शाळा - Traditional preschool की montessori?

Submitted by चीकू on 17 November, 2011 - 14:19

नमस्कार. आम्ही अमेरिकेत आहोत. सध्या मुलीसाठी (वय ३ वर्षे) शाळा शोधत आहोत. Montessori schools आणि traditional pre-school यापैकी जास्त चांगले कुठले आहे? का ते प्रत्येक मुलावर अवलंबून असते? शाळांना भेटी द्यायचा विचार आहे पण याबाबत काही सल्ला मिळाल्यास खूप मदत होइल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

का ते प्रत्येक मुलावर अवलंबून असते? >>> ते खरं तर शाळेवरही अवलंबून असते. शिक्षक चांगले असतील, शैक्षणिक साधनांची कमतरता नसेल तर माँटेसरी आहे की प्रिस्कूल ह्याने फरक पडत नाही Happy
माझा मुलगा गेल्या वर्षी माँटेसरीत गेला, ह्यावर्षी प्रिस्कूलला जातो आहे. मला त्याची ह्यावर्षीची शाळा जास्त आवडली. त्यात दोन्हींमधल्या शिकवण्याच्या पद्धतींमधल्या फरकाचा संबंध नसून ह्या शाळेतले वातावरण अतिशय खेळीमेळीचे आहे, शिक्षक प्रेमळ आहेत, मुलांना हाताळण्याची पद्धत जास्त चांगली आहे हा आहे.

दोन्हींमधला मूलभूत फरक :
माँटेसरीमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मुले ( साधारण तीन ते सहा ) एका वर्गात शिकतात.
प्रिस्कूलमध्ये एकाच शैक्षणिक इयत्तेतील / एकाच वयोगटातील मुले एकत्र असतात.

वयातल्या ह्या फरकामुळे माँटेसरीत अभ्यासाची पद्धत वेगळी असते. प्रत्येक मुलाला एखादी अ‍ॅक्टिव्हिटी दिली जाते जी त्याने एकट्याने बसून करायची असते. सगळी मुलं आपापली मॅट अंथरुन आपापल्या गोष्टी घेऊन बसतात उदा. स्पेलिंग बनवणे, शेप्स, आकडे मोजणे इत्यादी. मूल आपल्या आवडीनुसार, कुवतीनुसार, वेगानुसार शिकत जाते. unidirectional पद्धतीने शिक्षण कमी असते ( शाळेच्या एकूण वेळापैकी काही वेळ एकत्र बसून गाणी म्हणणे वगैरेसाठी राखीव असतो पण बाकीच्या गोष्टी मुलं आपापल्या जागेवर बसूनच शिकतात, शिक्षक वर्गातून फिरत प्रत्येक मुलापाशी जाऊन शिकवतात )
प्रिस्कूलमध्ये शिक्षक गणित, स्पेलिंग्स, फोनिक्स, गाणी संपूर्ण वर्गाला एकदम शिकवतात. वेगवेगळ्या शाळांमध्ये थोडा वेळ मुलांना स्वतंत्र अ‍ॅक्टिव्हिटीसाठी दिला जाऊ शकतो पण मॉंटेसरीच्या तुलनेत मुलांनी स्वतंत्र अभ्यास करणे हे अपेक्षित नसते.

माँटेसरीत मुलांना आपल्या जागेवर बसून काम करायची सवय लागते. शैक्षणिक साधने ( गणिताशी ओळख करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत, स्पर्शेंद्रिये वापरण्यासाठी असलेली खेळणी इत्यादी ) सरस असू शकतात. मान्यताप्राप्त माँटेसरीतून ही साधने सारखीच असतात ( निदान मरिया मॉंटेसरीने विकसित केलेली पद्धत वापरणे अपेक्षित आहे ) एकाग्रता वाढते. प्रत्येक मूल एखाद्या विषयासाठी पाहिजे तितका वेळ घेऊ शकते. एखादा विषय समजत नसेल तर वर्गाबरोबरीने ओढलं जाण्याची भिती नसते.
प्रिस्कूलमध्ये एखाद्या मुलाला एखादा विषय कळला नाही उदा. साऊंडस वापरुन स्पेलिंग्ज कशी तयार करायची तरीही त्याच्यासाठी कुणी थांबत नाही. अर्थात जर मुलाचा अभ्यास पालक करुन घरी करुन घेत असतील तर मुलाला एखादी गोष्ट समजली नाहीये हे पालकांना लगेच समजून येते. त्यावर उपाययोजना करता येते.

वर्गात वेगवेगळ्या वयोगटाची मुलं असल्याने लहान मुलांना पटापट शिकण्यासाठी जास्त मोटिव्हेशन मिळते ( जसे दोन भावंडांमधी धाकटे मूल बरेचदा मोठ्याच्या नादाने बर्‍याच गोष्टी लवकर शिकते ) ह्या उलट मोठी मुलं त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांची काळजी घ्यायला, खेळताना त्यांना सांभाळून घ्यायला शिकतात.
साध्या शाळेत एकाच वयोगटाची मुलं असल्यामुळे सगळी एकाच बोटीत असतात Happy
अर्थात कुठल्याही प्रकारच्या चांगल्या शाळेत शिस्त, मूल्यशिक्षण चांगलेच असल्यामुळे प्रिस्कूलला जास्त प्रॉब्लेम येतो असे अजिबात नाही. बरोबरच्या मुलांशी कसे वागायचे, शेअरिंग हे दोन्ही प्रकारांमध्ये मुलं शिकतातच.
पण माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार इतर मुलांमध्ये मिसळण्याचे एक्स्पोजर साध्या शाळेत जास्त मिळते, माँटेसरीत नाही.

दोन्ही पद्धती बघितल्यावर मला तरी वाटलं की सर्वसाधारणपणे जिथे एकंदर वातावरण चांगले आहे अशा कुठल्याही शाळेत ( माँटेसरी / प्रिस्कूल ) मुलं छान रुळतात. पण आयक्यूच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मुलांसाठी ( अतिशय हुशार / गिफ्टेड किंवा सर्वसाधारण मुलांपेक्षा शिकण्याची गती कमी पडत असलेल्यांसाठी ) माँटेसरी पद्धत कदाचित जास्त फायदेशीर ठरेल कारण ती त्यांच्या pace नुसार शिकू शकतील )

अन्कनी आणि अगो, धन्यवाद. खूप महत्वाची माहिती मिळाली. मी आता दोन्ही प्रकारच्या शाळांना भेट देईन म्हणजे निर्णय घ्यायला सोपे जाईल.

शिक्षकावर सर्व अवलंबुन असते.

अगो
ते खरं तर शाळेवरही अवलंबून असते. शिक्षक चांगले असतील, शैक्षणिक साधनांची कमतरता नसेल तर माँटेसरी आहे की प्रिस्कूल ह्याने फरक पडत नाही

>> बरोबर १००%.