित केला असावा. कुठेही हा 'प्रयोग' करण्यापूर्वी परवानगी घेणे आणि रॉयल्टी भरणे आवश्यक आहे Proud

छोडो यार बडे बडे देशो मे ऐसी छोटी बाते होती रहती है....... संसदेवर हला झाला आम्ही विसरलो की नाही?, कसाब ने तांडव केलं आम्ही विसरलो की नाही? मग, हे ही विसरु त्यात काय एवढं........ आता आपल्याला देखील या मंत्र्यांसाररखं बोलायला शिकले पाहीजे

शरद पवार याना कोन्ग्रेस च्या हाताच्या प.न्जाचा प्रसाद ( प्रताप) मिळाला यात खर त्यान्च्या वयाचा आदर करुन अशी कृती व्ह्यायला नको अस वाटत, पण हे तितकच खर की भ्रष्टाचारा विरुद्ध तसेच महागाईविरुद्ध जनक्षोभ वाढत चालला आहे.

आणि इतक होऊनह्ही शरद पवाराच वाक्य आहे की त्याचा (हरविंदर सिंग चा )हात गालाला लागुन गेला, आहे की नाही गिरा फिरभी तन्गडी उपर ,मुळात ते पक्के राजकारणी आहेत.

आपलेच काही नेते मरठी विरुद्ध इतर असे उगाच कारण नसतान सब.न्धा जोडत आहेत, अगदी सामान्य माणसाला या प्रकाराबद्दल अजिबात वाईटवाटत नाहीय, नाहीतर नेटवर भरभरुन प्रतिक्रीया आल्याच नसत्या.

मुळात आता या राजकारणी लोकाना जाग व्ह्यायची वेळ आलीय. एक्जात सगळे झोपेच सो.न्ग घेण्याच नाटक करत आहे, त्याना अश्या कृतीने जाग करण्याची वेळ त्यानीच आणली आहे.

याचा अर्थ आपली ताकद दाखवा असा घ्यायचा असतो. सिनेसृष्टीत नाही का आमची निखळ मैत्री आहे याचा योग्य तो अर्थ घेत लोक ?

कालच्या त्यांच्या प्रतिक्रियांनी ते गांधीजींचे फेक आयडी आहेत असं म्हणावंसं वाटतंय... >> Rofl

अण्णा समर्थकांनी वाहिली शिव्यांची लाखोली...
आत्मक्लेषासाठी राळेगणसिद्धीत आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राळेगणसिद्धीत अण्णांचे सहाय्यक सुरेश पठारे, सरपंच जयसिंग मापारी व गावकर्‍यांनी अक्षरक्ष: पिटाळून लावले. अण्णा समर्थकांनी राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना शिव्यांची लाखोलीही वाहीली....

'देशदूत' अहमदनगर प्रतिनिधीकडून फेसबूक मार्गे.

दमले का सगळे ?

एकेक पेग ग्लुकॉन डी घ्या ...अन हौन जाऊ द्या दंगा

मायबोली बंद ! महाराष्ट्रात दृपाल

Pages