छान छान खाऊ

Submitted by sneha1 on 16 November, 2011 - 15:43

PicsArt_1380048998502.jpgPhoto0651.jpgPhoto0655.jpgPhoto0671.jpgPhoto0673.jpgPhoto0687.jpgPhoto0691.jpgPhoto0705.jpgPhoto0706.jpgPhoto0709.jpgPhoto0712.jpgPhoto0725.jpgPhoto0727.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहा,
आजतरी दुर्दैवाने भारतात मुलांना डब्यात नॉनव्हेज आणायला बंदी आहे. 'धार्मिक भावना' नावाचं काहीतरी 'दुखावतं' म्हणे. वरून इतके अत्यावश्यक घटक जे मुलांना मिळालेच पाहिजेत, ते मिळू नयेत म्हणून धर्माच्या / इतर नावांवर काही-बाही खपवले जाते आहे.
आदर्श 'डबा' स्पर्धा आयोजित करून अन ती पेडीअ‍ॅट्रिशिअन्स अन डाएटिशिअन्स कडून तसेच ४ लहान मुलांकडूनही 'परिक्षित' करून घेतली होती आम्ही. रिझल्ट वर दिसतो आहे फोटो मधे.

माझा पहिला प्रतिसाद 'इब्लिस' होता. नो दॅट? ~विंक~

ही माहिती नवीन आहे माझ्यासाठी..
आणि रिझल्टचा कोणता फोटो?इथे दिसत नाही..

बरीच मेहनत आहे.. छे! इथे रोजचा स्वतःचा डबा कोणी असा भरून देइल तर बरे...
मुलांची गॅरंटी नसतेच इतके 'काबाडकष्ट' करून बनवलेले डबे खातीलच... Happy

वा. सहीच आहे हा धागा, बरेच दिवसात माबोवर न आल्याने बघितलाच नाही :(.
पण मस्तच आहे. मुलांना असाच डबा हवा- एक फळ / भाजी (काकडी / टोमॅटो/ सेलेरी स्टीक्स इ. ), प्रोटीन (अंडी/मासे/चिकन) इ. आणि कार्ब्स.

माझ्या मुलांना हे फोटो दाखवलेत तर आम्हाला कधी नाही दिला असा डबा असं लगेच विच्रारतील आणि अमेरिकेचं ति़किट काढायला लावतील Happy

स्नेहा... खूप गोग्गोड खाऊ!! मलाच छोटंसं होऊन (फक्त डब्बा घेऊन) शाळेत जावंसं वाटतंय पुन्हा Proud

मला कोणी सांगेल का हे हार्ट, स्टार, अ‍ॅनिमल्स, लेटर्स शेपचे कुकी कटर्स(कुकी कटर्सच आहेत ना हे??) कुठे मिळतील मुंबईमध्ये? दादरला? आमच्या इथे खाण्याच्या उत्साहाला जरा तरी वेग येतोय का ते पाहायचंय!!! एक हताश बाहुली

thanks a lot, everybody..
kanu, michaels has to be in bay area, just check the store locator. ask for cookie cutters, the one I bought is a set of 101 cutters.
sorry, cannot type in Marathi because of laptop problem.

dreamgirl,
I got the heart shape cutter in panvel. you can use the one used for veg cutlets.

सही आहेत वरचे फोटो. हे बघून मुलाची डिमांड आलीच आहे.
माझ्याकडे स्टार, डायमंड, बदाम, किलवर वगैरे शेप्सचे कुकी कटर्स आहेत (६ आकार आहेत) डि मार्टमध्ये मिळाले. पण ते कुकीसाठीच योग्य आहेत (लहान आहेत).
सँडवीच, पराठे, कटलेटसाठी आकार जरातरी मोठे पाहिजेत. मी सुद्धा शोधतेय.

वॉव, जबरदस्त कल्पना आहेत ह्या.. आयांना काय मुलांनासुद्धा सहज जमतील अशा. खुपच आवडल्या मला. तुझे साईड्-स्नॅक्स पण आवडले. माझा मुलगा डबा तसाही संपवतो, पण अशा पद्धतीने डबा आणखी आनंददायी होईल. आम्ही घरी पोळ्या, पराठे, पुर्‍यांवर बरेच प्रयोग करत असतो, ते सगळं त्याचा तो करतो आणि भाजणे/तळणे आम्ही करतो. आता अशा कल्पना त्याला पण आवडतील, वेगवेगळे आकार करायला खुप मजा येईल. थँक्स स्नेहा! Happy

वॉव! कसलं सही आहे हे.

हे बघून माझी मुलगी म्हणणार

अशीच आमुची आई असती, छानशी सुगरणवती,
आम्हीही चांगलंचुंगलं खाल्लं असतं, पण नशिबात हीच होती

maami Happy

thanks a lot, everybody..
mami, I am not that great Happy
toshavi, those wraps are very easy. it is just omelet with chopped broccoli kept on phulka. as soon as you make omelet , keep it on phulka and immediately put cheese slices on that and roll it. heat of omelet will melt cheese. cut it and put toothpicks on pieces..
again, sorry for English typing..

माझ्याकडे स्टार, डायमंड, बदाम, किलवर वगैरे शेप्सचे कुकी कटर्स आहेत (६ आकार आहेत) डि मार्टमध्ये मिळाले. पण ते कुकीसाठीच योग्य आहेत (लहान आहेत).>> मीसुद्धा दादर मार्केट फिरले तर तेच मिळाले... मी पण शोधतेय पराठे किंवा सँडविचेस साठी!!

आवडते आकार स्पेशली स्टार चा बघून डोळे विस्फारतात!! पण प्रत्यक्ष खाण्याचा उत्साहच नगण्य असल्याने एवढी मेहनत करा आणि वर ते हातात घेऊन चिवडत ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार केलं की डोक्यात स्टार्स पेटतात...

पण हा धागा प्रचंड देखणा आहे.. जेव्हा पण वर येतो... डोळे भरून सगळा खाऊ पुन्हा पुन्हा बघून घेते Happy

नवीन खाऊचे फोटोज टाक ना स्नेहा...

स्नेहा,

या वर्षिपासुन माझा मुलीचा डबा हि तूच भरायचा....मी फक्त नंतर येऊन घेऊन जाईन

कसलि भारि आइडिया आहेत...फोटो बघून मलाच शाळेत जावस वाटतय.....

मस्तच आहे खाऊ. Happy छान कल्पना ड्बा सजविण्याच्या. माझा मुलगा पुर्‍या, पराठे, साअ‍ॅड्विचेस, डोसे, मेदुवडे, पास्ता, राअ‍ॅविओली, कसाडिया, ई. आवडीने खातो. पण जर हे सर्व पदार्थ गरम असतील तरच. एकदम गरम. ईथे अमेरिकेत कुठला ब्राअ‍ॅन्ड चांगला आहे? गरम ड्ब्यांचा?
शाळेत गेल्यावर तीन तासांनी तो डबा खाणार. त्या दॄष्टीने उपाय सुचवा प्लीज. थंड पदार्थ बिलकुल खात नाही तो. वय वर्ष ५.

Pages