छान छान खाऊ

Submitted by sneha1 on 16 November, 2011 - 15:43

PicsArt_1380048998502.jpgPhoto0651.jpgPhoto0655.jpgPhoto0671.jpgPhoto0673.jpgPhoto0687.jpgPhoto0691.jpgPhoto0705.jpgPhoto0706.jpgPhoto0709.jpgPhoto0712.jpgPhoto0725.jpgPhoto0727.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्च Happy हे असले सुंदर लेख माबोवर आले नाहीत तर माझ्याही आर्मी पद्धतीत बदल होणार नाहीत बहुतेक.

भलतच गोड प्रकरण आहे हे Happy .. पहिले २ व ती हिरवी कुत्री तर खावेसे वाटु नयेत, खेळावेसे वाटावे इतकी गोंडस दिसताहेत.

स्नेहा, काय अफाट आयडिया.. कुत्रे आणि फुलपाखरं कसली गोड आहेत Happy चला आता पुन्हा एकदा करून बघायला हवं, आर्मी पध्दत बदलायला जमतं का ते. एकदा प्रयत्न केला होता, नेहमीचे ख्रिसमसचे आकार कापून, पण इतके काही गोड नव्हते ना ते!

वरच्या ब्लॉगमधली बाई महान आहे. किती ते वेरिएशन्स आणि किती त्या आयडिया. Uhoh
तिचे ते बेंतो बघून जपानची आठवण आली.

स्मिता,फुलपाखरं साध्या पोळीच्या कणकेची आहेत, वर फक्त स्प्रिन्कल्स टाकले भरपूर्.लेकिला आवडतात म्हणून.

भारीच क्युट आहे टिफिन बॉक्स.
हे पाहून मला वाटतं मी मुलांना अगदी आर्मी पध्द्तीने वाढवलं की काय? >>>> +१

जबरी आहे खाऊ. केवढा तो उरक, सक्काळी उठून इतकं छान छान करुन देणारी आई आहे म्हणजे लेक लकी आहे अगदी. :).. इथे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद, मी पण बघते १-२ तरी ट्राय करुन. Happy

बापरे..मी इतकी ग्रेट, उरक असलेली मुळीच नाही..
लेक डबा कधी खाते, कधी नाही..अगदी आजकालच्या मुलांसारखी Happy तिने डबा नाही खाल्ला की मी वैतागणार. नेहमीची आमची जुगलबंदी ऐकून नवरा म्हणायचा, तिला डबा attractive करून देत जा.मी मनात म्हणणार, हो, तेच काम आहे मला Happy
नेमके एका दिवशी पेपरमधे आर्टिकल आले,मी ज्याची लिन्क वरती दिली आहे ते.ते बघून मला खूप आवडले, म्हणून मायकेल्स मधे चक्कर टाकली.तिथला सेट आवडला तो घेतला (५०% चे कूपन देऊन Happy )आणि मग प्रयोग सुरू केले.
पण दोन गोष्टी..एक म्हणजे हे करायला वेळ मुळीच लागत नाही..
दुसरी, अजूनही लेक सगळं खाईल ह्याची खात्री नसते.ती घरी येऊन खात बसते!
पण सेट खरंच छान आहे,आणि त्यात लेटर्स्,नंबर्स्,प्राणी,शेप्स,कार्स अशी भरपूर व्हेरायटी आहे. हे त्यातले कटर्स.

wilton-101-piece-cookie-cutters-set_2_lg.jpg

आर्मी पदधती बद्दल अगदी अगदी.आमच्याकडे तेच चालू आहे. तिरका कापून फॉईल मधे गुंडाळलेला पराठा म्हणजे कल्पकतेची परिसीमा. पण डबा कधीच परत येत नाही म्हणून सगळे चालू आहे. पण नक्कीच काही प्रकार करून बघणार. मुलाला जपानी शाळेत न घालण्याचे कारण मला त्या मुलांच्या आयांसारखे सुंदर बेंतो बनवता नाही आले तर त्याला त्रास होईल हे पण होते Happy
छान आहे स्नेहा. इकडे हे कटर्स मिळतात का बघते.

स्नेहा तुझे सगळेच ऑप्श्न्स छान आहेत पण आमच्याकडे असे तीन चार गोष्टी डब्यता देऊन चालत नाही, डबा हा ५ मिनिटात खाऊन झाला पाहिजे, फार वेळ खात बसलं तर खेळायचा वेळ कमी होतो असं लॉजिक आहे. ३/४ पदार्थ दिले की डबा कन्फ्यूझिंग होता म्हणून काहीच खाल्लं नाही असं उत्तर मिळतं. डब्यात दूध हवं असतं प्रिफरेबली जे मी अर्थात देत नाही. पण कारण तेच ५ मिनिटात पिऊन होतं. कुठे ते चावत बसा Happy

हायला! सुंदर आहे. हे मलाच द्या कुणीतरी. आता जरी मिळाले तरी घेवून जाईन.
इतकं खपून मुलीची काहीच गँरटी नाही खाईल की नाही.

शिव शिव.
सामिष..
तेही लहानग्यांच्या डब्यात? चक्क उकडलेली अंडी?
उसगांवात रहाता वाट्टं?

Pages