शरद पवार यांच्यावर हल्ला

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2011 - 03:48

आत्ताच टीव्हीवर स्टार माझा या वाहिनीने एका शीख तरुणाने केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांना एक थप्पड लावल्याचे व एक लहानसे शस्त्र काढून धमकी दिल्याचे दृष्य पाहायला मिळाले. प्रमोद देव काका यांनी हे प्रथम पाहिल्यानंतर हे समजले व टीव्हीवर पाहिले.

हवालदिल झालेले पवारसाहेब निघून चालले होते व त्या प्रकारावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते याचे आश्चर्य वाटले. अर्थातच, ते तरी अचानक काय करणार म्हणा!

१. सुरक्षा व्यवस्था बोंबलल्याचे लक्षण

२. शरद पवार यांच्याबद्दल रोष आहे.

३. सामान्य नागरीक या पातळीला उतरत आहेत. (हे त्याने वाढत्या महागाईमुळे केले असे समजते)

४. त्या शीख तरुणाला काबूत आणणार्‍यांपैकी एक जण किंचित हासत होता आणि इतर जण जरा कॅज्युअलच वाटत होते.

याच तरुणाने पुर्वीही एका मंत्र्यावर असाच हल्ला केला होता.

वरील चार मुद्यांबाबत आपल्याला काय वाटते? धक्कादायक प्रकार म्हणून धागा काढावासा वाटला. असा धागा चुकीचा असल्यास अप्रकाशित करेन.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देश उबल रहा है..... !! >>> सहमत! १०० टक्के

पुण्यात महापौरानीच बंद डिक्लेअर केला आहे. धन्य आहे.

लहरी राजा, प्रजा आंधळी अधांतरी दरबार!
उद्धवा अजब तुझे सरकार!

खुद्द शरद पवारांनीच "लोकांना त्रास होईल असे काही करू नका, रस्ता रोको, बंद वगैरे करू नका"ई. सांगितले

हे अग अग म्हशी.. सारखे आहे का? लोकांना सांगण्यापेक्षा असे करू नका असा आदेश आपल्या पक्षाच्या सदस्यांना द्यायला हवा होता.

असे थपडा वगैरे मारून काही उपयोग होत नाही. त्याने महागाई थोडीच कमी होणार आहे? उगीच पब्लिकला दहा मिनिटे बरे वाटते. पुन्हा जैसे थे.

थप्पड मारणारा बिनडोक कमी की काय म्हणून वर पब्लिक दुप्पट बिनडोकपणा करून बंद, जाळपोळ करणार. म्हणजे फायदा काहीच नाही, उलट नुकसान जास्त.

लोकशाहीत निवडणुकीतील मतदान हे सामान्य माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी ज्यांचे पटते त्यांना मत देणे किंवा ज्यांचे पटत नाही त्यांच्या विरोधात मतदान करणे हाच एक योग्य मार्ग आहे. लोकांनी मतदान करून जागरूकता दाखवून द्यायला हवी.

पण आज देशभरात ही घटना लोकांनी पाहिली असेल. एका राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणी मनुष्यासाठी ही एक अत्यंत नामुष्कीजनक घटना आहे.

खुद्द शरद पवारांनीच "लोकांना त्रास होईल असे काही करू नका, रस्ता रोको, बंद वगैरे करू नका"ई. सांगितले
---- लोकांना त्रास होईल असे काही तरी करा उदा. रस्ता रोको, बंद वगैरे हे त्यांना प्रसार माध्यांमांच्या सहाय्याने सांगायचे असेल. प्रसार माध्यमांमार्फत मोफत संदेश देण्यासारखे प्रभावी साधन दुसरे कुठले असेल. नेता म्हणतो `आपल्याला शांततेच्या मार्गानेच जायचे आहे, कुठेही तोडफोड, वा जाळपोळ करुन सामान्य जनतेला त्रास होइल असे वागायचे नाही आहे, तो आपला मार्ग नाही आहे.` आणि त्याचे कट्टर अनुयायी नेमकी विरुद्ध कृती करतात... नेता त्या अनुयायांवर कारवाई करत नाही.

देवकाकांशी १००% सहमत.

भुंगा ला अनुमोदन.

एक ही मारा क्या - अण्णा >> कमाल आहे Happy

दिनेश, शरद पवारांनी "भरा-भरी" लाच कायम लक्ष्य केल्याने, बाकी "भरीव" काही करायला वेळ उरलाच नाही.

शरद पवारांचे स्टेटमेंट हा फक्त दिखावा आहे, तो नेहमीच असतो. आतुन कार्यकर्त्यांना "दाखवुनच द्या आपली ताकद" अशी सुचना दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Happy

शरद पवारांचे स्टेटमेंट हा फक्त दिखावा आहे, तो नेहमीच असतो. आतुन कार्यकर्त्यांना "दाखवुनच द्या आपली ताकद" अशी सुचना दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
------ मी आताच रेडिफ वर बंदची चित्र बघत होतो... ८-१० कार्यकर्ते बंद (हातात झेंडे) करण्याचे आवाहन करत आहे... धाकाने दुकानांची शटर्स पटापट खाली येत आहेत :अरेरे:.

<<एक ही मारा क्या - अण्णा >> कमाल आहे >>
ते महात्मा असल्याने बहूदा 'एकाच गालावर का मारली?' असे विचारत असतील Wink

<< त्या शीख तरुणाला काबूत आणणार्‍यांपैकी एक जण किंचित हासत होता आणि इतर जण जरा कॅज्युअलच वाटत होते. >> बेफिकीरजी, मलाही हे तीव्रतेने खटकलं. हल्लेखोराने चाकू काढला तरीही
त्या माणसाच्या चेहर्‍यावर कसलेही अचंब्याचे,गंभीर भाव अजिबात नव्हते. चाकू हिसकावून घेण्याचं काम बाजूच्या गणवेशातील सिक्युरिटी गार्डने केलं. नेमकं बोट नाही ठेवतां आलं तरीही मला वाटतं डोळ्याना दिसतं त्यापेक्षां या घटनेत निश्चित अधिक कांहीतरी असावं. पवार मात्र नक्कीच चक्रावले होते [ नाहीतर, त्याना नटसम्राटच म्हणायला हवं !].
या घटनेचा संबंध जनतेमधील असंतोषाशी लावणं, विशेषतः त्या शीख तरुणाची पार्श्वभूमी पहातां, मला तरी योग्य वाटत नाही.

काही काही राजकारणी इतके पाताळयंत्री असतात की त्यांची कृत्ये चव्हाट्यावर येऊ नयेत याची ते कोणत्याही पातळीवर जाऊन पुरेपूर काळजी घेतात!!
आजची बातमी कळल्यावर काही मध्यमवर्गीय महिलांची प्रतिक्रिया होती, ''बस्..एवढंच? यांना तर उलटं टांगून.....''
हे भयंकर वाटेल पण जनता आंधळी नाही!!

ते महात्मा असल्याने बहूदा 'एकाच गालावर का मारली?' असे विचारत असतील >>> शोभा डे ह्यांनी अण्णाच्या पुढे जाऊन विधान केलं आहे की शरदराव आता दुसरा गाल समोर करतील का?

शरद पवारांनी झापड खाल्ली आन लगेच लागले सगळे बंद बंद करायला....छ्या.. काय चाल्लय..
---- "सामान्य जनतेला त्रास होणार नाही असे वर्तन करा.... " असा आदेश वरतुन आलेला आहे. बिनीचे कार्यकर्ते यामधुन जे समजायचे ते समजतात आणि पुढची दिशा ठरवतात.

५ दिवसांपुर्वीच माजीमंत्री सुखराम यांच्या वर या युवकाने हल्ला केला होता... हा तर व्यावसायिक थप्पड मारणारा दिसतो आहे.

अण्णा हजारेंची "केवळ एकच थप्पड ?" प्रतिक्रिया त्यांची राजकारणाबद्दल कमालीची अपरिपक्वता दाखवते आहे... Sad सर्व कॅमेरा तुमच्यावर रोखलेले आहे, सांभाळुन बोला अण्णा.

पण फक्त एकच का मारली त्याने? लगेहात दुसरी थप्पडसुद्धा मारुन घ्यायला पाहीजे होती. नाहीतरी शरद पवार निर्लज्ज राजकारणी माणुस आहेच.

प्रामाणिक प्रतिक्रीया द्यायची तर घटना चुकीची असली तरी अजीबात वाईट वाटले नाही. आणि शरद पवार पेक्षा त्या अजित पवारला जरा कोणीतरी ठोकायला हवे असेही वाटतेय.

माझ्या मते हे सगळे पैसे देऊन राष्ट्रवादींनीच घडवून आणले. लोक आपणहून मदत करत नसतील पक्षाला, मग आता महाराष्ट्रात राडा करून भरपूर पैसे लुटायचे.

'आंधी' सिनेमात तो ओमप्रकाश असेच करतो, आपल्याच गुंडांकरवी आपल्याच पक्षाच्या नेत्यावर हल्ला, मग सहानुभूति म्हणून मते, विरोधी पक्षाची बदनामी, वगैरे.

या असल्या युक्त्या माझ्या सारख्या राजकारणातले काहीहि समजत नसलेल्याला ठाऊक आहेत, तर शरदराव तर कितीतरी मुरलेले.

बाकी भारतातले सगळेच विनोदी! काही म्हणता काही म्हणून खरे नाही!

या प्रसंगावर दोन पॅनेल डिस्कशन पाहण्यात आली . व बर्‍याचशा कॉमेन्ट्स पाहण्यात आल्या. त्यातही स्वतःचा अजेन्डा राबवण्यासाठी बर्‍याच 'मी मी ' म्हणणार्‍यानी या संधीचे सोने केले. त्यात फक्त बाळासाहेब ठाकरे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भडक आणि तरुण कार्यकर्ता रविकान्त तुपकर यांच्या प्रतिक्रिया समयोचित आणि प्रगल्भ होत्या .दोघेही शपंचे कट्टर विरोधक. सगळ्यात हिणकस प्रतिक्रिया हजारे आणि बेदींची होती... ही माणसे सार्वजनिक जीवनात वावरण्यास किती नालायक आहेत हे या निमित्तने दिसून आले. मनातला विरोध घृणा समजू शकतो.असे असेल तर भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान एखाद्या बैठकीत भेटल्यावर त्यांनी शिव्या देत एकमेकांची गचांडी पकडली पाहिजे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया संयत होती शिवाय त्यातून एक लेकही डोकावली. त्या म्हनाल्या' ज्या साईडला थप्पड मारली तिथेच त्यांची दोन मेजर ऑपरेशन्स झाली असल्याने मला काळजी वाटते आहे'....

<<<सगळ्यात हिणकस प्रतिक्रिया हजारे आणि बेदींची होती>>>
वेगळे काही अपेक्षित नव्हतेच.काय होती त्यांची प्रतिक्रिया?

अण्णा हजारे मी राजकारणात येऊन माझ्या वस्त्रांवर चिखल उडवून घेऊ इच्छित नाही म्हणत म्हणत राजकारण्यांत असलेले सगळे गुण स्वतःमध्ये असल्याचे दाखवून देत आहेत. 'क्या एकही मारा' असे त्यांनी म्हटल्याचे आणि तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यावर दात काढल्याचे काल पाहिले. नंतर ते दृश्य (पवारांचे नव्हे, हजारेंचे) दिवसभरात परत दाखवले गेले का?

त्या तरुणाला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल्यावर त्याची बाईट घेण्यासाठी टीव्ही पत्रकारांची झुंबड उडाली होती. कसाबला पोलिसांनी पकडले तेव्हा टीव्हीवाले तिथे असते तर पोलिसांना तुम्ही थांबा हो आम्हाला त्याची बाईट घेऊ द्या म्हणले असते Angry

बाजो तुम्हाला बेदींची प्रतिक्रिया हिणकस का वाटते... त्यांनी निषेध व्यक्त केलाच आहे व असे का व्हावे ह्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे या बद्दल टिपणी केली. आता पुढे जनलोकपालाची टिमकी वाजवली पण प्रतिक्रिया वाईट नक्कीच नाही.

http://www.hindustantimes.com/India-news/NewDelhi/Bedi-condemns-assault-...

“While condemning assault on public functionaries, we need to analyse why this is happening and what must be done to contain this,” said Bedi. “Pray that a proper Lokpal Bill is passed in the winter session or else pent-up anger may erupt on streets. Politicians may be targeted,” Bedi warned.

भ्रष्टाचाराचा एवढा राग आहे, तर मग त्या तरूणाने मनमोहन सिंहांनाचं का जाऊन मारली नाही? पंजाबमध्येही बादल घराण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ...आहेत. म्हणून आधी पंजाब सुधारा, सुरूवात आपल्या घरापासून करा.
शरद पवार साहेबांवर या वयात असा हल्ला करणे हे निंदनीय आहे.

राजू परूळेकरांचा चतुरंग मधील लेख वाचला तर कळेल ही केजरीवाल प्रभूती काय लायकीची आहेत?

उदय तो ट्वीट काढलाय असे वाटतेय. रात्री स्टार माझाच्या पॅनेल डिस्कशनमध्ये एका वक्त्यानी (बहुधा आव्हाड) यानी त्या ट्वीट्चा सारांश सांगितला होता 'राजकारण्यांची तीच पात्रता आहे की त्याना तसेच करायला पाहिजे' असे काहीतरी होते.

शपंच्या प्रकरणाशी संबंध नाहीपण आपण लोकपाल व्हावे असे सिनिअर भूषण , बेदी, आणि केजरीवाल याना इच्छा आहे. लोकपालाच्या निवडसमीतीत मगसेसे पुस्कार विजेत्या दोन व्यक्ती असाव्यात असा यांचा मसुदा सुचवतो. बेदी आणि केजरीवाल मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत. आता मॅगसेसे हा फिलिपिन्सच्या एका ट्रस्टचा पुरस्कार विजेती व्यक्ती भारताचा लोकपाल निवडण्यास कशी योग्य असू शकते? याचे काय लॉजिक?ज्ञानपीठ विजेते का नकोत? का तर अशी माणसे 'गँग अण्णा' मध्ये आहेत म्हणून...

मॅगसेसे हा फिलिपिन्सच्या एका ट्रस्टचा पुरस्कार विजेती व्यक्ती भारताचा लोकपाल निवडण्यास कशी योग्य असू शकते? >> बरोबर आहे ही आचरट मागणी आहे.

पण तो विषय इथे नाही. आज शाळा बंद, पुणे बंद, महाराष्ट्र बंद, ह्या निमित्ताने राष्ट्रवादी आपली ताकद जोखत आहे कारण पालिका निवडणूका जवळ आल्या आहेत.

ह्या कृत्यांमुळे पवारांबद्दलचा थोडा फार आदर (ते केवळ वयाने मोठे आहेत म्हणून) असलेला निघून गेला. शिवाय बाळासाहेबही मराठी माणूस गप्प कसा बसेल असे म्हणाले, अरेच्चा कमाल आहे, तो माणूस मारून निघून गेला, सामान्य लोकांनी काय घोडे मारले की काल महामार्ग पण बंद ठेवले. अन मराठी माणूस काय? अन तो शिख आहे ह्याची लाज वाटते म्हणनारा समुदाय काय, दोघेही सारखेच.

तो माणूस होता, त्याने मारले, त्याला प्रांतीय, धर्मिय रंग का द्यावा?

Politicians may be targeted,” Bedi warned.
>>>
हे वाक्य खरे तर पोलिटिशियनना टारगेट करा असेच 'वाचायचे ' आहे. आणि काश्मीरात सार्वमत घ्या म्हणणार्‍यांचे मुके घ्या असेच ना?

हा तर व्यावसायिक थप्पड मारणारा दिसतो आहे. >> hasatkhurchitoonpadnaribahuli.gif

हे वाक्य खरे तर पोलिटिशियनना टारगेट करा असेच 'वाचायचे ' आहे. आणि काश्मीरात सार्वमत घ्या म्हणणार्‍यांचे मुके घ्या असेच ना? >> hasatkhurchitoonpadnaribahuli.gif

मॅगसेसे हा फिलिपिन्सच्या एका ट्रस्टचा पुरस्कार विजेती व्यक्ती भारताचा लोकपाल निवडण्यास कशी योग्य असू शकते? >> बरोबर आहे ही आचरट मागणी आहे.
---- अनुमोदन... भारताच्या लोकपाला संदर्भात निकष आपण आपलेच ठरवायला हवेत. ज्ञानपिठ का नको, पद्म पुरस्कार असणारे का नको?

उद्या मॅगेसेसे साठी पैसे मोजले जाणार (वा राजकारण होणार) नाही कशावरुन? नोबेल मधे पण राजकारण चालते, ओबामाला शांततेच्या कार्या बद्दल अ‍ॅडवांस मधे मिळालेला आहेच.

Pages