परवा रजाच आहे

Submitted by A M I T on 23 November, 2011 - 01:36

टोकूला कुणाची पर्वा नाही. पण आमचा परवा कसा जाईल? याचीच आम्हांला पर्वा आहे.

हा ढीग आज रद्दीचा, काढला कशास आहे?
जाईन तो विकाया, परवा रजाच आहे

वाढतात केस का हे? वैताग नुसता आहे
येवोत कानाशी जरी, परवा रजाच आहे

आज तू म्हणालीस, परवा पिच्चरला जाऊ
येईल तो टिव्हीवर, घाई कशास आहे?

जमतील यार तीन, म्हणतील सोय काये?
उद्या रात्रभर ढोसू, परवा रजाच आहे

ज्युलीसोबत परवा, कॉफी निदान घेवू
अन् आज तू म्हणालीस, आई येणार आहे..!!

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

Biggrin