कवडी पाट, हडपसर, पुणे

Submitted by रंगासेठ on 23 November, 2011 - 10:22

मागील शनिवारी हडपसर पासून जवळच असलेल्या 'कवडी पाट' येथे जाऊन आलो. पक्षीनिरिक्षणासाठी येथे बर्‍यापैकी हौशी लोक येतात. त्याचबरोबर इथला सूर्योदय देखील अनुभवण्यासारखा आहे.

जाण्याचा मार्ग -> पुणे-हडपसर-लोणी-कवडी
हडपसरहून अंतर – अंदाजे ६-७ किमी
शक्यतो पहाटे लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करावा. सूर्योदयाच्या अथवा सूर्यास्ताच्या आसपासचा काळ फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम. तसेच पक्षीदर्शन ही होते मस्त पैकी.

हडपसरपासून सोलापूर रोडमार्गे सरळ हायवे वरुन गेल्यानंतर पहिला टोल नाका लागतो. तो ओलांडल्यावर लगेच डावीकडे एक सर्विस रोड लागतो, त्यावरुन अर्ध-पाउण किमी गेल्यावर डावीकडे "कवडी पाट" चा बोर्ड लागतो तिकडे वळल्यावर सरळ जायचे. मध्ये एक रेल्वे फाटक लागते. तिथून १ किमी वर कवडी गाव लागतो. तिथेच शाळेसमोर पार्किंग करुन समोर असणार्‍या पूलावरुन संपूर्ण परिसराचे सुंदर दर्शन होते. आम्ही सूर्योदयाच्या आधीच गेलो असल्यामुळे संपूर्ण पात्रावर धुक्याचे लोट वाहताना दिसले.

हा पूल ->

प्रचि १

सूर्योदय होण्यापूर्वी ->

प्रचि २

धुक्याचा प्रवाह

प्रचि ३

सूर्यदेवाचं आगमन होताना

प्रचि ४

प्रचि ५

साधारणतः सूर्योदय झाल्याझाल्या पक्षांचे आगमण, प्रवास आदी क्रियांची सुरूवात होते. माझ्याकडे झूम लेन्स नसल्यामुळे काही फोटो क्रॉप करुन पक्षांच्या फोटोंचे समाधान मानून घेतले. बदक, खंड्या, बगळा सोडले तर बाकीचे पक्षी काय ओळखता आले नाहीत Sad मोराचे केकाटणे ऐकू आले पण दर्शन नाही झाले. त्यात मुळा-मुठा मधल्या प्रचंड प्रदूषणामुळे कवडीच्या पाटात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाण खूपच कमी झालेय असे लोकांकडून ऐकले होतेच पण आज दिसले.

प्रचि ६

प्रचि ७

बगळा (प्रचि ८)

खंड्या (प्रचि ९ )->

प्रचि १०

या बदकाच्या जातीचे नाव लक्षात नाही Sad

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

हा पूल ओलांडून पलीकडे झाडांच्या भागात गेला की आणखी पक्षी दिसतात.

प्रचि १४

प्रचि १५

पक्षी काय कॅमेरात सापडत नव्हते म्हणून फुलांवर हौस भागवून घेतली.

प्रचि १६

प्रचि १७

मंदिराजवळ असलेल्या विहिरीत सुगरणीचे खोपे.

प्रचि १८

गुलमोहर: 

अप्रतिम आहेत फोटो. मला पुलाचे, सूर्यास्ताच्या आधीचे फोटो फारच आवडले. उषःकाल म्हटल्यावर जे रंग डोळ्यासमोर येतात अगदी तसेच आहेत ते फोटो.
पक्ष्यांचेपण मस्त आलेत.

सुंदर फोटो...
प्रभाकर कुकडोलकरांचे - 'पुण्याचे पक्षीवैभव' पुस्तक फील्ड गाईड म्हणून खूप उपयोगी आहे. त्यात पक्ष्यांचे फोटो नावांसकट दिले आहेत.

मस्तच!! पक्षी यायला लागले का कवडीला आता? मी असं ऐकलं होतं की प्रदूषणामुळे तिथे येणार्‍या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.

वा! रंगासेठ, छान!

सुंदर सृष्टी आपण सगळेच पाहतो. ती नजरबंद करण्याकरता दृष्टी लागते. ती तुम्हाला आहे. सुरेख फोटो काढले आहेत. बेहद्द आवडले.

हे फोटो भारतातले आहेत असे सांगुनही, विश्वास बसणे कठीण. सुंदर, मस्त. अनोखे रंग. ती सकाळ काय प्रसन्न असेल. Happy

वॉव. Happy

मस्त आहेत...एकसे एक फोटो. Happy
एम आय टी संस्थेने लोणी काळभोरला राज कपुर बंगल्याजवळ बांधलेला बंधाराही बांधलेला छान आहे.तिथेही पक्षी येतात पण नदीचं प्रदुषण इतकं की असह्य वास येतो. आणी फेसाचे असंख्य 'आईसबर्ग' नदीत साचलेले दिसतात.
श्या.. दीड वर्ष लोणी-काळभोर ला होते पण कुणी कवडी-पाटाबद्दल सांगितलं नाही. Sad

Pages