(अश्मयुगातल्या रामची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
रात्र झाली होती. आमची सर्वांची जेवणं झाली अन मग सगळे बाबांच्याभोवती जमले.
मुलं ओरडू लागली, "गोष्ट गोष्ट ! आज जंगलात काय काय झालं, त्याची गोष्ट ! "
मोठे बाबा हात वर करत म्हणाले, " अरे हो हो ! पण आधी सगळे शांत बसा बरं. आज रामचे बाबा गोष्ट सांगतील."
मी खुष झालो. आज माझे बाबा गोष्ट सांगणार !
सगळी मुलं गप्प बसून ऐकू लागली. छोटी मुलं आपापल्या आयांच्या मांडित जाऊन बसली.
" आज आम्ही डोंगरापलीकडच्या जंगलात गेलो होतो. आज तुम्ही जे लाल मुळे खाल्ले ना; ते त्या जंगलात खुप उगवतात. तुम्हाला ते जसे आवडतात तसे ते सशांनाही खुप आवडतात. त्यामुळे त्या जंगलात ससेपण खुप असतात. " बाबा सांगू लागले.
" रामचे बाबा ससे म्हणजे काय? " आमच्यातला नुकताच मोठा होउ लागणार्या बंटीने विचारले.
मोठे बाबा उठले आणि दिव्याजवळ गेले. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागली. दिव्यापलिकडच्या भिंतीवर आता मोठे बाबा मजेची चित्र दाखवणार म्हणून सगळे खुष झाले होते.
मोठ्या बाबांनी दिव्याची वात मोठी केली. आणि ते दिव्याच्या पलिकडे जाऊन उभे राहिले.
मग त्यांनी एक हात आडवा केला. दुसर्या हाताची बोटं त्या हातावर ठेवली.
आणि एका तालात दोन्ही हात उड्या मारत पुढे नेऊ लागले.
त्याबरोब्बर मागच्या भिंतीवर ससा आला अन उड्या मारू लागला.
मध्येच त्याने कान हलवले. मग तोंड हलवले.
पुन्हा उड्या मारत तो अंधारात पळून गेला.
मग मोठ्या आजोबांनी विचारलं, " कळला का ससा? "
"हां हां, म्हणजे मीनाच्या डोक्यावर भिंतीवर जे चित्र काढलय ते ? " बंटी म्हणाला.
आता बंटीला ससा म्हणजे काय ते बरोब्बर समजलं होतं.
तेव्हढ्यात सखादादा पुढे आला.
त्याने डोक्यापाशी हाताची दोन - दोन बोटं वर करून सश्यासारख्या उड्या मारायला सुरूवात केली.
मग काय आम्ही सगळेच सश्यासारख्या उड्या मारू लागलो. बाबांची गोष्ट तशीच राहिली.
थोड्या वेळाने मोठे बाबा म्हणाले, "चला आता मुलांनी झोपायला जा. आम्हाला थोडं बोलायचयं आहे. " आम्ही सगळी छोटी मुलं उठलो आणि आईंबरोबर आत गेलो.
पुढे, भाग दोन
लहान मुलांना इतिहास कसा शिकवा
लहान मुलांना इतिहास कसा शिकवा याची माझी कल्पना जरा वेगळी. त्याचा हा एक छोटा प्रयत्न.
एका बैठकीत जेव्हढा इतिहास शिकवायचा तेव्हढाच भाग एका भागात टाकणार आहे.
इथे मला तिसरीतली मुलं अपेक्षित आहेत. ( सध्या महाराष्ट्रात तिसरीला 'मानवाची गोष्ट' हा इतिहास आहे. )
साधारण सहा ते आठ भागात ही एक गोष्ट लिहायचा प्रयत्न करतेय. हे अॅनिमेट करायचाही प्रयत्न चालू आहे.
वा ! छान प्रयत्न, वाचतेय!
वा ! छान प्रयत्न, वाचतेय!
धन्स अश्विनी. तिसरी मध्ये
धन्स अश्विनी.
तिसरी मध्ये कोणाची मुलं असल्यास त्यांनी कृपया मुलांना हे वाचून दाखवाल?, त्यांच्या प्रतिक्रिया कळवाल?.
मी काही शाळांमध्येही प्रयत्न करणार आहे. नंतर शाळांमध्ये अॅनिमेशन दाखवायचा विचार आहेच
अवल, एक सुचवायचं आहे. जर १
अवल, एक सुचवायचं आहे. जर १ लाख वगैरे असेल ना तर इतक्या आधी नक्की कुठले प्राणी/ पक्षी होते किंवा नव्हते ते बघशील का? ससा होता का? मला माहीत नाहीये.
पण आयडीया भन्नाट आहे. खूप खूप खूप मस्त!
मस्त! पुढचा भाग लवकर येउ
मस्त! पुढचा भाग लवकर येउ दे.गोष्टीबरोबर अॅनिमेशन..... छानच! आपल्यावेळीही इतिहास ह्याप्रकारे शिकवला गेला असता तर!!! आता परत ३रीत बसायला आवडेल!
वरदा, टेक्निकली बरोबर आहे
वरदा, टेक्निकली बरोबर आहे तुझं. पण मुलांना समजेल, आवडेल अन झेपेल ते सांगत सांगतच शिकवावे असे मला वाटते. हं काही वेळा त्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतील पण जो पर्यंत आपण अगदी विपर्यास करत नाही तो पर्यंत चालाव्यात अशा तडजोडी असे आपले मला वाटते

रच्याकने : wikipedia : Recent research has shown that all European Rabbits carry common genetic markers and descend from one of two maternal lines. These lines originated approximately between 6.5 million and 12,000 years ago when glaciers isolated two herds; one on the Iberian Peninsula and the other in Mediterranean France. It can be surmised that man began hunting rabbit as a food source, but further research needs to occur. Little substantial evidence of man's relationship with the European rabbits is documented until the medieval period.[20]
Humans' relationship with the European (sometimes called true) rabbit was first recorded by the Phoenicians earlier than 1000 BC,
अंशा, चल आपण दोघी पुन्हा लहान होऊयात
मस्तं आयडीया..... पुढचा भाग
मस्तं आयडीया..... पुढचा भाग लवकर येउ दे...
अॅनिमेट करायला शुभेच्छा... ते भागही पहायला आवडतील...
छान गं
छान गं
आयडिया आवडली ! इतिहास
आयडिया आवडली !
इतिहास समजल्याशी कारण, बाकी अनेक तडजोडी कराव्या लागल्या तरी
चालतील.
अवल, प्लीज गॉड्स मस्ट बी क्रेझी चा पहिला भाग बघणार का ? त्यात घरचा म्हातारा
माणूस, प्राण्यांबद्द्ल लहानग्यांना कसे सांगतो, ते बघण्यासारखे आहे.
अगं मी चुका काढायला म्हणून
अगं मी चुका काढायला म्हणून लिहिलं नव्हतं गं अवल. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मला एक प्रश्न पडला म्हणून तो विचारला एवढंच.

आयडियेची कल्पना भन्नाट आहे हे वर लिहिलंच आहे
दिनेशदा अगदी अगदी मला वाततं
दिनेशदा अगदी अगदी
मला वाततं त्यात की इतर कोणत्या कॉमिक्स्मध्ये पहिला ऑर्केस्ट्रा दाखवलाय , तोही अफलातूनच ! या अशा गोष्टी मुलं कित्ती गुंगून बघतात नाही ? म्हणूनच मला वाटतं की आपली एकूणच शिकवण्याची पद्धत कुठेतरी बदलली पाहिजे, निदान वयाच्या १०-१२ वर्षा पर्यंत तरी 

वरदा, नाही गं, गैरसमज अजिबात नाही. तू म्हणतेयस ते अगदी खरं. फक्त माझी यामागची भूमिका जरा जास्त स्पष्ट केली तुझ्या मुद्द्याला धरून इतकच ! चिल
मस्त आहे हे. सानिका ३ रीत
मस्त आहे हे.
सानिका ३ रीत आहे, तिला आजच वाचून दाखवते. उद्या तिचा प्रतिसाद पण कळवते इथे
भारी आहे कल्पना.
भारी आहे कल्पना.
आवडली , लहान मुलांसाठी
आवडली , लहान मुलांसाठी खरोखर चांगली कल्पना, पुढील कामासाठी शुभेच्छा
आरु, येशा तिसरीत नाही पण
आरु, येशा तिसरीत नाही पण चित्रावरुन गोष्टी ही कॉन्सेप्ट तिलाही आहे. तेंव्हा तिला दाखवुन सांगते नक्कीच.
भन्नाट आणि सहजसोप्पी कल्पना आहे ग.
अवल, छान कल्पना आहे ही.
अवल, छान कल्पना आहे ही.
अवल, भन्नाट कल्पना आहे. आणि
अवल, भन्नाट कल्पना आहे. आणि ती चित्रे पण क्लास आहेत.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
छान कल्पना, सुंदर चित्र.
छान कल्पना, सुंदर चित्र. पर्णिका दुसरीत आहे. तिला वाचून दाखवल्यावर लिहते तिला काय वाटलं ते.
सर्वांना मनापासून धन्यवाद
सर्वांना मनापासून धन्यवाद !
कविन, शुभांगी, मोहना तुमच्या मुलांचे प्रतिसाद खरच खुप उपयोगी पडतील