वितुष्ट आले तर अराजक माजेल

Submitted by विजय आंग्रे on 22 November, 2011 - 23:34

सीमा भागातील मराठी भाषकांचा जन्म गोंधळ घालण्यासाठीच झाला आहे. त्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये प्रतिस्पर्धी देश वाटतात, असे मराठीद्वेष्ट्ये विधान सोमवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंबार यांनी बेळगावात एका कार्यक्रमात केले.

बेळगावचे आधी नामांतर करावे. रेल्वे स्थानकावर तत्काळ बेळगावी फलक लावण्यात यावा, अशी सूचनाही कंबार यांनी केली.
दहावीपर्यंत कन्नड सक्ती करावी तसेच सीमा भागातील मराठी भाषकांना मराठीतून शिक्षण हवे असेल तर त्यांनी कर्नाटकातून चालते होऊन महाराष्ट्रात निघून जावे, असे संतापजनक उद्गार यापूर्वी कंबार यांनी काढलेले आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही अराजक वगैरे माजत नाही.

कोणाला काही पडले नाहीये बेळगावातील मराठी लोकांबद्दल.
त्यांनी पण हे समजुन घ्यावे आणि आपल्या फायद्याचा मार्ग अवलंबावा. ह्या राजकारण्यांच्या मागे लागु नये.

कन्नड मधुन शिकले तर काय मोठा धरणीकंप होणार आहे? घरात मराठे बोला.
तुम्ही आम्ही सुद्धा १००० वर्षापुर्वी काय मराठी बोलत होतो? आणि ३०० वर्षापुर्वीची मराठी आज आपल्याला समजेल का?
नस्ते इश्शु भावनिक बनवुन आपली पोळी भाजायची.

भाषावार प्रांतरचना हे खुळ याच्या मुळाशी आहे.

प्रांतरचना या भौगोलिक सोयीसाठी असतात हा धडा प्रत्येक भाषेत दहावी पर्यंत एकदा तरी असावा. यावर पालकांसहीत परिसंवाद ही घडवावा.

बाकी त्या कंबारड्याला बेळगावच्या मराठी महापौराला बंगळुरात मारहाण झाली होती तो गोंधळ नव्हता काय हे विचारायलाच हवे.

टोचाजी,

बेळगाव पर्यंत नाही तर तंजावर पर्यंत मराठ्यांचे राज्य होते हा इतिहास त्यानंतरचा आहे. पण मराठी राज्याने मराठी लादली नाही म्हणुन आज या प्रांतात तेथील प्रादेशीक भाषाच बोलली जाते.

अय्यो २०११ दु धागा अदं. ईगं याक झगड माडतार ? हुच्च मनश्या !

...भाग्यदा लक्ष्मी गोडबोले बारम्मा

मी बेळगावचा आहे अन मला या नालायक राजकारण्या<शी काही देणे घेणे नाही, आम्ही घरी कानडी मराठी दोन्ही बोलतो, गेले ३८ वर्षे आनंदात अहोत , मला कानडी अन हिला मराठी चा अभिमान आहे व एकेमेकांबद्स्स, भाषांबद्दल , संस्कृतींबद्दल आदर आहे.

पुरे झाले आता. थांबवा ---प्लीज

आम्हाला सगळ्या भाषांचा अभिमान आहे.
पण आमच्या ज्यूनियर केजीतल्या पोराला चार इंग्रजी लिप्या, देवनागरी आणि कानडी अश्या स्क्रिप्ट शिकायला लागतात यांच्यापायी.

मराठी लादली नाही - ह्याला सावरकरांनी सद्गुणविकृती असे नाव दिले आहे. आणि आपल्या मराठी माणसांमध्ये (आणी हिंदूंमध्ये सुद्धा) इतार भाषिकांना (आणी धर्मियांना) आधार देणारा मोठा सद्गुण आहे (स्वत;च्या लोकांचा पाय खेचणार्‍या दुर्गुणाबद्दल आपण नकोच बोलूया).