ईमेल अकाउंट हॅक झाल्यावर काय खबरदारी घ्यायला हवी

Submitted by तोषवी on 22 November, 2011 - 11:22

ईमेल अकाउंट हॅक झाल्याचे समजल्यास काय खबरदारी आणि उपाय करावेत?
पासवर्ड बदलणे, व्हायरस स्कॅन ,account settings बदलणे अजून काय करायला हवे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर तो ईमेल कुठल्या आर्थिक गोष्टीसाठी नोंदवला असेल उदा. बँक , क्रेडीट कार्ड इ. तर तो आधी बदलुन टाकावा.

बँकेत तेच इ मेल अकाउंट दिले असेल तर बँकेचा व इतर महत्वाच्या गोष्टींचा, ज्याचा पासवर्ड तुम्ही मेलवर साठ्वला आहे असे सर्व पासवर्ड बदलणे.

तुम्ही जीमेल वापरत असाल तर Google Authenticator वापरु शकता.
खबरदारी म्हणुन सार्वजनिक संगणकावरुन इमेल वापरायचे टाळा. स्वतःच्या संगणकावरुन गरज असेल त्यावेळीच फक्त लॉग-इन व्हा, इतर वेळी संपुर्ण लॉग आउट व्हा. वेळोवेळी कुकीज वगैरे इंटरनेट डाटा क्लिअर करा.

शक्यतो Password मधे आकडे, मोठी छोटी अक्षरे आणि विशेष खुणा (= + # $ &) असले प्रकार वापरावेत. जेवढं कठिण पासवर्ड तेवढं Hacking कठिंण जातं असं वाचलं होतं Happy

तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना या इमेल आय डी वरुन येणारी इमेल्स इग्नोर करायला सांगा.
वा या आय डी वर कोणतीही वैय्य्क्तिक माहिती पाठवु नये म्हणुन सुचना करा.
इमेल हॅक करणारे बरेचदा आपल्या ओळखितलेच असणयाची शक्यता खुप जास्त असते

माझे तीन चार बर्‍यापैकी कठीण पासवर्ड आहेत. बायको, मुलांची नावे, जन्मदिन, पत्ता वगैरे चा काहिहि संबंध नसलेले. तरी ते बहुधा हॅक झाले होते एक दोनदा. विशेषतः माझ्या नावाने माझ्या काँटॅक्ट्स ना व्हायरस ने भरलेल्या इ-मेल पाठवल्या गेल्या. मग मी पासवर्ड बदलला नि ते थांबले. मलाहि अश्याच इ-मेल्स बरेचदा आल्या, माझ्या मित्रांपैकी कुणा कुणाच्या!!

palas | 22 November, 2011 - 14:22 नवीन
सोप्पयं! नवीन अकाउंट उघडायचा आणि त्या हॅकरलाच इमेल पाठवायचा 'कशी जिरवली' म्हणुन.

>>
हो पलास आधि विचार करत होते त्याला व्हायरस वगैरे पाठवण्याचा, पण त्याच्याकडे जास्त माहिती आहे उगाच अजुन बिथरायला नको. Happy

तोषवी यांनी प्रश्न विचारला आहे की, "ईमेल अकाउंट हॅक झाल्यावर काय खबरदारी घ्यायला हवी"
पण बर्‍याच जणांनी ईमेल जास्त सुरक्षीत रहावा याबाबत उहापोह केला आहे.

ईमेल अकाउंट हॅक झाल्यावर सर्वप्रथम ज्या सर्व्हर कडून ईमेल आय डी तयार केला आहे तेथील अ‍ॅडमिनीस्टेटरशी संपर्क साधला पाहिजे. तसे त्यांना कळवून त्या आयडी चा पासवर्ड बदलता येतो का ते पाहीले पाहिजे. जर तो आयडी डिलीट करता आला तर काय होईल किंवा तो आयडी फारच महत्वाचा असेल तर आहे त्या परिस्थीतीतील डेटा मिळवता येईल काय हे पाहिले पाहिजे. त्या अ‍ॅडमिनीस्टेटरने सहकार्य केल्यास हे साध्य होईल. बर्‍याचदा नक्की त्या अ‍ॅडमिनीस्टेटरशी संपर्क होतच नसेल तर मात्र समस्या थोडी गंभीर रुप धारण होवू शकते. त्यावेळी मात्र त्या आयडी चा उपयोग जेथे जेथे होत असेल तेथील लोकांशी संपर्क साधून त्या त्या परिस्थीतीशी निगडीत बदल केले पाहिजे.

पाषाणभेद : बरोबर आहे.. पण हल्ली कुणाला Contract करून त्याच्याकडून काही माहीती मिळविणे, बदलणे हे इतक्या अशक्य झाले आहे... Yahoo Admin, किंवा Hotmail Admin ला Contact करण्याचा प्रयत्न करा. छापील उत्तराशिवाय दुसरं काही मिळत नाही.

>>> बर्‍याचदा नक्की त्या अ‍ॅडमिनीस्टेटरशी संपर्क होतच नसेल तर मात्र समस्या थोडी गंभीर रुप धारण होवू शकते. त्यावेळी मात्र त्या आयडी चा उपयोग जेथे जेथे होत असेल तेथील लोकांशी संपर्क साधून त्या त्या परिस्थीतीशी निगडीत बदल केले पाहिजे.

@परदेसाई: सहमत. आपले म्हणणे मी वर उल्लेखिलेल्या वाक्यांत आलेले आहे. सार्वजनिक प्रसार झालेले मेल सर्व्हीसेस बर्‍याचदा असला झंझटपणा अंगी लावत नाहीत हा अनुभव आहे. तरीपण काहीना काही माध्यम जरूर असेल की ते अ‍ॅडमिनीस्टेटर काहीतरी उपाययोजना अंमलात आणू शकतील. ज्या कुणाला असला अनुभवा आलेला असेल त्याने तो येथे सांगावा जेणे करून असले प्रकार हाताळतांना उपयोगी पडू शकेल.

ईमेल अकाउंट हॅक झाल्याचे समजल्यास काय खबरदारी आणि उपाय करावेत?>> म्हणजे नक्की काय झालेय हे सांगू शकता ? तुमच्या त्या अकाउंट वरून इतरांना spams जातयेत ? कि त्या अकाउंट वरून financial institutes शी संपर्क साधला जातोय ? अकाउंट कसला आहे ? जनरल free अकाउंट आहे कि एखाद्या paid provider ने पुरवलेला आहे ?

याहूचा अनुभव चांगला आहे.
ते अकांऊट माझेच आहे हे कन्फर्म करण्यासाठी त्यांनी मला माझ्या फ्रेंडलिस्टला किती आयडी आहेत, अन त्यातल्या मी नेहेमी बोलत असलेल्या कोणत्या? हे इतकंच विचारलं होतं. २४ तासात आयडी पासवर्ड रीसेट करून मिळाला.