Submitted by टोकूरिका on 20 November, 2011 - 23:29
हा खेळ आज सटवीने, मांडिला कशास आहे?
जाणून घ्यायचे ना, पर्वा कुणास आहे??
सरलीत सुखे मागे, जगणे भकास आहे,
येवोत लाख दु:खे, पर्वा कुणास आहे??
खंबीर या मनाला, शौर्याची कास आहे
ठाकले जग हे विरूद्ध, पर्वा कुणास आहे??
भवती काय घडले, चिंता जगास आहे,
संतप्त या मनाची , पर्वा कुणास आहे?
वाटे खरेच आता, पर्वा कुणास आहे??
डोळे जरी बोलकेसे, टोकू उदास आहे!!
गुलमोहर:
शेअर करा
काय झालं टोके उदास व्हायला?
काय झालं टोके उदास व्हायला?
हिमतीने जगण्याची इच्छा कवितेत
हिमतीने जगण्याची इच्छा कवितेत अनेक ठिकाणी प्रकट होतेय.
परंतु,
"टोकू उदास आहे!"
इथे अचानक मूड का बदललाय ते लक्षात येत नाही.
उकाकांना अनुमोदन, शेवट हतबल
उकाकांना अनुमोदन, शेवट हतबल झाला.
दक्स. उकाका, पूर्ण कवितेत
दक्स.
उकाका, पूर्ण कवितेत लक्षात येइल की, कवयित्रीचे मन उदास आहे, त्याला हिमतीने जगायचे आहे, पण कुणालाही त्याच्या उदासीनतेची भनक लागलेली नाहीये, अन लागलेली असली तरी दुर्लक्षिले गेल्यामुळे खंबीर बनू पाहणारे मन पुन्हा उदासीनतेच्या गर्तेत ओढले जात आहे.
मुकु कृपया उकाकांना दिलेले
मुकु कृपया उकाकांना दिलेले उत्तर लक्षात घ्यावे,
खंबीर या मनाला, शौर्याची कास
खंबीर या मनाला, शौर्याची कास आहे
ठाकले जग हे विरूद्ध, पर्वा कुणास आहे??>>>>>>>
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<कवयित्रीचे मन उदास आहे, त्याला हिमतीने जगायचे आहे, पण कुणालाही त्याच्या उदासीनतेची भनक लागलेली नाहीये, अन लागलेली असली तरी दुर्लक्षिले गेल्यामुळे खंबीर बनू पाहणारे मन पुन्हा उदासीनतेच्या गर्तेत ओढले जात आहे.
>>>>>>विरोधाभास वाटतो.
रचना सुंदर आहे,शेवट सकारात्मक असता तर कविता खुलली असती.
वाटे खरेच आता, पर्वा कुणास आहे??
डोळे जरी बोलकेसे, टोकू उदास आहे!!>>>>>>
वाटे खरेच आता, पर्वा कुणास आहे??
काळा टक्कर देण्या,टोकू तयार आहे!!
टोके, आवडली खरयं....
टोके, आवडली खरयं....
धन्स स्मितू.
धन्स स्मितू.
सरलीत सुखे मागे, जगणे भकास
सरलीत सुखे मागे, जगणे भकास आहे,
येवोत लाख दु:खे, पर्वा कुणास आहे??>> सुंदर
सरलीत लाख दु:खे जगणे भकास
सरलीत लाख दु:खे जगणे भकास आहे
येवोत लाख दु:खे पर्वा कुणास आहे>> असेही एकदा वाचून पाहिले. अर्थात, आपण बदल वगैरे करू नयेत, सहज आपले मनातले मांडले
का गं टोके? काय झाले उदास
का गं टोके? काय झाले उदास व्हायला.... बाकी छान आहे कविता
सटवी ? सटवाई म्हणायचय का ?
सटवी ? सटवाई म्हणायचय का ?
बागुलबुवा, मीही हेच विचारणार
बागुलबुवा, मीही हेच विचारणार होते. पण वाचताना मी सटवाई असाच अर्थ घेतला.
छान .....
छान .....
कशाचीच पर्वा नाही, शौर्याची
कशाचीच पर्वा नाही, शौर्याची कास आहे, तर मग जगणे भकास का? झकास तरी म्हणा. कविता मात्र सुरेख.
@बेफी: तुम्ही सुचवलेला बदल पण
@बेफी: तुम्ही सुचवलेला बदल पण उत्तम आहे.
धन्यवाद!
@बागेश्री: सटवी = सटवाई.
@संतु: कुणाला मनाच्या व्यथेची जाणीव नाही, म्हणून जगणे भकास आहे.
@किरणः धन्स!
धन्स मयुरी.
सटवी ही शिवी आहे, सटवाई ही
सटवी ही शिवी आहे, सटवाई ही देवी.
भिडेकाकांचा प्रश्न संयुक्तिक
भिडेकाकांचा प्रश्न संयुक्तिक आहे पण आपले नंतरचे विवेचन पटले. अर्थात त्या विवेचनाची गरज नव्हती. काय वाटते हे वाचकाला वाटू द्यावे.
@पाषाणभेद: विवेचन देण्याचे
@पाषाणभेद: विवेचन देण्याचे कारण इतकेच की वाचकाचे शंकानिरसन व्हावे, व कवितेचा गाभा कळण्यास मदत व्हावी. हेमावैम.:)
आवडली
आवडली
धन्स पजो.
धन्स पजो.
छान आहे गं कविता नेहा म्हणजे
छान आहे गं कविता
नेहा म्हणजे टोकुरिका होय !!
हो किरन्यके मीच ती
हो किरन्यके मीच ती
@बाबु +१. सटवी हि शीवी आणि
@बाबु +१.
सटवी हि शीवी आणि सटवाई हि देवी आहे. काहीतरी गल्लत होतीये.
वाटे खरेच आता, पर्वा कुणास
वाटे खरेच आता, पर्वा कुणास आहे??
पण ही हतबलता कशासाठी ? अग, तुच म्हणतेयस ना,
डोळे जरी बोलकेसे, टोकू उदास आहे!! >>> टोकु, सुंदर कविता !
खंबीर या मनाला, शौर्याची कास आहे
ठाकले जग हे विरूद्ध, पर्वा कुणास आहे?? >>> तरमग हतबल मनाला पुन्हा खंबीर बनव. निराशेची जळमटं झटकुन टाक आणि नव्या जोमाने, नव्या उमेदीने पुन्हा समर्थपणे उभी रहा !
@वनराई: जे घडतय त्याची पर्वा
@वनराई: जे घडतय त्याची पर्वा नसली, तरी हतबलता फक्त यासाठीच आहे की मनाचं दु:ख जाणणारे कुणी नाहीये.
प्रतिसादासाठी आभारी आहे लोक्स.