पनीर पराठा आणि मलाई साग (फोटोसह)

Submitted by दिनेश. on 21 November, 2011 - 01:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
वरच्याप्रमाणे
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! काय टेम्प्टींग दिसतायेत दोघी पदार्थ! थंडीमधे असे गरमागरम पराठे खायला मजा येते. Happy
मलई का साग पहिल्यांदाच पाहिला मात्र.

दिनेशदा... अगदी सोलिड च पदार्थ आहे. १ दिवस पुर्ण दिवस उपास करुन मगच करायला पाहिजे. Happy

पहिला फोटो पनीर पराठ्याचा आहे ना? दुसरा फोटो नाही आवडला.
खरंतर अपेक्षाभंग झाला, मलाई साग म्हणजे दुध आणि साय घातलेला एखादा भाजीसारखा पदार्थ असेल असं वाटलं होतं.

सागच आहे तो. मी वापरलेले टोमॅटो तेवढे लालबुंद नव्हते आणि मी तिखटही जरा कमीच वापरलेय. साधारण फिका केशरी रंग यायला पाहिजे.

पराठा सोलिड्......अत्ता घरी तोफू आहे. उद्या लेकीच्या डब्याला काय द्यायच हा विचार करायला नको....

एक शन्का..... मी जर आज रात्रिच परोठा पिठ घट्ट भिजवुन घट्ट झाकुन टप्पर वेयर मध्ये ठेवले आणि सकाळी लाटले तर पिठ विसविशीत होइल का? एनी आयडीया? कारण सकाळी ५.४५ ला उठुन कुठे करु हे ?

दिनेशराव, हे असलं काहीतरी नका लिहीत जाऊ! एक तर खायला मिळत नाही आणि नुसतेच बघत बसायचे. नाहीतर पुण्यात या, आपण प्रदर्शन व विक्री ठेवू खाद्यपदार्थांची !

मीरा, पिठ पॉलिथिन मधे रॅप करुन फ्रिजमधे ठेवता येईल.
(तोफूचा आणखी एक प्रकार लिहिन आज उद्या )
बेफी, अवश्य. प्रदर्शन / विक्री नाही, पण गटग करुच.

पराठा आवडला खुप नक्की करणार. Happy

दिनेशदा पाण्याच्या भरलेल्या ग्लासवर पराठा का ठेवायचा ? थंड करण्यासाठी की आणि काही लॉजिक आहे ?

मस्तच.. Happy
मी पण येते गटग ला Proud

दिनेशदा पाण्याच्या भरलेल्या ग्लासवर पराठा का ठेवायचा ? थंड करण्यासाठी की आणि काही लॉजिक आहे ?>> मी पण हे विचारणार होते. (मला वाटते त्यामुळे मऊ वगैरे राहत असतील)

असे ग्लासावर ठेवल्यावर वाफ पराठ्यात जिरत नाही. पेपरवर किंवा फडक्यावर काढणे मला जरा अनारोग्यपुर्ण वाटते.

असे ग्लासावर ठेवल्यावर वाफ पराठ्यात जिरत नाही. >> हे मस्त. मलापण पेपर फडके आवडत नाही Happy

दिनेश, साग य शब्दाचा नक्की अर्थ काय, माझ्या माहितीप्रमाणे 'पाला'. चुभुदेघे.

पराठ्याची पाककृती आवडली. फोटोपण मस्त आहे. करून बघणार.

मलईसागाची पाककृती थोडी पनीर-बटरमसाल्यासारखी वाटली. फोटोत तव्यावर धिरडं लावल्यासारखं वाटतंय. भांड्यात घालून काढला असता तर छान दिसलं असतं.

सही आहे Happy

फोटोत तव्यावर धिरडं लावल्यासारखं वाटतंय. भांड्यात घालून काढला असता तर छान दिसलं असतं.<<< ती बहुतेक काळ्या रंगाची सिरॅमिक प्लेट आहे....

आरती, साग चा नेमका अर्थ नाही माहीत. कदाचित अशी घोटून केलेली भाजी असेल.
हो लाजो, प्लेटच आहे ती. (आता संपली, परत फोटो काढण्यासाठी करावी काय ?)

पराठ्याची रेसिपी मस्त आहे. मलईका साग पण भारी प्रकरण दिसतंय... फोडणीचं क्रीम! Proud फोटो तर तोंपासु!! मला अल्पनाच्या पलद्याच्या पाकृची आठवण झाली. त्यात दही वापरलंय.

साग चा नेमका अर्थ नाही माहीत >> साग चा नेमका अर्थ 'पाला' असाच आहे. जसे पंजाब चा 'सरसोंका साग'. बंगाल मधे पालेभाजीला उद्देशुन साग हा शब्द वापरला जातो. कुठलीही पालेभाजी केली तरी ते लोक 'साग बनाया' असेच म्हणतात.

इथे वहिदा रेहमानचा काहितरी गोंधळ झालेला दिसतोय Happy

आपल्याकडे पण शाक, कणी शाक असे शब्द आहेत कि, श चा स, आणि क चा ग.. होतोच.
गुजराथीमधे पण शाकभाजी असा शब्द वापरतात.

असो, वहिदाला कितीही गुन्हे माफ !

मलाही दुसरा फोटो पराठ्याचाच वाटला. साग कुठे आहे? असं लिहिता लिहिता थांबले. मलई साग म्हटल्यावर मेथी मटर मलई टाईपची भाजी समोर येईल असं वाटलेलं त्यामुळे थोडा अपेक्षाभंगच झाला.

Pages